शेअरिंगवाली दिवाळी !
शेअरिंगवाली दिवाळी ! " मनातला घनदाट अंधार दूर केल्याशिवाय , घराबाहेरील दिवा कधीच उजळू शकत नाही." ― कपिल राज " मी भारतीय आहे आणि आम्ही सर्व धर्माचे , सर्व प्रदेशांतील सण उत्साहाने एकत्र साजरे करतो. म्हणूनच तर या देशाला "इन्क्रेडिबल इंडिया"(अतुल्य भारत) म्हणतात!" ― विनायक मुरलीधरन. " वाटणे (शेअरिंग) ही गमतीशीर गोष्ट आहे , जसे की वाटल्याने आनंद वाढतो , मात्र वाटल्याने दुःख कमी होतं." ― मी. " सण" , हा शब्द कानावर पडला तरी मनात एक वेगळीच जादू निर्माण होते! लहान मुलांसाठी जशी ' डिझनी ' ची जगत्प्रसिद्ध दुनिया असते ना , तसंच माझ्यासाठी आपलं ' ताडोबा '! ( हसू नका , काळजी करू नका , आजची गोष्ट जंगलाची नाही , तर आपल्या माणसांची आहे!) 150 कोटींहून अधिक जनता , 33 कोटी देव-देवता , 10 हून अधिक धर्म , ४० हून अधिक प्रमुख भाषा आणि 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेश... ((जातींबद्दल तर मी बोलतच नाही कारण माझा त्यावर विश्वास नाही). अशा अथांग आणि विविधतेने नटलेल्या देशात दररोज कुठे ना कुठे कसला ना कसला उत्सव साजरा होत असतो ! ...