पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वदेशीवाली दिवाळी!!

इमेज
 स्वदेशीवाली दिवाळी!! “तुमचा देश कदाचित मनातील एक कल्पनाच असेल. ती कदाचित अशी एक जागा असेल जिची तुम्ही स्वप्ने पाहता व गाणी म्हणता. नकाशावर तिचे स्थान कदाचित नगण्य असेल, पण त्याविषयी अनेक गोष्टी असतील, तुम्ही भेटलेल्या लोकांच्या, तुम्ही पाहिलेल्या ठिकाणांच्या, तुम्ही वाचलेली पुस्तके व पाहिलेले चित्रपट असतील. मला घरची आठवण येते व जगताना आजूबाजूला आपली भाषा नाही म्हणून भीती वाटत नाही. मी इतर कुणासारखेही असण्याची गरज नाही. मी वाटेल तिथे चालतोय व मला कुणीही थांबवू शकत नाही.” ― ह्यूगो हॅमिल्टन. “ स्वतःच्या जमीनीच्या लहानशा तुकड्यावर आरामात उपजीविका चालवणे ही भविष्यात सर्वोत्तम कला असणार आहे.” ― अब्राहम लिंकन. "आपण स्वदेशीला दूर लोटले नसते, आपले सध्या झाले आहे तसे पतन झाले नसते. आपल्याला आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता हवी असेल, तर आपण स्वतःच्या कपड्यांचे उत्पादन केले पाहिजे व, सध्याच्या घडीला ते केवळ हाताने सूत कातून व हातमागावर केले पाहिजे." – महात्मा गांधी . ह्युगो पी. हॅमिल्टन हे एक आयरिश लेखक आहेत,  त्यांचा जन्म व ते लहानाचे मोठे झाले डब्लिनमध्ये. स्वातंत्र्याविषयीचे आपले विचार त्...

एमटीडीसी, जागतिक पर्यटन दिवस व वन्यजीव पर्यटन!

इमेज
एमटीडीसी, जागतिक पर्यटन दिवस व वन्यजीव पर्यटन! “काही शोधण्याच्या खऱ्या प्रवासामध्ये नवीन भूमी शोधण्याचा समावेश होत नाही, तर नव्या नजरेने ती पाहण्याचा समावेश होतो.” ― मार्सेल प्रॉस्ट. “जंगलात जा, नाहीतर, देवाने माणसाला किती सुंदर भेट दिली आहे हे तुम्हाला कसे समजेल, जी आपलीही जबाबदारी आहे”- मी. पहिल्या अवतरणाचे लेखक आहेत, व्हॅलेन्टाईन लुईस जॉर्जेस यूजिन मार्सेल प्रॉस्ट हे एक फ्रेंच कादंबरीकार, साहित्य समीक्षक, व निबंधकार होते, जे त्यांची कादंबरी ए ला रिसेर्शे डू टेम्स पर्ड्यू (गतकाळाच्या आठवणी) यासाठी सर्वात प्रसिद्ध आहेत. त्यानंतरचे अवतरण माझे आहे. ते काही वन्यजीवन पर्यटनाविषयीचे अवतरण नाही तर त्या माझ्या भावना आहेत, जो माझ्या लेखाचा विषय आहे. वन्यजीवनाने मला केवळ अतिशय आनंदच दिलेला नाही तर मला वनसंवर्धनासाठी थोडेफार काही करण्याची संधीही दिली आहे ज्यामुळे मला अतिशय समाधान मिळाले आहे व त्याहीपेक्षा अधिक म्हणजे, वन्यजीवनाशी संबंधित असल्यामुळे, मला ओळख व मानसन्मान मिळाला आहे जो बांधकाम व्यावसायिक म्हणून मला कधीही मिळाला नसता. मला बांधकाम व्यावसायिक असल्याबद्दल अजिबात लाज वाटत नाही, किंबहुन...

छोटा मटका, फक्त वाघ नाही, अ‍ॅटिट्यूड!!🐾

इमेज
छोटा मटका, फक्त वाघ नाही, अ‍ॅटिट्यूड!!🐾 “जो तलवार घेऊन जगतो, त्याचा मृत्यूही तलवारनीच होतो”… येशू ख्रिस्त. “एकदा तुम्ही हातात तलवार घेऊन जगायचा निर्णय घेतला की ते चूक किंवा बरोबर याने फरकच पडत नाही. त्यात मजा आहे का हे सर्वात महत्त्वाचे असते.” … ताकेहिको इनोयू. पहिल्या अवतरणाच्या लेखकाची (म्हणजे निर्मात्याची) ओळख करून देण्याची गरज नाही व दुसरे ताकेहिको इनोयू हे जपानी मांगा कलाकार आहेत. ते त्यांच्या बास्केटबॉलवरील स्लॅम डंक या मालिकेसाठी व जिदाईगेकी मांगा व्हागाबाँडसाठी सर्वाधिक ओळखले जातात, या दोन इतिहासातील सर्वाधिक खपाच्या मांगा मालिका आहेत. लेखाच्या नावातूनच तुम्हाला त्याच्या विषयाची कल्पना आली असेल, तर हा लेख वाघांविषयी (किंबहुना वाघाविषयी) आहे व अर्थातच त्यामध्ये ताडोबाचा उल्लेख आहे, तरीही मला तुम्हाला असे सांगावेसे वाटते की तो ताडोबाविषयी अथवा वाघ पाहण्याविषयी नाही, तर वाघाच्या वृत्तिविषयी आहे! शीर्षकामध्ये नमूद केल्याप्रमाणे समाज माध्यमांवर सगळीकडे (म्हणजे वन्यजीवप्रेमींच्या खात्यामध्ये) सीएम या नावाची चर्चा आहे, राजकारणामध्ये सीएम या नावाला विशेष वलय असले तरीही इथे सीएम म्हणजे...