बिबट्या, वाघ, समाजमाध्यमे आणि सत्य..🐾
बिबट्या, वाघ, समाजमाध्यमे आणि सत्य..🐾 “बिबट्यांना, तेदेखील जंगलातील सामान्य बिबट्यांना, पाऊस आवडत नाही व पावसात ते हमखास आडोसा शोधतात, परंतु तो नरभक्षक सामान्य बिबट्या नव्हता, आणि त्याला काय आवडते किंवा काय आवडत नाही हे मला माहिती नव्हते.”― जिम कॉर्बेट. “या सर्व व्यवस्थेमध्ये वाघाचे कार्य म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करणे व क्वचितप्रसंगी अतिशय आवश्यक असेल तेव्हा, तो माणसांना मारतो किंवा जेव्हा त्याचे नैसर्गिक खाद्य माणूस निष्ठूरपणे नष्ट करून टाकतो, तेव्हा त्याने मारले आहे असा आरोप करण्यात आलेल्या जनावरांपैकी दोनच टक्के तो मारतो, म्हणूनच संपूर्ण प्रजाती क्रूर आणि रक्तपिपासू असल्याचा शिक्का मारणे न्याय्य होणार नाही.”― जिम कॉर्बेट. जेव्हा लेखाचा विषय बिबट्या व वाघ असतो, तेव्हा तुम्हाला वरील माणसाशिवाय इतर कुणीही योग्य व्यक्ती सल्ला घ्यायला सापडणार नाही, कारण शंभर वर्षांपूर्वी जेव्हा गूगल किंवा ड्रोन किंवा तत्सम कोणतेही तंत्रज्ञान मदतीला नव्हते तेव्हा या माणसाने पायी चालत व प्रत्यक्ष या प्रजातींसोबत राहून त्यांच्याविषयी अभ्यास केला (त्यांना फक्त मारले नाही, हे लक्षात ठेव...