ग्रोइंग-अप; अब तक 57..!!
ग्रोइंग-अप; अब तक 57..!! “मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात तक्रार करणे व कारणे देणे थांबवता; तुम्हाला जाणीव होते की तुमच्या आयुष्यात जे काही होते ते तुम्ही आधी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आहे व तुमचे आयुष्य बदलण्यासाठी नवीन निर्णय घेण्यास सुरुवात करता.” ― रॉय टी. बेनेट. “तुम्ही कोण आहात याचा शोध लावणे हे आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान आहे, दुसरे आव्हान म्हणजे तुम्हाला जे काही समजले आहे त्यात आनंद मानणे.” ― ऑस्कर ऑलिक-आईस. “मोठे होणे म्हणजे तुमच्या कृतींमधील उद्दिष्ट शोधण्याची क्षमता”.- मी. प्रिय दादा व छोटा, आणखी एक वर्ष सरत आलेय व नवीन वर्ष येऊ घातलेय, तुम्ही त्याकडे कसे पाहता यावर ते अवलंबून आहे. माझा वाढदिवसही याच महिन्यात असतो त्यामुळे मी या महिन्याकडे नवीन सुरुवात म्हणून व तुम्हाला माझे वार्षिक बोधामृत पाजण्याची एक संधी म्हणून पाहतो. हो पहिलेच सांगतो, मी तुमचा खुप आभारी आहे, कारण मी जे काही वार्षिक ग्यान सांगतो ते तुमच्यापेक्षाही जास्त माझ्या स्वतःसाठी असते. विशेषतः ज्याप्रकारे सरते वर्ष गेले , मी आता जरा आणखी जास्त आत्मपरीक्षण करू लागलो आहे (अनेकांना कदाचित वि...