टीम इंडिया, T20 वर्ल्ड कप चॅम्पियनस , पुन्हा एकदा..!!
टीम इंडिया, T20 वर्ल्ड कप चॅम्पियनस , पुन्हा एकदा..!!
“विजेत्यांची मानसिकता वेगळी असते; त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ असतो.”― संदीप कक्कर.
“विक्रम फक्त मोडायचे उद्दिष्ट ठेवू नका, तर तर तो दणदणीतपणे मोडायचे उद्दिष्ट ठेवा.”― मत्शोना ध्लिवायो.
"चॅम्पियन्सवर एक ताण असतो, तुम्ही कधीही, कुठेही खेळत असला, तरी तुम्ही जिंकावेच अशी लोकांची अपेक्षा असते"__ मी.
संदीप कक्कर हे अतिशय यशस्वी प्रेरणादायी व आयुष्य कसे घडवायचे याविषयी बोलणारे वक्ते आहेत. त्यांनी जगातील पहिली स्व-सहायता कायदंबरी “७ बकेट्स ऑफ लाईफ” लिहीली. मत्शोना ध्लिवायो हे कॅनडातील तत्ववेत्ते, व्यावसायिक, ‘द लिटील बुक ऑफ इन्स्पिरेशन’, 50-लेसन्स एव्हरी वाईज मदर टिचेस हर सन व इतरही अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत. मी असा एक व्यक्ती आहे जो अशा सर्व व्यक्तींकडून शिकण्याचा प्रयत्न करतो व मला शक्य तितके सर्वोत्तम प्रकारे त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घेतो उदाहरणार्थ माझ्या लेखाची सुरुवात करण्यासाठी वापरलेली त्यांची अवतरणे. हा लेख ताडोबाविषयी नाही, वन्यजीवनाविषयी नाही, शहराविषयी नाही किंवा रिअल इस्टेटविषयीही नाही तर खेळाविषयी आहे. तो क्रिकेटविषयी असला तरीही विजेत्यांच्या गुणधर्माविषयी व त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात कशी मदत होते याविषयी अधिक आहे. मी कुणी प्रेरणादायी वक्ता किंवा जीवनाचे तत्वज्ञान समजवणारा गुरू नाही, परंतु खेळ आपल्याला बरेच काही शिकवतात, विशेषतः क्रिकेटसारखा खेळ ज्यामध्ये ज्यामध्ये एका खेळात 22 खेळाडू असतात व हे आधुनिक युग आहे. त्यामुळे तुम्हाला केवळ खेळाडूंशी मैदानावर स्पर्धा करायची नसते, तर सहाय्यक कर्मचारी वर्ग व तंत्रज्ञान यांच्याशीही करायची असते, ज्यांचा वापर तुमची कामगिरी चांगली होऊ नये यासाठी केला जातो. त्यानंतर माध्यमे, चाहते असतातच, त्याचशिवाय जेव्हा तुम्ही जगज्जेते असता तेव्हा तुमच्यावर अपेक्षांचे ओझे असते, जे माउंट एव्हरेस्टपेक्षाही मोठे असते. म्हणूनच तुम्ही जर भारतीय संघाचा भाग असाल व भारतातच सामना खेळत असाल तर तुमच्या खांद्यावर अनेक माउंट एव्हरेस्टपेक्षा अधिक ओझेअसल्याची भावना असते व मनावर एवढे ओझे असून तुम्ही चांगली कशी कामगिरी करता याविषयी माझा लेख आहे!
खरेतर, मला हा लेख गेल्या महिन्यातच लिहायचा होता व बहुतेक लोक आतापर्यंत आपण टी20 (कृपया गूगल करा) आयसीसी विश्वचषक जिंकलो हे विसरूनही गेले असतील. जो जिंकताना आपण अनेक विक्रम मोडले (व अनेक अंधश्रद्धा सुद्धा). तसेच भारतीय संघाने इतक्या व्यावसायिकतेने किंवा सहजपणे हे केले की नेहमीप्रमाणे विश्वचषक जिंकण्यातला रोमांच त्यात मिळालाच नव्हता व जे यश सहज मिळते लोक तितक्याच लवकर विसरतात. अर्थात हे यश सकृतदर्शीनी कितीही सहजपणे मिळाल्यासारखे वाटत असले तरीही ते मिळवणे इतके सोपे नव्हते. ठीक आहे, आत्तापर्यंत तुम्हाला सगळ्यांना हे माहिती झाले आहे, तरीही मी या स्पर्धेत टीम इंडियाकडुन जे विक्रम मोडण्यात आले त्यातल्या मोजक्या काहींचा उल्लेख इथे करतोय. मी हे केवळ आकडेवारीसाठी करत नसून, तर खेळाडूंवर किती ताण होता हे समजून सांगण्यासाठी करतोय, जे मी पुढे सविस्तरपणे सांगेनच. भारतीय संघ हा टी20 आयसीसी विश्वचषक सलग दोन वेळा जिंकणारा पहिला संघ आहे. यजमानपदी असताना टी20 विश्वचषक जिंकणारा हा पहिला देश आहे. भारत गेल्या सलग दोन विश्वचषकांमध्ये खेळलेल्या सर्व सामन्यांपैकी केवळ एक सामना हरला आहे. त्याचशिवायही इतरही बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदाच घडल्या व विक्रमही प्रस्थापित झाले, परंतु यातील काही विशेष होते. विजेत्यांची मानसिकता व तसेच विजेत्यांसाठी कोणत्या गोष्टी अडथळा ठरतात हे समजून घेण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत, म्हणूनच मी विशेषकरून त्याचा उल्लेख केला. भारतीय संघाने टी20 विश्वचषक खेळताना केलेली कामगिरी का विशेष आहे ते आता आपण पाहू. टी20 विश्वचषक 2007 साली पहिल्यांदा खेळण्यात आला तेव्हापासून आत्तापर्यंत कुठलाही संघ आपला विश्वचषक राखू शकला नव्हता. पांढऱ्या चेंडूने खेळला जाणारा क्रिकेट हा प्रकार खेळणारा सर्वात प्रबळ संघ असलेला ऑस्ट्रेलियादेखील अशी कामगिरी करू शकला नव्हता व याचे कारण म्हणजे खेळाच्या या प्रकारातील अनिश्चितता. संपूर्ण खेळ जेमतेम चाळीस षटकात संपुष्टात येतो (कृपया नियमांसाठी गूगल करा किंवा तुम्हाला माहिती नसेल तर पुढे वाचू नका, उपहास) व या मर्यादित वेळेत काहीही होऊ शकते. एक खेळाडू, एक झेल, एक षटक संपूर्ण खेळाचे भवितव्यच बदलू शकते, एवढी या प्रकारमध्ये वेग व अनिश्चितता असते. आणि ही अनिश्चितता हीच येथे जिंकण्यातील सातत्य राखण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा असते. यात एखाद्या दिवशी तुमचा शत्रू कोण आहे हे तुम्हाला माहिती नसते, कारण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सज्ज असता. इथे ते कुणीही असू शकते, तुम्ही ज्या प्रतिस्पर्धी खेळाडूला ओळखत नाही, व आजचा दिवस त्याचा आहे का हे तुम्हाला माहिती नसते अशा परिस्थितीत तुम्ही त्याला कसे तोंड देणार, तर याचे उत्तर असे आहे की तुम्ही ते सांगू शकत नाही, व अशा दिवशी तुम्ही सामान्यपणे पराभूत होता. उदाहरणार्थ, इंग्लंडविरुद्ध उपांत्यफेरीच्या सामान्यामध्ये बावीस वर्षांचा एक तरूण खेळाडू बेथेल याने भारतीय संघाची धावसंख्या मजबूत असूनही त्यांच्याकडून सामना जवळपास हिरावून घेतला होता. बेथेलच्या फटक्यांचा मारा एवढा जबरदस्त होता की अचानक सर्व भारतीय गोलंदाज व क्षेत्ररक्षक त्याला थांबवण्यास असमर्थ वाटू लागले होते. बेथेलला थांबवण्यासाठी काही असामान्य प्रयत्न व नियोजन करावे लागले. म्हणजे त्याला स्ट्राइकवर येऊ न देणे व इतर फलंदाजांना बाद करणे, जे भारतीय संघाने केले, विजेते हेच करतात, परिस्थितीशी जुळवून घेतात. याचसाठी टी20 विश्वचषक सलग जिंकणे विशेष आहे कारण क्रिकेटच्या या प्रकारामध्ये कुणीही एकटा खेळाडू तुमच्यापासून सामना हिरावून नेऊ शकतो, सातत्याने जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागते, जी भारतीय संघाने केली.
त्याचवेळी दुसरा पैलू म्हणजे भूतकाळाचे ओझे न बाळगणे, कारण याच क्रिडांगणावर जवळपास दोन वर्षांपूर्वी भारतीय संघ एक दिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला. जो देश शुभशकुन, अपशकुन या सारख्या समजुतींवर व अंधश्रद्धांवर जगतो त्यात ही जागा अतिशय अपशकुनी मानली जात होती. सध्या समाज माध्यमांवर सुरू असलेल्या राजकीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर दोन्ही बाजूंकडून हिरीरीने वादविवाद सुरू होता की हे मैदान भारतीय संघासाठी अपशकुनी असताना अंतिम सामन्यासाठी त्याची निवड का करण्यात आली. खरेतर, संपूर्ण जगात तुम्ही कितीही बरोबर किंवा चूक असे म्हणालात तरीही शुभ-अशुभ शकुनाविषयी अगदी विजेत्यांचेही स्वतःचे विश्वास असतात ही वस्तुस्थिती आहे व मी त्याचा जज नाही. परंतु एक सच्चा विजेता इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा केवळ त्याच्या खेळावर विश्वास ठेवतो, कारण सरतेशेवटी त्यामुळेच तुम्ही विजेते ठरणार असता. तुम्ही मैदानावर कुठल्या प्रवेशद्वारातून शिरला किंवा तुम्ही किती क्रमांकाचा जर्सी घातला आहे किंवा तुम्हाला किती क्रमांकाची खोली देण्यात आली आहे, यासारख्या असंख्य गोष्टींमुळे नाही. परंतु आपण माणूस आहोत व आपल्यालाही भावना असतात, त्यामुळे मनात खोलवर कुठेतरी या मैदानावर पूर्वी सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागलेला नव्हता हा विचार असतोच. तरीही आपला संघ गतकाळाचे ओझे दूर सारू शकला व अंतिम सामना जिंकून इतिहास घडवू शकला, म्हणूनच हा विजय विशेष आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने भारतीय संघाच्या या पैलूतून बरेच काही शिकण्यासारखे आहे, कारण येणारा प्रत्येक दिवस हा एका नवीन सामन्यासारखा असतो व तो आपल्यासमोर नवी व्हाने घेऊन येतो. आपण आपल्या गतकाळाचे ओझे जोपर्यंत झुगारून देत नाही, जे कदाचित अपयशाचेही असू शकते, आपण आपल्या जीवनाचे विजेते होऊ शकत नाही. आपल्यापैकी अनेक जण बऱ्याच गोष्टींविषयी तक्रार करतात, आपण जेव्हा आपल्या अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच आपण अशाप्रकारे इतर घटकांकडे बोट दाखवतो. मी हे काम मंगळवारी करायला नको होते कारण तो माझ्यासाठी शुभदिवस नाही किंवा मी मुलाखतीसाठी काळा शर्ट घालायला नको होता व अशा इतरही अनेक गोष्टी असतात. खरेतर माझी कामगिरी चांगली झाली नाही ही वस्तुस्थिती न स्वीकारता आपण केवळ आपला खोटा अहंकार झाकण्यासाठी ढाल म्हणून त्याचा वापर करत असतो.
टी20 विश्वचषकाचा तिसरी व सर्वात अवघड बाब होती ती म्हणजे आत्तापर्यंत कोणताही यजमान देश त्यांच्या घरच्या मैदानावर हा कप जिंकला नव्हता. हे अतिशय रोचक आहे कारण इतर बऱ्याच स्पर्धांमध्ये घरच्या मैदानावर, आपल्या चाहत्यांसमोर खेळणाऱ्या यजमान संघाला त्याचा फायदा मिळतो. त्याचप्रमाणे स्वदेशात मैदानावर खेळताना इतर कोणत्याही संघापेक्षा मैदानाची परिस्थितीत तुम्हाला अधिक चांगल्याप्रकारे माहिती असते हा एक फायदा असतो, मग तो कुठलाही खेळ का असेना. परंतु, भारतामध्ये असे होत नाही, कारण इथे काही गोष्टींमध्ये फरक आहे, सर्वप्रथम, भारत हा अतिशय मोठा देश आहे व भौगोलिक परिस्थितीतही बरेच वैविध्य आहे. उदाहरणार्थ भारतीय संघ शेवटचे तीन सामने ज्या मैदानांवर खेळला ते पाहा. वेस्ट इंडीजविरुद्धचा निर्णायक सामना कोलकात्यात खेळला गेला, उपांत्यफेरीचा सामना मुंबईमध्ये खेळला गेला व अंतिम सामना गुजरातमध्ये अहमदाबाद येथे खेळण्यात आला. ही सर्व ठिकाणे हवामान तसेच मैदानाच्या स्थितीच्या बाबतीत एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहेत, जे इतर देशांमध्ये नसते जिथे खेळासाठीची स्थिती सगळीकडे जवळपास सारखी असते. त्याचप्रमाणे भारतीय संघातील खेळाडू देशाच्या विविध भागातून आलेले असतात. त्यापैकी दोन-तीन खेळाडू सोडले तर बहुतेकजण जिथे सामना खेळला जातोय त्याविषयी हे विदेशी खेळाडूंप्रमाणेच पूर्णपणे अनभिज्ञ असतात. त्यामुळेच, मैदानाविषयी किंवा हवामानाच्या परिस्थितीविषयी पूर्णपणे माहिती आहे अशाप्रकारचा कोणताही लाभ मिळत नाही, तरीही भारतीय संघाने विश्वचषक जिंकला ही विशेष बाब आहे. त्याचवेळी घरच्या प्रेक्षकांकडून मिळणारे समर्थन ही जमेची बाजू असली तरीही काही जण तुमची खिल्लीही उडवू शकतात, हे भारतीय संघापेक्षा कुणाला आणखी चांगल्याप्रकारे (विश्वचषकामध्ये कोलकात्यात श्रीलंकेविरुद्ध झालेला पराभव आठवून पाहा) माहिती असेल? त्याचशिवाय तुम्ही भारतासारख्या देशामध्ये जेव्हा अंतिम सामना खेळता तेव्हा जिंकायलाच पाहिजे असे दीडशे कोटी भारतीय जनतेच्या अपेक्षांचे ओझे घेऊन जगत असता. मी खरोखरच सांगतो की आपल्यापैकी बहुतेक जण तो ताण किती असतो याची कल्पनाही करू शकत नाहीत, त्यामुळे तो सहन करणे तर दूरच, म्हणूनच भारतीय संघासाठी यजमान संघ म्हणून टी20 विश्वचषक जिंकणे विशेष आहे.
सर्वात शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय संघ अतिशय व्यावसायिकपणे खेळला कारण अंतिम आठच्या फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून दणदणीत पराभवाला तोंड द्यावे लागले होते, ज्यामुळे उपांत्यफेरीमध्ये आपल्याला प्रवेश मिळण्याची आशा जवळपास संपुष्टात आली होती. परंतु विजेते केवळ एका पराभवामुळे हताश होत नाहीत, हे भारतीय संघ शिकला आहे व हा धडा अतिशय चांगल्याप्रकारे शिकल्याचे त्यांनी सिद्ध केले. त्या पराभवाने त्यांचे डोळे उघडले व पुढील तीन सामने पराभवातून काय शिकलो हे त्यांनी इतर संघांना दाखवून दिले, मोठ्या पराभवातून पुन्हा पराभवाकडे वाटचाल झाली नाही, हे या भारतीय संघाकडून शिकण्यासारखे आहे. आपल्या आयुष्यातही जेव्हा आपले सगळे काही सुरळीत सुरू असते तेव्हा एखादा दिवस असा येतो की नोकरीमध्ये, एखाद्या व्यवहारामध्ये आपल्याला मोठा फटका बसतो. तो फटका आपण कसा पचवतो यावरून आपण खरच कोण आहोत हे ठरत असते व भारतीय संघाने जे विजेते आहेत हे दाखवून दिले आहे. त्यानंतर भारतीय संघाने जिंकलेल्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये मला जाणवलेली आणखी एक बाब म्हणजे, संघ केवळ एकाच खेळाडूवर अवलंबून नव्हता, तरीही प्रत्येक वेळी कुणीतरी पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केली. मग तो संजू सॅमसन असो, इशांत किशन, बुमरा, अक्षर पटेल किंवा दुबे (कृपया गूगल करा), आपल्या प्रत्येक सामन्यामध्ये नवा नायक होता व यामुळेच तुम्ही विजेता संघ बनता, कारण हा संघ केवळ एक-दोन नावांवर अवलंबून नव्हता (म्हणजे मनाने), तर प्रत्येक खेळाडूचा विश्वास होता तो संघासाठी सामना पालटवू शकेल, आपण आपल्या कामाच्या ठिकाणीही आपापल्या संघाकडेही याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. भारतीय संघाची कामगिरी इतकी बिनचूक होती (अर्थात काही वाईट झेलांचा अपवाद वगळून) की या टी20 विश्वचषकामध्ये आपल्याला जिंकण्याचा रोमांच, तो थरार, ती उत्कंठा, प्रार्थना यापैकी काहीच जाणवले नाही, केवळ कामगिरीतून व पूर्णपणे वर्चस्व गाजवत प्रतिस्पर्धी संघाचा थंडपणे अक्षरशः मर्डर करण्यात आला (माफ करा त्यासाठी माझ्या मनात आत्ता केवळ हाच शब्द आला)! टी20चा हा संघ नव्या भारताचा संघ आहे, तो धडाडीचा आहे, त्यात आत्मविश्वास आहे आणि जिंकण्याच्या बाबतीत तो निष्ठूर आहे, हा संघ केवळ जिंकण्यासाठी खेळतो व त्याच्याकडे विजेत्यांचा दृष्टिकोन आहे. विजेत्या संघामध्ये प्रत्येक खेळाडू वेळ येते तेव्हा प्रत्येक खेळाडू विजेत्याप्रमाणे विचार करतो व वागतो व पुढाकार घेतो. म्हणूनच केवळ टी20 विश्वचषक जिंकल्याबद्दल नव्हे तर या प्रक्रियेमध्ये आम्हाला अनेक धडे शिकवल्याबद्दल भारतीय संघाचे शतशः आभार. यापुढेही अशीच कामगिरी पाहायला मिळेल एवढे अशी अपेक्षा करतो एवढे सांगून, पुन्हा एकदा आभार प्रदर्शित करून निरोप घेतो!
*टी29 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यामुळ मला अमिताभ बच्चनच्या दीवार चित्रपटाचे एक दृश्य आठवले. जेव्हा बच्चन प्रतिस्पर्धी टोळीने लुटून नेलेला माल परत मिळवतो व या कामासाठी त्याच्या बॉसकडून त्याला बक्षिस मिळते, तेव्हा त्याचा बॉस त्याच्या सहकाऱ्याला म्हणतो, “इस लडके को देख रहे हो, मुझे इस बात का अचरज नहीं है की इसने अकेले ये काम कर दिया, मुझे इस बात का अचरज है की इसे ये मालूम था की वो काम पूरा कर पाएगा, वो भी अकेले!” मी या ओळी अनुवादित तर करू शकतो परंतु त्यामागच्या भावना पोहोचवू शकत नाही. टी20 चा हा भारतीय संघ आता त्या बच्चनच्या भूमिकेत आहे एवढेच मी म्हणू शकतो!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in










टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा