पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बांधवगड टु गुंजेवाही(ताडोबा); वाघ आणि मनुष्य !!

इमेज
बांधवगड  टु गुंजेवाही(ताडोबा); वाघ आणि मनुष्य !! “आपल्याकडे कोक विरुद्ध पेप्सी एवढीच जैवविविधता शिल्लक राहणार आहे” … चुक पलाहनिउक. “आपल्याकडे आता जैवविविधता वाचवण्याचे सर्वात स्वार्थी कारण आहे – ते म्हणजे आपले स्वतःचे कल्याण.” … डॅन सॅलॅडिनो “आम्हाला वाघ नको आहेत, तुम्हाला वाघ आवडत असतील तर आमच्या गावातून सगळे वाघ घेऊन जा व त्यांना तुमच्या शहरातच ठेवा” … ताडोबाजवळ 22 मे 26 रोजी एका वाघीणीने केलेल्या हल्ल्याविषयी इन्स्टाग्रामच्या पोस्टवर अशी टिप्पणी करण्यात आली होती. “वाघाला निसर्गाचा असा शाप आहे की, इतर सर्व प्रजाती एकतर त्याचे सावज असतात किंवा शत्रू” … मी.          माझ्या सर्वात आवडत्या जंगलांपैकी एक असलेल्या बांधवगढ अभयारण्याविषयीचा हा लेख मी आधी संजय दुबरी अभयारण्याविषयीच्या लेखासोबतच जोडणार होतो. परंतु तो लेख अतिशय मोठा (धुरंधर  सारखा) झाला व लोकांना एवढा मोठा लेख एकाचवेळी वाचायला लावणे म्हणजे मोठी शिक्षा ठरली असती. दुसरे म्हणजे मी जेव्हा माझ्या बांधवगढच्या दौऱ्याविषयी लिहायला सुरुवात केली तेव्हा वन्यजीवनातील दोन अतिशय दुःखद बातम्या आल्या. त्यातली...

माननीय पंतप्रधान, सार्वजनिक वाहतूक आणि जनता..!!

इमेज
माननीय पंतप्रधान, सार्वजनिक वाहतूक आणि जनता..!! पंतप्रधानांना खुले पत्र. “तुम्ही एखादे शहर तिथली सार्वजनिक वाहतूक यंत्रणा वापरल्याशिवाय समजून घेऊ शकत नाही.” ― इरोल ओझान “शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी चांगली वाहतूक यंत्रणा, तसेच चांगले रस्ते आवश्यक आहेत.” ― लैला गिफ्टी अकिता "शक्य असेल तिथे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करा. मेट्रोचा, इलेक्ट्रिक बसचा व सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा, कारचा सामूहिक वापर करण्यास चालना द्या." ... मा. नरेंद्र मोदीजी. "    खर म्हणजे  मला स्वतःला गाडी चालवायाला अजिबात आवडत नाही, मला ड्रायव्हर  ठेवणे परवडू शकते आणि आपल्या रस्त्यांवरून प्रवास करायला खूप जास्त वेळ लागत असला तरीही मला तो प्रवास आवडतो" … मी. माननीय पंतप्रधान सर,         माझ्या पत्राच्या सुरुवातीलाच (पत्राचा सूर ठरवण्यासाठी) पंतप्रधान वगळता इतर वाचकांसाठी काही प्रश्न विचारत आहे; तुम्हाला मे महिन्यामध्ये वर्तमान पत्र वाचताना (म्हणजे तुम्ही वाचत असाल तर) काही वेगळे लक्षात आले आहे का? या काळात आपल्या शाळांना अधिकृतपणे सुट्ट्या असतात व पर्यटन सर्वाधिक असण्...

मा. नरेंद्र मोदीजी, अमितजी शाह, यांना ताडोबामधील वाघांचे विनंती पत्र !

इमेज
माननीय श्री. नरेंद्र मोदीजी व श्री. अमितजी शहा,  ताडोबातल्या वाघांचा सप्रेम नमस्कार!!   “वन्यप्राणी हे हिंसक कमी व या जगातल्या अनेक माणसांपेक्षाही अधिक सहृदयी आहेत” ― मुनिया खान. “समृद्ध वनराई व सातत्याने विस्तारत चाललेले रस्त्यांचे जाळे यातील प्रत्येक वळणावर, रस्त्यावरील अपघातातील प्राण्यांचे मृत्यू ही नित्याची बाब आहे, वन्यजीवांची सातत्याने वाढत्या मानवी हस्तक्षेपामध्ये जगण्यासाठी सुरू असलेली धडपड यातून अधोरेखित होते.” ― रोव्ह माँट्यूक्स. ‘हा देश विश्वासावर जगतो. केवळ दोन माणसे काही म्हणाली, म्हणून सगळे लोक झुकत नाहीत”…. अमितजी शहा, केंद्रीय गृहमंत्री, भारत. “माझा असा ठाम विश्वास आहे की सर्व प्रश्नांवर संवादातून तोडागा काढता येतो” … श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत. “वाघांच्याबाबतीत एकमेव दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यांना माणसांच्या इलेक्शनमध्ये मतदान करता येत नाही” … मी. माननीय मोदीजी आणि अमित शाह महोदय, आमचे काही शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी आम्ही केवळ आशा करू शकतो (व प्रार्थनाही) कारण ज्या प्रजातीने आमच्यावर तुम्हाला हे पत्र लिहीण्याची जबाबदारी सोपवली आहे, त्या एका प्र...

आयपीएल, थरार का थरथर !!

इमेज
आयपीएल, थरार का थरथर !! “जगातला कोणताही क्रिकेट संघ एका किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून नसतो. संघ नेहमी जिंकण्यासाठी खेळतो’... विराट कोहली.  “कोणत्याही प्रकारे विचार करता क्रिकेट म्हणजे काही सर्वस्व नाही, परंतु मी जो कुणी आहे त्याचा तो एक मोठा भाग आहे नक्कीच  आहे"... एमएस धोनी.  “क्रिकेटमध्ये काहीही सोपे नसते. कदाचित जेव्हा तुम्ही टीव्ही पाहता, तेव्हा ते सोपे दिसते. परंतु ते तसे नसते. तुम्हाला तुमचे डोके वापरावे लागते व प्रत्येक  बॉलची नेमकी वेळ साधावी लागते’… रोहित शर्मा  “आता हे गृहित धरले जाते आहे ब्रँड व खेळाचे हित इतके एकमेकांच्या आड येते की त्यामध्ये क्रिकेटच्या गरजांचा उल्लेख करायची गरज नसते.” ― गेडन हाय. “क्रिकेट सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जात असेल परंतु तो आता व्यापाऱ्यांचा  खेळ झाला आहे” … मी. भारतीय क्रिकेटमधील (व आयपीएलदेखील) तीन सर्वात महान नावांची वरील तीन अवतरणे आहेत, तर गेडन हाय हा क्रीडा समीक्षक आहे. आणि या लेखासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी, या महान लोकांच्या ज्ञानातून मला जे शिकायला मिळाले ते माझ्या मी माझ्या शब्दात मांडले आहे, ते क्रिके...