पोस्ट्स

सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सहजीवन!!

इमेज
 सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सहजीवन!! “बरेचदा आपण ज्याला काही प्रजातींसाठी विकास म्हणतो, तो इतर अनेक प्रजातींकरता विनाश असू शकतो”… मी. मला जाणीव आहे की या ओळी माझ्यासारख्या स्थापत्य अभियंता व बांधकाम व्यावसायिक असलेल्या व्यक्तीच्या तोंडी नव्हे तर एखाद्या कट्टर पर्यायवरणवादी किंवा संवर्धनवादी व्यक्तीच्या तोंडी अधिक शोभतील (म्हणजे योग्य वाटतील) परंतु म्हणून विकासाच्या बाबतीतली वस्तुस्थिती बदलत नाही, हाच विचार मी नुकत्यात दिलेल्या एका व्याख्यानात मांडला. निमित्त होते, जो खरेतर एक प्रकारे माझा गौरवच होता कारण मला राज्यभरातील अनेक  तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांच्या एका गटासमोर भाषण देण्यासाठी (विचार मांडण्यासाठी) आमंत्रित करण्यात आले होते. शासकीय तंत्रनिकेतन, पुणे ज्याला सर्वजण जीपीपी म्हणून ओळखतो, तिथे काम करणाऱ्या माझ्या स्नेही प्राध्यापक सीमा व त्यांच्या सहकारी प्राध्यापक सिंधू यांनी मला आमंत्रित केले होते. त्यांनी जेव्हा मला सांगितले की मी मला हवा तो विषय निवडू शकतो. मला समारोपाच्या सत्रात बोलायचे असल्यामुळे, बहुतेक सहभागी तांत्रिक भाषणांच्या ...

शुद्ध हवा आणि आपली जबाबदारी

इमेज
                                                                                                                                                                                                                                                                                            ...

अवैध इमारती, स्मार्ट खेडी आणि ट्रम्प तात्या !

इमेज
अवैध इमारती, स्मार्ट खेडी आणि   ट्रम्प तात्या ! “एक हुशार माणूस आपल्या चुकांमधून शिकतो व त्या चुकांची पुनरावृत्ती कधीही करत नाही. पण एक शहाणा माणून एका हुशार माणसाला शोधतो व चूक टाळायची कशी हे त्याच्याकडून शिकतो … रॉय एच. विल्यम्स. “आपल्याला एक असे अध्यक्ष हवे आहेत जे अतिशय बुद्धिमान, हुशार, धूर्त व शक्तिमान असतील व ज्यांच्यामध्ये ताकद असेल” … डोनाल्ड ट्रम्प. “भोवताली अनेक अडचणी असूनही हुशारी तग धरून आहे” … मी. रॉय होलिस्टर विल्यम्स हे अतिशय प्रसिद्ध लेखक व विपणन सल्लागार आहेत जे त्यांच्या ‘विझार्ड ऑफ ॲड्स’ या पुस्तक त्रयीसाठी प्रसिद्ध आहेत. आणखी एक नाव जे जगाला आधीपासूनच माहिती आहे, परंतु जे आजकाल सर्वाधिक बहुचर्चित नाव आहे ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ऊर्फ ट्रम्प तात्या, अमेरिकेचे अध्यक्ष व तिसरे अवतरण माझे आहे, मी कुणीही नाही (उपहासाने नाही तर वस्तुस्थिती सांगतोय) व माझे शब्द आपल्यापैकी बहुतेक जण ज्या परिस्थितीत जगत आहेत त्याचा परिणाम आहे. असो, तर आता थोडे शीर्षकाविषयी सांगतो, जे थोडे विचित्र आहे (मला माहिती आहे) कारण स्मार्ट खेडी, अवैध बांधकामे व ट्रम्प यांचा परिणाम यामध्ये का...

निलगिरीज, सिनेमा नाही भविष्याचा इशारा..!

इमेज
निलगिरीज, सिनेमा नाही भविष्याचा इशारा..! "आपल्याकडे असलेलं एकमेव जैववैविध्य म्हणजे कोक आणि पेप्सी यांची पैकी एकाची निवड. आपण संपूर्ण जगाचं सौंदर्य एका मागोमाग एक अशा मूर्ख चुकांनी नष्ट करत आहोत.” — चक पॅलानिक   “मी नेहमी म्हणतो की पृथ्वी आपलं कायमचं घर नाही. ‘घर’ या शब्दात मालकीची भावना दडलेली असते. पण पृथ्वी ही एक वसतिगृहासारखी आहे — जिथे आपल्याला एकत्र राहायला, एकमेकांशी वाटून घ्यायला आणि परस्परांची काळजी घ्यायला शिकावं लागतं.” — शिवांशु के. श्रीवास्तव  "सुपरमॅन असो किंवा कॅप्टन अमेरिका — ते खरे नाहीत. आपल्या पृथ्वीला वाचवणारे खरे हिरो म्हणजे कार्यकर्ते आणि जैववैविध्याचे रक्षण करणारे लोक.” — हकान कापुजू चार्ल्स मायकेल पॅलानिक हे अमेरिकन कादंबरीकार आहेत. शिवांशु के. श्रीवास्तव हे लखनौ (भारत) येथे कार्यरत असलेले ख्यातनाम लेखक, कवी आणि कायदा व्यवसायिक आहेत. हकान कापुजू हे इस्तंबूल (तुर्की) येथील व्हीसी लॉ अँड कन्सल्टन्सीमध्ये टेक्नोव्हर्सल लीडर म्हणून कार्यरत आहेत. “आश्चर्याची बाब म्हणजे, वरील दोन कोट्स लिहिणारे लेखक कायदा क्षेत्राशी संबंधित आहेत. तरीसुद्धा त्यांनी मांडलेला वि...

कुशलता नावाची कला..!!

इमेज
    कुशलता नावाची कला..!! “कुशल माणसाला योग्य परिणामांसाठी नियुक्त केले जाते, कारणे देण्यासाठी नव्हे.” “एका चांगल्या तलवारीपेक्षाही  तलवारपटू अधिक महत्त्वाचा असतो.” ― अमित कलंत्री. अमित कलंत्री हे व्यावसायिक जादुगार व संमोहनतज्ज्ञ आहेत, जे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण व सफाईदार जादूचे खेळ व निखळ विनोदासाठी ओळखले जातात. ते त्यांच्या “ब्युटीफूल माइंड्स” या संस्थेद्वारे जादू व इतर बौद्धिक कलांचे प्रशिक्षण देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला विकीपीडियावरून समजले की ते विदर्भामधील माझ्या खामगाव नामक गावाजवळच असलेल्या अकोल्याचे आहेत. मी क्वचितच कधी एका लेखामध्ये एकाच लेखकाची दोन अवतरणे वापरली आहेत, यावरून अमित यांचे या विषयावरील प्रभुत्व दिसून येते ते म्हणजे माणसे व त्यांचा केवळ कामाबद्दलचाच नव्हे तर एकंदरच जीवनाबद्दलचा दृष्टिकोन दिसून येतो. तुम्ही आता विचारात पडला असाल (नक्कीच पडला असाल) की मी एरवी ताडोबा व आजकाल क्रिकेट हे विषय सोडून आज या कुठल्या विषयावर बोलत आहे. त्यासाठी माझ्या एका मैत्रिणीचे आभार की तिने मला चिमटा काढला व जाणीव करून दिली की मी एक अभियंता आहे व व्यावसायिकही सुद्...