निलगिरीज, सिनेमा नाही भविष्याचा इशारा..!
निलगिरीज, सिनेमा नाही भविष्याचा इशारा..! "आपल्याकडे असलेलं एकमेव जैववैविध्य म्हणजे कोक आणि पेप्सी यांची पैकी एकाची निवड. आपण संपूर्ण जगाचं सौंदर्य एका मागोमाग एक अशा मूर्ख चुकांनी नष्ट करत आहोत.” — चक पॅलानिक “मी नेहमी म्हणतो की पृथ्वी आपलं कायमचं घर नाही. ‘घर’ या शब्दात मालकीची भावना दडलेली असते. पण पृथ्वी ही एक वसतिगृहासारखी आहे — जिथे आपल्याला एकत्र राहायला, एकमेकांशी वाटून घ्यायला आणि परस्परांची काळजी घ्यायला शिकावं लागतं.” — शिवांशु के. श्रीवास्तव "सुपरमॅन असो किंवा कॅप्टन अमेरिका — ते खरे नाहीत. आपल्या पृथ्वीला वाचवणारे खरे हिरो म्हणजे कार्यकर्ते आणि जैववैविध्याचे रक्षण करणारे लोक.” — हकान कापुजू चार्ल्स मायकेल पॅलानिक हे अमेरिकन कादंबरीकार आहेत. शिवांशु के. श्रीवास्तव हे लखनौ (भारत) येथे कार्यरत असलेले ख्यातनाम लेखक, कवी आणि कायदा व्यवसायिक आहेत. हकान कापुजू हे इस्तंबूल (तुर्की) येथील व्हीसी लॉ अँड कन्सल्टन्सीमध्ये टेक्नोव्हर्सल लीडर म्हणून कार्यरत आहेत. “आश्चर्याची बाब म्हणजे, वरील दोन कोट्स लिहिणारे लेखक कायदा क्षेत्राशी संबंधित आहेत. तरीसुद्धा त्यांनी मांडलेला वि...