पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"देजा वू आणि ताडोबा..!

इमेज
                    "देजा वू आणि ताडोबा..! "देजा वू एक विश्वासू मार्ग दाखवतो जो घेण्यासारखा आहे." - टी.एफ. हॉज हॉज अमेरिकनच आहे आणि त्याचा जन्म लॉस एंजेलिसमध्ये झाला आहे आणि तो "फ्रॉम विदिन आय राइज" नावाच्या सेल्फ डेवलपमेंटवरील पुस्तकाचा लेखक आहे! मी त्याचे हे शब्द का वापरले, कारण ही शेअरिंग त्या सब्जेक्टबद्दल आहे (अरे हो, त्यात ताडोबा पण आहे, वैधानिक इशारा) आणि हा एक शब्द आहे ज्याबद्दल मी खूप दिवसांपासून कुतूहल ठेवुन आहे आणि तो म्हणजे, देजा वू (ताडोबा नाही)! मला वाचनाची आवड आहे आणि मी आयुष्यातील बहुतेक तास वाचनात घालवले आहेत हे सांगण्याचा मला अभिमान आहे आणि जंगलातल्या वाघाप्रमाणे, माझ्या वाचनाला सीमा नाहीत जसे की टिनटिन ते झेन ते शेरलॉक होम्स ते चाचा चौधरी ते सिगमंड फ्रायड (या सर्वांसाठी कृपया गुगल करा) मी काहीही वाचले आहे आणि वाचतो. अनेकदा मला ही देजा वू हा संदर्भ आढळला आहे, मला नेहमीच प्रश्न पडतो की गुगल ते कसे दुरुस्त करते कारण मला हा शब्द टाइपही करता येत नाही! जरी मला त्याचा अर्थ समजला आहे कारण आज तुम्हाला कोणत्याही शब्दाची व्याख्या...

शुभमन गिल, जिद्द आणि इतिहास!!

इमेज
 शुभमन गिल, जिद्द आणि इतिहास!! "इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत नाही, पण तो त्यासारखा वाटतो."― मार्क ट्वेन  "आपण जे निर्माण करतो त्यापेक्षा आपण जे नष्ट करतो त्यासाठी आपली जास्त आठवण ठेवली जाईल."― चक पॅलानिक   "महान क्रिकेटपटू विराट कोहली यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते क्रिकेटमध्ये उत्कृष्टता साधण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याऐवजी ते 'सुधारणा' या संकल्पनेवर विश्वास ठेवतात – म्हणजे दररोज (प्रत्येक सामन्यात) आपल्या पूर्वीच्या स्वरूपापेक्षा अधिक चांगले होणे." मार्क ट्वेन, संपूर्ण साहित्याच्या इतिहासातील कदाचित टॉप दहा लेखकांपैकी एक. तर चक पॅलानिक, अमेरिकेतील नव्या युगातील कल्पनारम्य साहित्य लिहिणारा लेखक. आणि विराट कोहली? बरं, जर त्याचं नाव माहीत नसेल, तर मी नेहमी म्हणतो तसं (वैधानिक इशारा) तुम्ही इथेच वाचणं थांबवू शकता, कारण ही गोष्ट आहे क्रिकेटबद्दल (पुन्हा एकदा)! खूप क्वचित असं घडतं की मी एका आठवड्यात दोनदा एकाच विषयावर लिहितो, आणि तो विषय ताडोबा नाही (उपहास समजावं!) तर क्रिकेट आहे, आणि तेही खूप आनंदाने लिहितोय. त्यामुळे टीम इंडियाचे मनःपूर्वक आभा...

शाश्वत विकास, म्हणजे काय रे भाऊ..??

इमेज
शाश्वत विकास, म्हणजे काय रे भाऊ..?? “सर्वात शाश्वत मार्ग म्हणजे कोणत्याही गोष्टींची निर्मिती न करणे. दुसरा सर्वात शाश्वत मार्ग म्हणजे, जी समस्या सोडवण्यात आलेली नाही ती सोडवण्यासाठी काहीतरी उपयोगी तयार करणे.” – थॉमस सिग्जगार्ड.   “शाश्वतता म्हणजे कमी अपाय करणे असा अर्थ आता होत नाही. तर त्याचा अर्थ काहीतरी अधिक चांगले करणे असा होतो.” – जोशेन झेईट्झ “पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण होतील एवढे पुरेसे देत असते, प्रत्येक माणसाची हाव पुरवण्याएवढे नाही.”— महात्मा गांधी   थॉमस, हे रॉश डॅनिश अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्समधून १९९५ साली वास्तुविशारद झाले. तर जोशेन झेईट्स हे व्यावसायिक हर्ले-डेव्हिडसन, इंकचे सीईओ म्हणून, लाईव्हवायर इंकचे अध्यक्ष म्हणून, व त्याआधी बराच काळ पूमाचे सीईओ म्हणून सर्वाधिक ओळखले जातात. तिसऱ्या नावाची काहीही ओळख देण्याची गरज नाही व या व्यक्तीच्या अवतरणाचे वैशिष्ट्ये म्हणजे वरील दोन अवतरणांमध्ये तथाकथित विकसित जगातील व्यक्तींनी शाश्वततेविषयी जे म्हणले आहे, त्याची जाणीव महात्मा गांधींना आधीच झाली होती व त्यांनी जवळपास आठ दशकांपूर्वी हे म्हटले होते. गांधीजींनी शाश्वत व...

क्रिकेट, भारत इंग्लंड टेस्ट मॅच आणि इतिहासाचा धडा!!

इमेज
क्रिकेट , भारत इंग्लंड टेस्ट मॅच आणि इतिहासाचा धडा!!   “ खेळामध्ये तुलना करून काहीही उपयोग नसतो , विशेषतः दोन युगांमध्ये व पिढ्यांमध्ये , कारण यामध्ये प्रतिस्पर्ध्याच्या दर्जापासून ते खेळासाठीचे वातावरण यासारखे अनेक वेगवेगळे घटक विचारात घ्यावे लागतात’… “ एखादा क्रिकेटपटू किती महान आहे याचे मोजमाप त्याने किती शतके केली आहे यावरून होत नाही , तर त्याने खेळावर केलेल्या परिणामावरून होते” … … सुनील गावस्कर मी, हा लेख लिहीण्यास सुरुवात केली तेव्हा भारतीय संघाने अनेक प्रकारे इतिहास रचला होता व जेव्हा विषय क्रिकेट असतो तेव्हा वरील दोन्ही अवतरणे ज्यांची आहेत त्यांच्याशिवाय या लेखासाठी आघाडीचा खेळाडू म्हणून दुसरे कोण असू शकते! मी सुनील गावस्कर यांच्याविषयी बोलतो आहे व तुम्हाला या नावाची ओळख हवी असेल तर तुम्ही लेखाचे वाचन इथेच थांबवू शकता व इन्स्टाग्रामवर फनी (म्हणजे मूर्खपणा) रिल्स पाहू शकता (उपरोधिक बोलतोय). असे पाहिले तर दररोज काही ना काही इतिहास रचला जात असतो कारण गेला दिवस हा इतिहासच असतो (मास्टर उग्वे , kung fu panda, कृपया गूगल करा) परंतु तुम्ही जेव्हा म्हणता की इतिहास घडवला गेला किंवा ...