पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सहजीवन!!

इमेज
 सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सहजीवन!! “बरेचदा आपण ज्याला काही प्रजातींसाठी विकास म्हणतो, तो इतर अनेक प्रजातींकरता विनाश असू शकतो”… मी. मला जाणीव आहे की या ओळी माझ्यासारख्या स्थापत्य अभियंता व बांधकाम व्यावसायिक असलेल्या व्यक्तीच्या तोंडी नव्हे तर एखाद्या कट्टर पर्यायवरणवादी किंवा संवर्धनवादी व्यक्तीच्या तोंडी अधिक शोभतील (म्हणजे योग्य वाटतील) परंतु म्हणून विकासाच्या बाबतीतली वस्तुस्थिती बदलत नाही, हाच विचार मी नुकत्यात दिलेल्या एका व्याख्यानात मांडला. निमित्त होते, जो खरेतर एक प्रकारे माझा गौरवच होता कारण मला राज्यभरातील अनेक  तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांच्या एका गटासमोर भाषण देण्यासाठी (विचार मांडण्यासाठी) आमंत्रित करण्यात आले होते. शासकीय तंत्रनिकेतन, पुणे ज्याला सर्वजण जीपीपी म्हणून ओळखतो, तिथे काम करणाऱ्या माझ्या स्नेही प्राध्यापक सीमा व त्यांच्या सहकारी प्राध्यापक सिंधू यांनी मला आमंत्रित केले होते. त्यांनी जेव्हा मला सांगितले की मी मला हवा तो विषय निवडू शकतो. मला समारोपाच्या सत्रात बोलायचे असल्यामुळे, बहुतेक सहभागी तांत्रिक भाषणांच्या ...

शुद्ध हवा आणि आपली जबाबदारी

इमेज
                                                                                                                                                                                                                                                                                            ...

अवैध इमारती, स्मार्ट खेडी आणि ट्रम्प तात्या !

इमेज
अवैध इमारती, स्मार्ट खेडी आणि   ट्रम्प तात्या ! “एक हुशार माणूस आपल्या चुकांमधून शिकतो व त्या चुकांची पुनरावृत्ती कधीही करत नाही. पण एक शहाणा माणून एका हुशार माणसाला शोधतो व चूक टाळायची कशी हे त्याच्याकडून शिकतो … रॉय एच. विल्यम्स. “आपल्याला एक असे अध्यक्ष हवे आहेत जे अतिशय बुद्धिमान, हुशार, धूर्त व शक्तिमान असतील व ज्यांच्यामध्ये ताकद असेल” … डोनाल्ड ट्रम्प. “भोवताली अनेक अडचणी असूनही हुशारी तग धरून आहे” … मी. रॉय होलिस्टर विल्यम्स हे अतिशय प्रसिद्ध लेखक व विपणन सल्लागार आहेत जे त्यांच्या ‘विझार्ड ऑफ ॲड्स’ या पुस्तक त्रयीसाठी प्रसिद्ध आहेत. आणखी एक नाव जे जगाला आधीपासूनच माहिती आहे, परंतु जे आजकाल सर्वाधिक बहुचर्चित नाव आहे ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ऊर्फ ट्रम्प तात्या, अमेरिकेचे अध्यक्ष व तिसरे अवतरण माझे आहे, मी कुणीही नाही (उपहासाने नाही तर वस्तुस्थिती सांगतोय) व माझे शब्द आपल्यापैकी बहुतेक जण ज्या परिस्थितीत जगत आहेत त्याचा परिणाम आहे. असो, तर आता थोडे शीर्षकाविषयी सांगतो, जे थोडे विचित्र आहे (मला माहिती आहे) कारण स्मार्ट खेडी, अवैध बांधकामे व ट्रम्प यांचा परिणाम यामध्ये का...