मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!
मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..! “प्रत्येक पोलिसाला हे माहिती असते की प्रत्येक वेळी तो जेव्हा अंगावर गणवेश चढवतो, तेव्हा तो इतरांचे रक्षण करण्यासाठी धोका पत्करत असतो ”… माईक पार्सन. “लोक रात्री त्यांच्या घरी आरामात झोपू शकतात कारण काही व्यक्ती वर्दी घालून त्यांच्यावतीने वाईट व्यक्तींना तोंड देण्यासाठी सज्ज असतात.”... जॉर्ज ऑरवेल. मायकल लिन पार्सन हे अमेरिकी राजकारणी व कायद्याची अंमलबजावणी करणारे माजी अधिकारी होते व एरिक आर्थर ब्लेअर, जे जॉर्ज ऑरवेल या नावाने लेखन करत, सुप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार, निबंधलेखक, पत्रकार, व टीकाकार होते. त्यांचे लेखन अतिशय प्रवाही, सामाजिक अन्यायाविषयी जागरुकता निर्माण करणारे, सर्वंकषवादाला विरोध करणारे व लोकशाही समाजवादाला ठाम पाठिंबा देणारे होते. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता आपले अनेक देशबांधव ऑरवेल व माईक यांच्या वरील शब्दांशी सहमत होणार नाहीत. याचे कारण म्हणजे कोणतेही वर्तमानपत्र वाचा, बहुतेकवेळा वर्दीधारि व्यक्ती(पोलिस) चुकीच्याच कारणाने चर्चेत असतात. एकतर त्या बातम्या पोलीसांनी निष्पाप लोकांवर केलेल्या अत्य...