पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक्सप्रेस वे चा धडा..!!

इमेज
एक्सप्रेस वे चा धडा..!! “कधी कधी हरवणं गरजेचं असतं… कारण काही सुंदर वाटा फक्त हरवल्यावरच सापडतात.” — एरोल ओझान “या टप्प्यानंतर आयुष्यात मागे वळून पाहणं नाही; हार मानणं तर अजिबात नाही.”- ~ आरोन लॉरिटसेन “मला रोड ट्रिप्स खूप आवडतात… त्या मला संयम शिकवतात , भरपूर संयम!”-  मी  तत्वज्ञान/अध्यात्मिक विषयक सर्व गोष्टींमध्ये, मार्ग हा अतिशय महत्त्वाचा असतो कारण तोच तुमचे भविष्य ठरवतो असे बहुतेक तत्वज्ञानांमध्ये सांगितले जाते किंवा तसा विश्वास असतो. म्हणूनच माझा लेख एका विशिष्ट मार्गाविषयी असल्यामुळे मी अशा तत्त्वज्ञान बेस असलेल्या शब्दांचा आधार घेतला यात शंका नाही. अर्थात हा लेख तात्विक नाही तर फक्त तांत्रिक व तार्किक आहे ज्यांचा एकत्रितपणे वापर केला तरच तो प्रभावी ठरतो व आपण त्यांचा तशाप्रकारे वापर केला नाही तर त्याचा परिणाम, नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकर व पुणेकरांना (पुणेकरांना अधिक) जे अनुभवायला मिळाले तो असतो. म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावर अक्षरशः राडा अनुभवायला मिळाला. मला खा...

युनियन बजेट 2026 आणि रिअल इस्टेट!!

इमेज
युनियन बजेट 2026 आणि रिअल इस्टेट!! “बहुतेक लोक उत्पन्न कमी असल्यामुळे गरीब होत नाहीत, तर ते अजाण असल्यामुळे गरीब होतात.” ― जोसेफ सी. कुंझ ज्युनिअर. “तुमची मूल्ये शोधा, त्याला तुमच्या दूरदृष्टीची जोड द्या, त्याचाच ध्यास घ्या, तुमचा उद्देशही त्याला साजेसा ठेवा व त्यानंतरच अर्थसंकल्प तयार करा. ” ― सब्रिना एम जे कॉन्स्टंटाईन. “अर्थसंकल्पचा मला समजलेला अर्थ म्हणजे, मी किती कमवतो हे नव्हे तर मी किती खर्च करू शकतो”__ मी   जोसेफ क्रूझ व सब्रिना कॉन्स्टंटाईन, या दोन महान अर्थतज्ज्ञांनीविषयी पूर्णपणे आजर व्यक्त करून सांगू इच्छितो की आज त्यांचे शब्द अर्थसंकल्पाविषयीच्या (केंद्रीय अर्थसंकल्प किंवा देशाचा अर्थसंकल्प) लेखाची सुरुवात करताना माझ्या मदतीला धावून आले. हा असा विषय आहे की ज्यामुळे मी बधिर होतो, मी नर्व्हस होतो (जसा इंजिनीरिंगच्या दिवसांमध्ये मी गणितामुळे होत असे). तरीही, अर्थसंकल्प माझ्या कामाच्या संदर्भात पाठीचा कणा आहे. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी शिकाऊ अभियंता म्हणून नुकताच नोकरीस लागलो होतो, तेव्हाच मला अर्थसंकल्प या विषयाचे महत्त्व समजले होते. हा लेख देशाच्या अर्थसंकल्पाविषयी आहे...

वाइल्ड फेस्ट फॉर किड्स- सीजन 3; ताडोबा बफरची जादू..!!🐾🐾

इमेज
      वाइल्ड फेस्ट फॉर किड्स- सीजन 3; ताडोबा बफरची जादू..!!🐾🐾 "मोडलेल्या प्रौढ व्यक्तींना जोडण्यापेक्षा सशक्त मुले घडवणे अधिक सोपे असते" … फ्रेड्रिक डग्लस "आपण आपल्या मुलांना जी संपत्ती देऊ शकतो त्यातली सर्वात उत्तम संपत्ती म्हणजे, त्यांचे पाय जमीनीवर राहण्यासाठी घट्ट मुळे व दुसरे म्हणजे त्यांना उडता यावे यासाठी पंख" …. जॉन वुल्फगँग व्हॉन गॉथे "आपण जर आपल्या आयुष्यामध्ये वाघांचे महत्त्व आपल्या मुलांना समजावून सांगू शकलो, तरच संपूर्ण जंगलासाठी काही आशा आहे" … मी वरील व त्यातील विषयामुळे गोंधळून जाऊ नका कारण बाल मानसशास्त्र हा निश्चितच माझा विषय नाही. मात्र लेखाचा विषय असा आहे की जो मुलांना आवडतो किंवा आवडू लागला आहे व तो म्हणजे वन्यजीवन. या लेखामध्येही ताडोबा आहे परंतु तो फक्त ताडोबाविषयी नाही (सुदैवाने, हाहा)! तर शब्दाचा खेळ पुरे झाला, हा लेख “लहान मुलांसाठी वन्य महोत्सव; आवृत्ती 3 री” या उपक्रमाविषयी आहे जो जंगल बेल्स व नेचर वॉक (कृपया गूगल करा) यांनी आयोजित केला होता. त्यापेक्षाही अधिक म्हणजे हा लेख या महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी आहे व तीच वन्...

उंच इमारती, पुणे आणि पर्यावरण..!

इमेज
उंच इमारती, पुणे आणि पर्यावरण..! “शहराला कोणताही एक तर्क लागू होत नाही; कारण लोक शहर घडवतात, व म्हणूनच आपण आपल्या योजना लोकांना अनुकूल होतील अशाप्रकारे बनवल्या पाहिजेत, इमारतींसाठी नाही.” ― जेन जेकब "तुम्हाला प्रगतीसाठी किती किंमत मोजावी लागतीय व ती कोण मोजत आहे हे माहिती असल्याखेरीज तुम्हाला ती मोजता कशी येईल? “बाजार” – घर, वीज, वाहते पाणी यासारख्या गोष्टींचे मोल कसे ठरवू शकतो – जेव्हा त्यांच्या निर्मितीसाठी आपण काय किंमत मोजली आहे हे तो विचारात घेत नाही?” ― अरुंधती रॉय "एखादे शहर हे अगदी मोठ्या घरासारखे असते, ज्यामध्ये प्रत्येकासाठी त्याची किंवा तिची स्वतःची थोडी जागा असते, यामध्ये झाडांचाही समावेश असतो व इथे सर्वजण मोठ्या कुटुंबाप्रमाणे एकत्र राहतात, एकमेकांची काळजी घेतात, माझ्यासाठी शहराची हीच व्याख्या आहे" … मी तर, सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्ग सेवक (एक स्वयंसेवी संस्था) या संस्थेचे आभार, ज्यांनी मला माझ्या आवडत्या विषयाबद्दल लिहायला सांगितले. हा विषय माझ्या इतक्या जिव्हाळ्याचा आहे की मी आजकाल त्याविषयी लिहीणे व माझे विचार व्यक्त करणेही टाळतो. असे म्हण...