नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड
नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड "कठीण काळ खंबीर माणसं घडवतो. खंबीर माणसं चांगला काळ आणतात. चांगला काळ दुर्बळ माणसं निर्माण करतो. आणि दुर्बळ माणसं पुन्हा कठीण काळ आणतात." ― जी. मायकेल हॉफ. "स्वतःवर प्रेम करणारे पुरुष धोकादायक ठरू शकतात; पण पुरुषांवर प्रेम करणाऱ्या स्त्रिया त्याहूनही अधिक धोकादायक ठरू शकतात." ― नाओमी वोल्फ. "शॉर्टकट आणि सोपे रस्ते बऱ्याचदा आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात, हे आपल्याला माहीत असतं. तरीही आपल्यापैकी बहुतांश जण तोच रस्ता निवडतात; कारण बहुधा चुकीच्याच ठिकाणी पोहोचणं आपल्या नशिबात लिहिलेलं असतं म्हणून..." ― मी नीट (NEET), टीईटी (TET) आणि लोहगड— मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेकांना यातील पहिल्या आणि शेवटच्या शब्दाबद्दल (म्हणजे नीट आणि लोहगडबद्दल) आतापर्यंत नक्कीच माहिती झाली असेल. पण यातला जो दुसरा शब्द आहे 'TET', तो या दोन्ही गोष्टींना जोडणारा एक दुवा आहे; आणि त्याबद्दल फारशा लोकांना माहीत नाही, कारण तो सगळ्यांच्याच उपयोगाचा विषय नाही! हे लेख लिहिताना सुरुवातीलाच अशी 'हिचकॉक' (Hitchcock - रहस्यमय क...