वारसा शिकवतांना!!
वारसा शिकवतांना!! “वडिलांकडून त्यांच्या मुलाला मिळणारा सर्वोत्तम वारसा म्हणजे, योग्य चारित्र्याचा वारसा” … मला कल्पना आहे की चारित्र्य, नैतिकता, मूल्ये, तत्वे असे शब्द आजच्या जगासाठी राहीले नाहीत तरीही एक गोष्ट तितकीच खरी आहे की, हजारो लोकांनी एखाद्या चुकीच्या गोष्टीचे पालन करायला सुरुवात केली तरीही ती गोष्ट चुकीचीच रहाते, हाच माझा नेहमी विश्वास राहिला आहे व तुमचा ज्या गोष्टीवर विश्वास असतो तेच तुमचे चारित्र्य बनते, हे विसरू नको माझ्या मुला! म्हणूनच माझ्या मुलांच्या नजरेत मी कदाचित बावळट असलो, तरीही मी (एक वडील म्हणून) थांबता कामा नये, आधी माझ्या मुलांना (किंवा मुलीला) योग्य ग...