रामगड टु लिहारी, सुडाचा सुपरहिट प्रवास..!
रामगड टु लिहारी, सुडाचा सुपरहिट प्रवास..! "कितने आदमी थे?" … "बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना"… “घायल हूँ इसलिये घातक हूँ.”... “रहमान डकैत की दी हुई मौत, बडी कसाईनुमा होती है.” … "हम मर्द है… लढना हमारा कर्तव्य है" … जय, वीरू, गब्बर, ठाकूर, रामगढ, हमजा अली, जसकिरत, सन्याल, जमाल जमाली, रहमान डकैत व हो, लिहारी!! वरील सर्व हिंदी ओळी आणि नावे काल्पनिक आहेत आणि नाहीत पण (हे माझ्या लेखासाठी जरा वेगळं आहे)! पहिल्या दोन ओळी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी म्हटल्या गेल्या असल्या तरीही आताच्या जेन झीला देखील त्या माहिती आहेत. पुढील तीन ओळी जी ज्येष्ठांची पिढी आहे म्हणजे ज्यांनी पन्नाशी ओलांडली आहे (माझ्यासारखे) त्यांनाही माहिती आहेत, त्याचप्रमाणे त्यांना पात्रांची नावे व दोन काल्पनिक जागांची नावेही माहिती असतात. तरीही हे सर्व बरेचसे वास्तविक जीवनाचा भाग वाटते, दोन पिढ्यांमधील हा समान दुवा माझ्या लेखाचा विषय आहे ज्यामध्ये पाच दशकांच्या कालावधीचा समावेश आहे. बऱ्याच काळानंतर चित्रपटाविषयी काहीतरी लिहीतोय व हे एका चित्रपटाविषयी अधिक आहे कारण दुसऱ्याविषयी सांगायचे बरेच क...