पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉक्टर, ट्रॅफिक, सोलर, वाघ, सरकार आणि मी एक बांधकाम व्यावसायिक !!

इमेज
    डॉक्टर, ट्रॅफिक, सोलर, वाघ, सरकार आणि मी  एक बांधकाम व्यावसायिक !! “लोकांनी आपल्या सरकारला घाबरण्याची गरज नाही, तर सरकारने आपल्या जनतेला घाबरले पाहिजे.” … अ‍ॅलन मूर. “लोकशाही म्हणजे दोन लांडगे आणि एका मेंढराने रात्रीच्या जेवणासाठी काय असावे यावर मतदान करण्यापेक्षा काहीतरी अधिक असले पाहिजे.” … जेम्स बोव्हार्ड “समाजवादाची अडचण हीच आहे की, शेवटी सगळ्यांचे पैसे संपून जातात.” … मार्गारेट थॅचर “माझ्यासाठी सरकार हे देवासारखे आहे; मी त्याला अजून पाहिलेले नाही, तरीही माझा त्यावर विश्वास आहे आणि ते सर्वत्र असून प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवते.” … मी.        मूर आणि बोव्हार्ड हे अमेरिकेतून आले आहेत, ज्याला विचारांचे स्वातंत्र्य आणि संधींची भूमी मानले जाते (किंवा मानले जात होते). तर दुसरीकडे, 'आयर्न लेडी' (मार्गारेट थॅचर) या जगातील सर्वात खुल्या आणि स्वतंत्र लोकशाहीचे प्रतिनिधित्व करतात, जिथे आजही राजा किंवा राणी सर्वोच्च राज्यकर्ते म्हणून विराजमान असतात. मी माझे विचार त्यांनी मांडलेल्या या सुज्ञांच्या शब्दांतून आणि माझ्या जीवनाच्या अनुभवातून मांडले आहेत! ...

पुणे महानगर, यूडिसीपीआर; विकास का सूज !

इमेज
   पुणे महानगर, यूडिसीपीआर; विकास का सूज ! “केवळ वाढीसाठी वाढ ही कर्करोगाच्या पेशीची विचारसरणी आहे” … एडवर्ड ॲबे “कुणीही मूर्ख नियम बनवू शकतो व कुणीही मूर्खच अशा नियमांचे पालन करू शकतो.” … हेन्री डेव्हिड थोरो “तुम्ही केवळ तुमच्या मनातल्या मनात विचार करून एखादे शेत नांगरू शकत नाही.” … गॉर्डन बी. हिंकले “कोणत्याही खेळाचे नियम जेव्हा योग्य असतील व त्यानुसार तो खेळला जात असेल तर तो खेळताना मजा येते” … मी      बऱ्याच काळानंतर मी पुन्हा एकदा माझ्या सर्वात आवडत्या (म्हणजे नावडत्या) विषयाबद्दल लिहीतोय, तो म्हणजे नागरी नियोजन, व तेदेखील आपल्या प्रिय पुणे नगरीचे (महानगर असे वाचावे). मला माहितीय, अनेकजण म्हणतील की आम्ही पुढे वाचून वेळ का घालवू कारण तुम्ही आधीही ते केलेले आहे, तर यातील उपहास न समजल्याबद्दल मी तुम्हाला माफ करतो. मी लिहीत राहतो कारण मी जुन्या पिढीतला आहे जी चांदोबातील (जेन झी कृपया गूगल करा) विक्रम व वेताळच्या गोष्टी वाचत मोठी झाली. या गोष्टींमध्ये राजा विक्रम वेताळाला पाठकुळी घेऊन जाण्याचा हट्ट सोडत नाही तर वेताळ नेहमी राजा विक्रमाला त्याचे मौन राहण्याचे आ...

कचरा, समाज आणि शहर!

इमेज
कचरा,  समाज आणि शहर! “जर तुमच्या डोक्यात(विचारात) कचरा असेल, तर कितीही सफाई कर्मचारी तुमची मदत करू शकत नाहीत.” ― टॅमरलान कुझगोव्ह. “आपण जेवढा कचरा करतो त्यातून आपल्याला इतरांबद्दल किती आदर आहे हे समजते.” ― स्ट्युअर्ट स्टॅफोर्ड. “आपण आपल्या कचऱ्याचे काय करतो यावरून आपण खरे कोण आहोत, हे ठरते” --- मी     मला खात्री आहे की कुझगोव्ह व स्टॅफोर्ड यांची अवतरणे व त्यातून मी काढलेला निष्कर्ष यावरून तुम्हाला लेखाचा विषय व लेखातून काय मांडणार आहे याची पुरेशी कल्पना आली असेल, जर तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल (म्हणजे अजून वाचत असाल) व इराण युध्द व झुरळ आंदोलन या शिवाय आपल्याभोवती काय सुरू आहे याचा माग ठेवत असाल तर तुम्हालालक्षात येईलच, हा लेख कचऱ्याविषयी आहे, याविषयी लिहीण्याचे कारण म्हणजे कचरा आपल्या आरोग्यासाठी घातक आहे हे आपण सर्वजण जाणतो परंतु आता ज्याप्रमाणे  समुद्र किंवा नदीचे पाणी किंवा आग त्यांच्या मार्गात जे काही येईल त्याला गिळंकृत करते त्याप्रमाणे कचऱ्यामुळे आता माणसांचा खरोखरच जीव जातोय. अशा दुर्दैवी घटनांनंतर जर आपण त्याकडे आपले डोळे व कान (व नाकही) बंद करून बसणार असू ...

पुनर्विकास का लोभविकास?

इमेज
 पुनर्विकास का लोभविकास?  “ताजेतवाने होण्यासाठी व नव्या वाटा शोधण्यासाठी नेहमी वेळ काढा. तुम्ही एखाद्या मार्गावर वाटचाल करत असताना वेळ काढा. कोणताही एक मार्ग सर्वोत्तम नसतो. जेव्हा मार्ग वेगवेगळे असतात-तेव्हा उपाययोजनाही वेगवेगळ्या हव्या. सुधारणा ही विकासाची निरंतर प्रक्रिया आहे ज्यामुळे अधिक चांगले परिणाम मिळू शकतात!”… जोसेफ एस. स्पेंस सिनिअर. "काही महान करण्यासाठी काही चांगल्या गोष्टींचा त्याग करावा लागला तरी घाबरू नका" … जॉन. डी. रॉकफेलर "बहुतेकवेळा आपल्या हव्यासामुळे आपण जे निर्णय घेतो त्यामुळे आपण अडचणीत येतो" … मी. जोसेफ यांचे अवतरण आपल्याला बदलाचे किंवा पुनरुज्जीवित होण्याचे महत्त्व समजून सांगते. आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे (त्यांच्या काळातील) अवतरण हे माझ्या लेखाचा विषय विचारात घेऊन वापरले नसले तरीही, त्यातून आपल्याला अधिक चांगल्या जीवनाचा मार्ग दिसतो, तर माझे जे शब्द आहेत ते वरील दोन महान व्यक्तींच्या अवतरणावर व मला यासंदर्भात अवतीभोवती काय दिसते यावर आधारित आहे. तर हा लेख पुनर्विकासाविकासाविषयी आहे, संपूर्ण पुणे शहरात हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे...

सीजेपी; झुरळांचा धडा!!

इमेज
  सीजेपी; झुरळांचा धडा!!  “अंधत्वाचे सर्वात धोकादायक स्वरूप म्हणजे तुमचा दृष्टिकोन हेच केवळ वास्तव आहे असा विचार करणे ” ... फेड्रिक निशे. “नियम लहान मुलांसाठी असतात. हे युद्ध आहे, व युद्धातील एकमेव गुन्हा म्हणजे पराभूत होणे.”.. जो. ॲबरक्रोम्बी “तुम्ही नेतृत्व करत असलेल्या तरुण लोकांना जे सर्वोत्तम आहे त्यावर विश्वास द्या, व त्यांना बुद्धिने दिशा द्या, भीतीने नव्हे.” … टिम एल्मोर "एखादा नेता करू शकतो अशी सर्वात मोठी चूक म्हणजे, जनतेला गृहित धरणे "… मी.        मला लेखाचा विषय समजून सांगण्याची गरज नाही कारण तुमच्यापैकी बहुतेकांना अवतरणांवरून पुरेशी कल्पना आली असेल, मानवी वर्तनाविषयी बोलायचे झाल्यास त्याचे नेमके वर्णन करण्यात कुणीही निशे यांचा हात धरू शकणार नाही, ॲबरक्रोम्बी व एल्मोर आपल्याला तरुणांना कसे हाताळायचे याविषयी सांगतात व माझे शब्द या सगळ्यांचा काय परिणाम होतो याचा सारांश सांगतो. होय, हा लेख सीजेपीविषयी आहे (गूगल करण्याचीही गरज नाही) व तो आपल्या देशातील समाजाच्या सध्याच्या परिस्थितीविषयी आहे व त्याहीपेक्षा जास्त त्यातून समाजाला किंवा बूमर्सना (तुम्ह...