रामगड टु लिहारी, सुडाचा सुपरहिट प्रवास..!
रामगड टु लिहारी, सुडाचा सुपरहिट प्रवास..!
"कितने आदमी थे?"…
"बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना"…
“घायल हूँ इसलिये घातक हूँ.”...
“रहमान डकैत की दी हुई मौत, बडी कसाईनुमा होती है.” …
"हम मर्द है… लढना हमारा कर्तव्य है"…
जय, वीरू, गब्बर, ठाकूर, रामगढ, हमजा अली, जसकिरत, सन्याल, जमाल जमाली, रहमान डकैत व हो, लिहारी!!
वरील सर्व हिंदी ओळी आणि नावे काल्पनिक आहेत आणि नाहीत पण (हे माझ्या लेखासाठी जरा वेगळं आहे)! पहिल्या दोन ओळी जवळपास पन्नास वर्षांपूर्वी म्हटल्या गेल्या असल्या तरीही आताच्या जेन झीला देखील त्या माहिती आहेत. पुढील तीन ओळी जी ज्येष्ठांची पिढी आहे म्हणजे ज्यांनी पन्नाशी ओलांडली आहे (माझ्यासारखे) त्यांनाही माहिती आहेत, त्याचप्रमाणे त्यांना पात्रांची नावे व दोन काल्पनिक जागांची नावेही माहिती असतात. तरीही हे सर्व बरेचसे वास्तविक जीवनाचा भाग वाटते, दोन पिढ्यांमधील हा समान दुवा माझ्या लेखाचा विषय आहे ज्यामध्ये पाच दशकांच्या कालावधीचा समावेश आहे. बऱ्याच काळानंतर चित्रपटाविषयी काहीतरी लिहीतोय व हे एका चित्रपटाविषयी अधिक आहे कारण दुसऱ्याविषयी सांगायचे बरेच काही आधीच सांगितले गेले होते. मी तुमच्या डोक्याला फारसा ताण देणार नाही, पहिल्या ओळी शोलेतील आहेत (कृपया त्यासाठी गूगल करू नका) व शेवटच्या तीन ओळी धुरंधरमधल्या आहेत (कृपया पुन्हा गूगल करू नका), कारण जर तुम्हाला या दोन्हींविषयी माहिती नसेल तर पुढे वाचण्यात अर्थ नाही, तरीही एकूणच चित्रपटांविषयी समजून घेण्यासाठी तुम्ही पुढे वाचू शकता, जसे आपण जीवन मार्गदर्शकाचे शब्द वाचत असतो (उपहास)! शोले बरोबर एकावन्न वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला व त्याने इतिहास घडवला, किंबहुना पुनप्रदर्शनानंतर तो अजूनही घडवत आहे, तर धुरंधर (भाग एक व दोन) बॉलिवुडचा इतिहास पुन्हा नव्याने लिहीत आहे. शोले प्रदर्शित झाला तेव्हा संपूर्ण भारतभर चित्रपट प्रदर्शित होणे किंवा ओटीटी यासारख्या संकल्पनाच नव्हत्या. तुम्हाला चित्रपटाविषयी जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो टॉकीजमध्ये जाऊन पाहणे व वर्तमानपत्रामध्ये त्यांचे परीक्षण वाचणे हाच होता व काही उच्चभ्रू लोकांना स्टार डस्ट व फिल्मफेअरसारखी मासिके वाचायला मिळायची, बस्स! आजकाल मात्र तुम्हाला चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होणार आहे तेव्हा त्याविषयी सगळे काही महिती असते, आणि वाय-फाय व स्मार्ट फोन असल्याने सगळेच प्रेक्षक समीक्षक झाले आहेत. चित्रपट प्रदर्शित होतो त्याच दिवशी शेवटच्या खेळापर्यंत जगभरात त्या चित्रपटाचे भवितव्य निश्चित असते. हे एकप्रकारे वरदानही आहे तसेच शापही कारण जर लोकांना फार जास्त माहिती उपलब्ध असेल तर लोकांना थिएटरमध्ये (म्हणजे मल्टीप्लेक्समध्ये) जाऊन चित्रपट पाहण्याएवढा उत्साह राहात नाही जे खार्चिक असते, कारण तुम्हाला महिन्या दोन महिन्यात तो तुम्हाला घरी किंवा कुठूनही मोफत बघायला मिळेल. परंतु त्याचवेळी भारतीय लोकांना अजूनही चित्रपट पाहण्याचा अस्सल अनुभव आवडतो कारण तुम्ही चित्रपट किंवा एखादा खेळ (क्रिकेटसारखा) पाहायला जाता तेव्हा ते वातावरण व भावना अतिशय महत्त्वाच्या असतात. लोक त्यासाठी वेळ व पैसा खर्च करायला तयार असतात, शेवटी आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा म्हणून चित्रपट पाहायला जातो. त्यासाठी चित्रपटगृहात जाणे व तो माहौल अनुभवणे अधिक महत्त्वाचे असते, नाही का?!
असो, तर धुरंधरविषयी लिहीण्याचे पहिले कारण सांगतो, बरेच जण म्हणतील की फोमो (कृपया गूगल करा) व माझी त्याला हरकत असणार नाही कारण तुम्ही चित्रपट पाहिला आहे व तुमचेही त्याविषयी मत आहे हे दाखवण्यासाठी समाज माध्यमांवर लिहीण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. एकतर तर मी चित्रपटाची समीक्षा करण्यासाठी त्याविषयी लिहीत नाही, तो ज्या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे त्यात तर निश्चितच नाही. मला चित्रपटातून काय गवसले हे सांगण्यासाठी मी लिहीतो व ते सविस्तर ब्लॉग रुपात असते जो वाचण्यासाठी खरा वाचकच प्रयत्न करतो, ते इन्स्टाग्राम किंवा फेसबुक वापरणाऱ्यांसाठी नसते, त्यामुळे असो (केवळ सूचना)! आता धुरंधरविषयी बोलायचे झाले (भाग 1 व 2) तर त्याने केलेल्या कमाईची आकडेवारी आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती झाली आहे व या आकडेवारीतून हेच समजते की हा काही ज्ञान किंवा इतर काही देण्यासाठी तयार करण्यात आलेला माहितीपट किंवा कलापट नाही (अनेक जण म्हणतील की हा प्रचारकी चित्रपट आहे, परंतु त्या पैलूविषयी नंतर मत मांडेन) तर तो एक व्यावसायिक चित्रपट आहे ज्याचा अर्थ असा होतो की त्याने पैसा कमावला तरच तुम्ही त्याला यशस्वी चित्रपट म्हणाल. या बाबतीत तो आघाडीवर आहे, याबाबतीत कोणतेही दुमत नाही. हा झाला माझा पहिला मुद्दा, कारण जेव्हा तुम्ही एखादे उत्पादन तयार करता, मग तो एक चित्रपट असू दे, कार किंवा एखादे पुस्तक, त्यामागे पैसे मिळवण्याचा तुमचा हेतू स्पष्ट असेल तर त्याला धरून राहा. या मूलभूत गोष्टीशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल आदित्य धर याचे अभिनंदन, त्यासाठी त्याने कोणतेही देशभक्तीपर मुलाखती दिल्या नाहीत किंवा चित्रपटाविषयी असा कोणताही दावा केला नाही, परंतु हा एक व्यावसायिक चित्रपट आहे व हेरगिरीवर आधारित थरारपट आहे व यात एवढेच आहे. तुम्हाला एकदा निर्माता म्हणून (किंवा व्यावसायिक म्हणून) उत्पादनाविषयी इतकी स्पष्टता असते, तेव्हा तुम्ही त्या उत्पादनावर योग्यप्रकारे लक्ष केंद्रित करू शकता, ज्याप्रकारे आदित्यने धुरंधरच्या बाबतीत केले आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून ते शेवटपर्यंत लोकांना (म्हणजे प्रेक्षक म्हणून) तो आवडला आहे, त्याने अतिशय व्यावसायिकपणे हे काम केले आहे. इथे मला धुरंधर व शोलेची तुलना करावीशी वाटते. जेव्हा शोलेची निर्मिती करण्यात आली होती तेव्हा 100-कोटींचा क्लब वगैरे भानगड नव्हती, असती तर त्याने निश्चितपणे सर्वाधिक कमाई केली असती. त्या काळात चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे हाच कोणताही चित्रपट पाहण्याचा एकमेव मार्ग होता, म्हणजेच आणखी महसूल! रमेश सिप्पी यांनी अतिशय अचूक व्यावसायिक चित्रपट बनवला. या दोन्ही चित्रपटांमध्ये एका भारतीय चित्रपट प्रेक्षकाला जे पाहायचे असते ते सर्व काही आहे, त्यामध्ये मारामारी आहे, भावना आहे, प्रेम आहे (अर्थात ते प्रमुख अंग नाही), अर्थात भर प्रामुख्याने ॲक्शनवर आहे, त्यात त्याग आहे, विश्वासघात आहे, वेदना आहे, गमावणे आहे, राष्ट्रप्रेम आहे, सुड हा तर आत्मा आहे व खिळवून ठेवणारी पटकथा आहे ज्यात वरील सगळ्या गोष्टींची उत्तम मांडणी करण्यात आली आहे. हे असे एक उत्पादन आहे जे शंभरात नव्याण्णव वेळा हमखास यशस्वी ठरेल, जे तसे झाले!
भारतामध्ये कोणता चित्रपट यशस्वी होईल व कोणता राजकारणी निवडून येईल याचे भाकित करणे अतिशय अवघड असते. परंतु असे काही निर्माते व दिग्दर्शक आहेत ज्यांनी वारंवार यशस्वी चित्रपट दिले आहेत व असे राजकारणीही आहेत जे एकाच मतदारसंघातून वर्षानुवर्षे निवडून येतात व याचाच अर्थ दोन्हींसाठी यशाचे काही सूत्र नक्कीच आहे. यशाचे हे सूत्र शोधणे व त्याचा योग्यप्रकारे वापर करणे आपण शिकायला पाहिजे, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये कमी यशस्वी व अपयशी लोक असतात, परंतु जर ते नसते तर यशाचे काही मोल किंवा त्यासाठी आदर राहिला नसता, बरोबर? इथेच पुन्हा, माझ्या मनात पुन्हा शोले व धुरंधरची तुलना केली जाते, त्यातूनच हा लेख लिहीला आहे. तर पटकथेपासून सुरूवात करू, दोन्ही चित्रपटांमधील नायक हे खरेतर गुन्हेगार म्हणजेच कायद्याच्या नजरेत खलप्रवृत्तीचे दाखवले आहेत मात्र दोघेही नैतिकदृष्ट्या योग्य असल्याचे दाखवण्यात आले आहेत. मला सिप्पींचे कौतुक वाटते की त्यांनी जय आणि वीरू (कृपया गूगल करा) हे चोर का होतात हे दाखवण्यात वेळ घालवलेला नाही व तरीही ते दोघे नैतिकता व मूल्य जपणारे असल्याचे दाखवण्यात आले आहे. शोलेमध्ये जय आणि वीरू हे जिगरी दोस्त आहेत व चुकीच्या व बरोबर गोष्टींमध्ये एकमेकांना सांभाळून घेतात, तर धुरंधरमध्ये जसकिरत व हमझा अली (कृपया पुन्हा गूगल करू नका) या दोन्हीही एकाच व्यक्तीच्या मुख्य भूमिका आहेत. जर जसकिरत हा ग्रामीण मध्यमवर्गीय कुटुंबातला व मनाने चांगला साधा मुलगा आहे तर हमझा अली हा अतिशय कठोर माणूस आहे, ज्याला केवळ जिवंत राहणे व त्याची मोहीम एवढेच उद्दिष्ट आहे व ते साध्य करण्यासाठी तो कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो. दोन्ही चित्रपट अतिशय लांबलचक होते, काटछाट करूनही शोले साडेतीन तासांचा होता, म्हणजे त्या काळात जे चित्रपट बनवले जात असत त्यापेक्षा जवळपास पंचेचाळीस मिनिटे मोठा होता. या बाबतीत मला धुरंधरचे कौतुक वाटते कारण ज्या काळात दर्शकांचा इंट्रेस्ट जेमतेम वीस सेकंदात नाहीसा होतो त्या काळात तब्बल पावणेचार तासांचा चित्रपट बनवण्यासाठी धाडस, हिंमत व आत्मविश्वास हवा. त्याची पटकथा, ओघवती शैली यामुळे प्रेक्षक आपण किती वेळ चित्रपट पाहतोय हे विसरतात.
त्यानंतर येतो मारामारीचा भाग (म्हणजे हिंसा), दोन्ही चित्रपट ॲक्शनपट आहेत व मला जे आठवत आहे त्यानुसार शोलेमध्ये अतिशय हिंसा असल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने शोलेचे प्रमाणपत्र रोखून ठेवले होते. आज धुरंधर पाहताना तीही समस्या नाही परंतु पन्नास वर्षांपूर्वी पडद्यावर एका माणसाचे हात तोडताना दाखवणे हे एखादे बिनधास्त प्रेमदृश्य दाखवण्याइतकेच निषिद्ध होते. तरी त्याही काळात लोकांना हिंसा पाहायला आवडली व आजही आवडतेय. यातून आपल्यात खोलवर दडलेले काहीतरी दिसून येते, ते म्हणजे आपली काळी बाजू जी इतर सर्व गोष्टींवर मात करते. जेव्हा ठाकूर खिळे लावलेल्या बुटाने गब्बरला मारतो तेव्हा आपणही कुठेतरी आतून सुखावतो व जेव्हा जय डाकूंच्या डोक्यात गोळी झाडतो तेव्हा आपल्यालाही कुठेतरी बरे वाटते. आजही जेव्हा जसकिरत त्याच्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आमदाराच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकतो तेव्हा आपल्याला ते आवडते व त्या हत्या किती क्रूरपणे करण्यात आल्या आहेत याची आपल्याला फिकीर वाटत नाही. मी कबूल करतो की, धुरंधरमध्ये ज्याप्रकारे माणसे मारण्यात आली आहेत (किंवा त्यांची हत्या करण्यात आली आहे) ती दृश्ये पाहून मला त्रास झाला, म्हणजे डोकी छाटणे, ती फुटबॉलसारखी लाथाडणे याला सेन्सॉर बोर्ड आजकाल परवानगी देत असेल. परंतु केवळ ॲक्शनपटाच्या नावाखाली आपल्याला असे पाहायला आवडत असेल तर समाज म्हणून आपण पुढे नाही तर उलट दिशेने प्रवास करत आहोत. निर्मात्यांनी हिंसा आणि भावना यांची बेमालूम सरमिसळ करून दर्शकांच्या काळ्या बाजूचा यशस्वीपणे वेध घेतला आहे. आपण जय आणि वीरूच्या हिंसेचे गब्बरच्या क्रूरपणाला उत्तर म्हणून समर्थन केले व आज आपण जसकिरतच्या हिंसेचे समर्थन करताना त्याच्या कुटुंबासाठी बदल घेण्याचा हाच एक मार्ग आहे व हमझा अलीच्या हिंसेचे समर्थन देशप्रेमाच्या नावाखाली करतो. म्हणजे प्रत्येक गैरकृत्यावर हिंसा हाच तोडगा आहे हे आपण मान्य करतो, बरोबर?
शोले व धुरंधरमध्ये आणखी एक साम्य आहे, ते म्हणजे लोकांचा आता व्यवस्थेवर विश्वास उरलेला नाही (म्हणजे सरकार किंवा न्याय) म्हणूनच एखादा मोठा गुन्हा थांबवण्यासाठी केवळ दुसर्या गैर मार्गाचाच वापर केला जाऊ शकतो याचा ते स्वीकार करतात. शोलेमध्ये एक निष्ठावान पोलीस निरीक्षक बलदेवसिंग ठाकूर, गब्बरला कायद्याने रोखण्याचा प्रयत्न करतो व त्या बदल्यात त्याला त्याचे दोन्ही हात व संपूर्ण कुटुंब गमवावे लागते. धुरंधरमध्ये, एक निष्ठावान लष्करी अधिकारी सन्याल, पाकिस्तानी दहशतवाद्यांना सिस्टीममधून रोखण्याचा प्रयत्न करतो व त्या बदल्यात त्याला त्याचे हात किंवा कुटुंब नाही पण देशाची प्रतिष्ठा गमवावी लागते.आणि मग हे दोघेही खलप्रवृत्तींविरुद्धची त्यांची लढाई लढण्यासाठी, गैरकृत्ये करणाऱ्या व्यक्तींनाच ती जबाबदारी देतात, हे थोडेसे निराशाजनक नाही का!! ठाकूर गब्बरला मारण्यासाठी ज्या पोलीस दलाचा तो स्वतः एक भाग होता त्यांची मदत घेऊन, रामगढला त्याच्या दहशतीतून मुक्त करू शकत नाही का व सन्याल त्याच्या अधिकाराचा वापर करून दहशतवादाचे जाळे का नष्ट करू शकत नाही , जे आपल्याच देशातील स्थानिक राजकारण्यांद्वारे चालवले जाते, जे सीमेपलिकडून बनावटी चलन, अंमली पदार्थ व शस्त्रे येऊ देण्यास परवानगी देतात. सरकार इतके शक्तिशाली असूनही देशाच्या किंवा समाजाच्या शत्रूविरुद्ध लढण्यासाठी कुणा भुरट्या चोरांची किंवा पूर्वी लष्कराच्या सेवेत असलेल्या एका कायद्याने खुनी असलेल्या व्यक्तीची का गरज पडते, आपण हे चित्रपट यशस्वी बनवून आपल्या यंत्रणेचे अपयश स्वीकारत आहोत असे वाटत नाही का, ही विचार करण्यासारखी बाब आहे.
शेवटचा मुद्दा म्हणजे प्रचारकी धाटणीचा चित्रपट असण्याचा, सुदैवाने असे शोलेविषयी बोलले गेले नाही. परंतु धुरंधर ज्या काळात प्रदर्शित झाला आहे, त्या काळात समाजमाध्यमे आपले आयुष्य नियंत्रित करतात व सगळ्याचा निवाडा तिथेच होतो. किंबहुना मी असे म्हणेन की धुरंधरने आपल्या देशात घडत असलेल्या घटनांचा चित्रपटाची पटकथा पुढे नेण्यासाठी अतिशय चतुराईने वापर करून घेतला, विशेषतः नोटबंदीचा मुद्दा. अनेक लोकप्रिय हॉलीवूड चित्रपटांमध्ये हे यशस्वीपणे करण्यात आले आहे, त्यामुळे आहे ती वस्तुस्थिती स्वीकारायला काय हरकत आहे. जर विद्यमान पंतप्रधानांचे भाषण वापरणे हे प्रचारकी असेल तर याच सरकारच्या काळात निष्पाप जसकिरतच्या कुटुंबाला न्याय नाकारून त्याला हमझा अली होण्यासाठी भाग पाडण्यात आले हे देखील विसरून चालणार नाही, बरोबर? म्हणूनच, धुरंधरच्या यशावर लक्ष केंद्रित करू व आपण जी कोणतीही मोहीम हाती घेऊ त्यात यशस्वी होण्यासाठी तर्कशुद्ध विचार करू. आपल्या भेटीसाठी धुरंधरसारखे आणखी चित्रपट येतील, परंतु आपण त्यातून काही शिकणार आहोत का किंवा केवळ चार तास पॉपकॉर्न व कोक यावर पैसे घालवणार आहोत; हे आपणच ठरवायचे आहे, एवढे बोलून निरोप घेतो!
संजय देशपांडे smd156812@gmail.com
www.sanjeevanideve.com








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा