पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

इमेज
स्वच्छ पुणे,  सुंदर पुणे;  प्रदूषण मुक्त पुणे?? “वायू प्रदूषणाच्या अपायकारक परिणामांपासून स्वतःला वाचवण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतात हे इतर लोकांनी आपल्याला सांगावे असे आपल्याला वाटत असते” …अरविंद केजरीवाल. “तुम्ही आधी स्वतःला ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, हिंदू किंवा इतर कौणत्याही धर्माचे म्हणवण्याआधी, माणूस म्हणून जगायला शिका, कारण त्यानंतरच तुम्ही निसर्गाचे रक्षण करू शकाल.” … शेनॉन एल. अल्डर. “वायू प्रदूषण हा एका साथीच्या रोगासारखा आहे ज्यामध्ये संपूर्ण समाज एक रुग्ण होतो” … मी. या अवतरणातून लेखाचा विषय काय आहे हे पुरेसे स्पष्ट होते व जेव्हा विषय वायू प्रदूषण असतो तेव्हा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, श्री. केजरीवाल असोत किंवा प्रोत्साहनपर लेखन करणारे अमेरिकी लेखक, मानस उपचारतज्ज्ञ श्री. अल्डर असोत किंवा माझ्यासारखा एखादा लहान बांधकाम व्यावसायिक अथवा अभियंता असतो. प्रदूषण अथवा त्याच्या परिणामातून (म्हणजे वाईट) कुणीच वाचत नाही हा माझ्या लेखाचा विषय आहे. गेल्यावर्षीच मी या विषयावर माझे काही विचार मांडले होते व त्यावेळी त्याचे कारण होते आपल्या स्थानिक प्रशासकीय संस्थेद्वारे म्हणजेच पु...

दुबई , गुंतवणूक, युद्ध आणि भारत!!

इमेज
 दुबई , गुंतवणूक,  युद्ध आणि भारत!! “देवाने अमेरिकन लोकांना भूगोल समजावा यासाठी युद्धाची निर्मिती केली.” ― मार्क ट्वाईन “तिसरे जागतिक महायुद्ध कोणत्या शस्त्रांनी लढले जाईल हे मला माहिती नाही, परंतु चौथे महायुद्धा काठ्या व दगडांनी लढले जाईल.” ― अल्बर्ट आईनस्टाईन इंग्रजीमध्ये युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या “वॉर” या शब्दाची अक्षरे आपण उलट क्रमाने वाचली तर तो शब्द “रॉ” असा होतो. आपणही खरेतर तसेच आहोत म्हणजे हुशार, सुशिक्षित तरीही आतून अतिशय “रॉ” म्हणजेच अपरिपक्व, म्हणूनच आपण सतत “वॉर”साठी म्हणजेच युद्धासाठी सरसावलेले असतो … मी मला दुबई शहर अतिशय आवडते व मी त्या शहराला दिलेल्या अनेक  भेटींची मला नेहमी आठवण येते. मी जेव्हा हा लेख लिहीण्यास सुरुवात केली, जो दुबईविषयी आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल, तेव्हा माझ्या मनात एक विचित्र भावना होती, कारण मी अशा एका सफरीविषयी लिहीणार होतो जी होऊच शकली नाही. तर मी दुबईला शेवटचा तीन वर्षांपूर्वी, म्हणजे 2022 च्या डिसेंबर महिन्यात गेलो होतो. कोविडचा जागतिक परिणाम ओसरल्यानंतरच लगेच हा दौरा झाला होता. परत आल्यानंतर मुंबई विमानतळावर तिसऱ्या लाट...

रेरा, आणि झू मधला वाघ...!!

इमेज
रेरा, आणि झू मधला वाघ...!! “आपण ज्या लोकांवर कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी टाकलेली आहे ते लोकं जोपर्यंत कायद्याचा आदर करत नाही तोपर्यंत जनता कायदा व सुव्यवस्थेचा आदर करेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.” ― हंटर एस. थॉम्पसन “कोणीही मूर्ख नियम बनवू शकतो परंतु केवळ एक मूर्खच त्याचे पालन करेल.” ― हेन्री डेव्हिड थोरो “ग्राहकांसंदर्भात पारदर्शक राहण्यासाठी मला रेराची गरज नाही,कारण तो व्यवहाराचाच एक भाग आहे असे मला वाटते” … मी सर्वप्रथम हंटर थॉम्पसन व थोरो यासारख्या महान लोकांसोबत माझे नाव जोडल्याबद्दल मला माफ करा, परंतु या लेखात मी जे काही लिहीले ते सर्व महान व्यक्तींकडून शिकलो आहे व त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे खऱ्या-खुऱ्या आयुष्यातून शिकलो आहे. हा लेख रेराविषयी आहे, जो आपल्या न्यायव्यवस्थेनुसार एक कायदा आहे व मला तुम्हाला सांगावेसे वाटते की मी काही कुणी कायदेतज्ज्ञ नाही (डिसक्लेमर क्र. 1) परंतु मी या विषयाचे व्यावसायिक दृष्टीकोनातून विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. काही शब्द हे आपल्या शब्दसंग्रहाचा इतके अविभाज्य भाग होऊन जातात (नवीन माध्यमे व समाज माध्यमांचे आभार) व आपण त्यांचा उल्...