पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाबा

इमेज
  13 03 35 - 18 09 26 वडील म्हणजे फक्त जन्मदाता नव्हे,  तर ती एक एज्युकेशन सिस्टीम आहे,  नशिबवान  लोकांनाच अ‍ॅडमिशन मिळते इथे... बाबा,  92 वर्षे,  "बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही बडी होनी चाहीये", अनेक वर्षे ह्या डायलॉगचा अर्थ समजला नव्हता,  की काय फरक आहे बडी काय आणि लंबी काय,  दोन्हीचा मतलब मोठे किंवा खूपच ना!! बाबांना बघितला की कळायचं जिंदगी बडी भी हो सकती है और लंबी भी!! बाबा, तुम्ही फक्त तुमच्या मनाने जगलात आणि गेलात पण तसेच कारण 6च महिन्यापूर्वी वाढदिवसाला तुमचा थकलेला जरी फोटो होता तरी मीच कॅप्शन दिली होती, "I am old, not obsolete" i.e. म्हातारा झालोय, संपलो नाहिये! पण प्रत्येक प्रवास कुठेतरी कधीतरी संपतोच,  आणि मागे राहतात प्रवासाच्या आठवणी! तुम्ही मला दिलेल्या असंख्य शिकवणी मधून सिनेमाचा वेड ही एक आणि कदाचित आपल्या फारच थोड्या साधर्म्य गुणांपैकी एक, म्हणुनच सिनेमाचे संदर्भ मला फार कामात येतात स्वतःला एक्सप्रेस करायला! आजच्या ( माझ्या सुद्धा) मुलांकडे बघितले आणि त्यांच्या वडील   ( आणि आई पण) या व्यक्ती कडून अपेक्षा आणि त्या अपे...

हनुमान अंश; प्रवास, श्रद्धा आणि आशेचा!

इमेज
  हनुमान अंश ; प्रवास , श्रद्धा आणि आशेचा! " श्रद्धा म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही त्यावर विश्वास ठेवणे ; आणि या श्रद्धेचे फलित म्हणजे आपण ज्यावर विश्वास ठेवला , तेच प्रत्यक्ष अनुभवणे." — सेंट ऑगस्टिन " श्रद्धा ती असते जी अदृश्याला पाहू शकते , अकल्पनीय गोष्टींवर विश्वास ठेवू शकते आणि अशक्य मानल्या गेलेल्या गोष्टी प्रत्यक्षात साध्य करू शकते." — कॉरी टेन बूम.  " श्रद्धा ही अशी ताकद आहे , जिच्या बळावर उध्वस्त झालेली दुनिया पुन्हा एकदा  उभी राहू शकते." — हेलन केलर “ मुद्दा श्रद्धेचा नाही , तर त्या श्रद्धेची गोष्ट तुम्ही कशी मांडता , हा आहे.” — मी.   ऑगस्टिन ऑफ हिप्पो , ज्यांना ' सेंट ऑगस्टिन ' म्हणूनही ओळखले जाते , हे थागास्ते येथील एक ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ होते (त्यांचे निधन २८ ऑगस्ट ४३० इ.स. रोजी झाले). कॉर्नेलिया अर्नाल्डा जोहाना "कॉरी" टेन बूम या एक डच घड्याळ मेकर आणि नंतर ख्रिस्ती लेखिका व सार्वजनिक वक्त्या होत्या. हेलन  केलर या एक अमेरिकन लेखिका , दिव्यांग हक्क कार्यकर्त्या , राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्यात्...

रेराचे दशक आणि रिअल इस्टेट!!

इमेज
रेराचे दशक आणि रिअल इस्टेट!! “कायदे नीट समजून घ्या, म्हणजे ते प्रभावीपणे कसे मोडायचे हे तुम्हाला कळेल.” ― दलाई लामा 14वे. “जगातील सर्वात मोठे गुन्हे हे नियम मोडणाऱ्या लोकांकडून नव्हे, तर नियम पाळणाऱ्या लोकांकडूनच केले जातात…” ― बँक्सी “भारतात कायदेशीर व्यवसाय करतानाची एक दुर्दैवी वस्तुस्थिती ही आहे की, तुम्हाला अशा व्यक्तीशी स्पर्धा करावी लागते जो कोणत्याही कायद्याचे किंवा नियमाचे पालन करत नाही.” ― मी        बरं, पहिल्या नावाचा परिचय करून देण्याची गरज नाही, कारण कम्युनिस्ट राजवटीच्या (चीनच्या) विरोधात ठामपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका आणि धैर्य सर्वांना माहितच आहे. मनोरंजक बाब म्हणजे, बँक्सी हा इंग्लंडमध्ये राहणारा आणि टोपणनावाने ओळखला जाणारा स्ट्रीट आर्टिस्ट (रस्त्यावरील कलाकार), राजकीय कार्यकर्ता आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने सार्वजनिकपणे आपली ओळख कधीच जाहीर केलेली नाही. मला याचे मुळीच नवल वाटत नाही, कारण व्यवस्थेबद्दल (शासनाबद्दल) अशा प्रकारची मते असतील तर आपली ओळख लपवणेच योग्य ठरते, कारण येत्या दिवसांत मलाही कदाचित तसेच करावेसे वाटू शकते (उपरोध), पण जोपर्य...