सहजीवन, निसर्गासोबत!!🏡

 
























सहजीवन, निसर्गासोबत!!🏡

 

“ही जैवविविधता आहे: आपण जीवनाचे हे नाजूक जाळे थंडपणे व पूर्णतया नष्ट करत आहोत.”…  फॉन्स बर्गर.

 

“सुपरमॅन अथवा कॅप्टन अमेरिका हे खरे हिरो नाहीत.  जैवविविधता वाचवणारी सामान्य  माणसे, हे आपले खरे हिरो आहेत जे आपली पृथ्वी वाचवतील; व आपल्यापैकी प्रत्येकामध्ये असा एक आहे”… हकान कापूकू.

“एक शहर म्हणजे मॉल वा आयटी पार्क  वा फ्लायओव्हरस नसून त्या शहरात राहणारे लोक असतात” …मी

 

मी माझ्या मित्रांपैकी एकाला सहजीवन म्हणजे काय हे समजून सांगत होतो तेव्हा या ओळी मी वापरल्या व मी कबूल करतो की शब्द माझे असले तरी त्यामागचे तत्वज्ञान जेन जेकब्ज (कृपया त्यांच्याविषयी गूगल करा) यांचे आहे. माझा मित्र म्हणाला की पुणे आता झपाट्याने वाढत आहे व प्रत्येक उपनगराच्या स्वतःच्या मागण्या आहेत व फायदे आहेत. माझा हा मित्र आयटीमधील (दुसरं कोण) आहे व ग्राहक म्हणून, तसेच जीवनशैलीच्या बाबतीत ही एक वेगळी जमात आहे व त्यांना सगळे काही माहिती असते व प्रत्येक गोष्टीविषयी त्यांचे मत असते. दुसरी गोष्ट ओघानेच येते कारण पुण्याचे नागरिक असण्याचे हे वैशिष्ट्यच आहे. परंतु पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सगळे माहिती असण्याची, याबाबत ते विसरतात की ती केवळ गूगलच्या मेमरीवर उपलब्ध असलेलीच माहिती आहे. मी त्यांना दोष देत नाही कारण आत्तापर्यंत जेन झी व जेन अल्फा यांना माहिती किंवा डेटा म्हणजे ज्ञान असेच वाटत आले आहे, त्यामुळे असो. माहिती व ज्ञानामध्ये फरक आहे, व नेमका हाच माझ्या लेखाचा विषय आहे. संजीवनी किंवा सहजीवन मधील फ्लॅटची विक्री किंवा प्रचार करणे हा इथे उद्देश नाही, तरीही हा प्रकल्प या लेखाच्या केंद्रस्थानी आहे कारण वास्तविक जीवनातील एखाद्या प्रकरणाचा अभ्यास केल्याशिवाय तो लेख म्हणजे केवळ एक शोधनिबंध ठरेल, असा वैधानिक इशारा सुरवातीलाच देतो, lol! तर आम्ही, सुस या पुण्याच्या पश्चिम उपनगरामध्ये एक नवीन प्रकल्प सुरू केला किंवा करणार होतो जो पुणे महानगरपालिकेचा भाग आहे व आपण एखादा प्रकल्प (म्हणजे घरे) कसा बांधू शकतो (म्हणजे घरे) जी वेगळी असणार नाहीत, परंतु जी सगळ्यांचे घर असेल असा मी विचार करत होतो. मी जेव्हा सगळे म्हटले, तेव्हा त्याचा अर्थ केवळ सर्व वर्गातली माणसे असाच होत नाही तर प्रत्येक प्रजातीचा समावेश होतो कारण आपले त्याकडेच दुर्लक्ष होत आहे. तत्पूर्वी, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे, तुमच्यापैकी किती जणांनी तुमचे घर किंवा ऑफिसभोवती माकडे पाहिली आहेत, तुमच्यापैकी किती जणांना वडाच्या पारंब्यांना लोंबकाळल्याचे आठवत आहे, तुमच्यापैकी कितीजण रस्त्याच्या कडेला असलेल्या तेरडा किंवा जंगली झेंडू यासारख्या जंगली फुलांवर बागडणाऱ्या फुलपाखरांच्या मागे धावले आहेत, तुमच्यापैकी किती जणांनी ओढ्याच्या खळखळून वाहणार्‍या पाण्यामध्ये आपली पावले ओली केली आहेत, तुमच्यापैकी किती जणांनी पावसानंतर बेडकांची डराव-डराव ऐकली आहे, तुमच्यापैकी किती जणांनी अलिकडे उघड्या विहीरीतून पाणी शेंदले आहे, तुमच्यापैकी किती जणांनी मोठी विहीर आजूबाजूला पाहिली आहे, तुमच्यापैकी किती जण पतंग, कावळे व कबुतरांव्यतिरिक्त तुमच्या अवतीभोवती पाहिलेल्या इतर पाच पक्षांची नावे सांगू शकतात, माझ्या या तुमच्यापैकी कितीजणांनी पासून सुरू होणाऱ्या प्रश्नांची यादी वाचून तुम्ही थकून जाल कारण यासंदर्भातली माझी ही यादी हनुमानाच्या शेपटीपेक्षाही लांबलचक आहे, त्यामुळेच मी बरेच प्रश्न विचारायचे धाडसही करत नाही, तुमच्यापैकी किती जणांनी शेवटचा काजवा पाहिला आहे व तो गरम आहे  का हे  बघायला त्याला ओंजळीत  धरायचा प्रयत्न केला आहे (अर्थात हळूवारपणे, त्याला इजा न करता), तुमच्यापैकी किती जणांनी मृगाचा किडा (लाल मखमली किडा) शेवटचा पाहिला आहे जो पहिल्या पावसानंतर बाहेर येतो, ही यादी अशी लांबलचक आहे.

जर तुम्ही दोन किंवा तीन प्रश्नांचे उत्तर “होय” असे देऊ शकलात तर मी म्हणेन की तुम्ही पुढे वाचायची गरज नाही, परंतु मला माहिती आहे की अशी परिस्थिती नाही. माझ्याविषयी बोलायचे झाले तर मी कोथरुडमध्ये, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये म्हणजे 1990 च्या दशकात शेवटची माकडे पाहिली. परंतु त्याकाळी चांदणी चौकापासून ते कोथरुडपर्यंत रस्त्याच्या कडेने वड, पिंपळ, कडुनिंब यासारखे मोठे वृक्ष होते व संध्याकाळी माकडे त्या झाडांचा वापर मेट्रोसारखा करून त्यांच्या विश्रांतीच्या जागी म्हणजे एनडीएच्या टेकड्यांवर परत जाऊ शकायची, परंतु आपण ती सर्व झाडे तोडून टाकली व माकडांचा शहरातला मार्गही तोडून टाकला. मी गेल्या जवळपास दोन दशकभरात वडाच्या पारंब्यांना लोंबकाळणारी लहान  मुले पाहिलेली नाहीत, कारण त्यांची जागा आपले रस्ते व आपल्या कारनी घेतली आहे. मी माझ्या  गावातील बऱ्याच खुल्या विहीरी पाहिल्या आहेत, मी काही बांधल्याही आहेत परंतु त्या सोडल्या तर मला पुण्यामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये ताज्या पाण्याची खुली विहीर दिसलेली नाही. मी गेल्या दोन किंवा कदाचित तीन दशकांमध्ये ताज्या पाण्याचा झरा पाहिलेला नाही, ज्यामध्ये मी माझी पावले बुडवू शकतो, कारण ताज्या पाण्याचे बहुतेक झरे एकतर बुजले आहेत/त्यांच्या मार्गात अडथळा आला आहे किंवा आता त्यातून सांडपणी वाहून जाते, व अशाप्रकारे माझ्या उत्तरांची यादी वाढत जाते ज्यातली बहुतक नकारात्मक आहेत. परंतु याला रुपेरी किनार आहे कारण मी स्वतः एक बांधकाम व्यावसायिक व स्थापत्य अभियंता आहे व मला फुलपाखरेही तसेच अनेक पक्षीही दिसतात यामध्ये मैना, तपकिरी कबुतर, सुगरण पक्षी व इतरही असे पक्षी माझ्या स्वतःच्या कार्यालयाभोवती दिसतात, जिथे मी त्यानुसार झाडे लावली आहेत व तुम्ही ती सोबत दिलेल्या फ्लिकरच्या दुव्यावर पाहू शकता! माझ्या अवतीभोवती मृगाचे किडे (लाल रेशमी किडे) व काजवेही असतील असा अधिवास मी निर्माण करू शकलो नाही त्यामुळे त्यांना मी मिस करतो. म्हणूनच मी सहजीवनचे नियोजन करताना विशेषज्ञांना बोलावण्याचा विचार केला, कारण इथे अधिवासाचा विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ व जागा आहे.

अधिवास, या शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत सांगायचा झाला तर वेगवेगळ्या प्रजातींसाठी घर व परिसर असा होतो जो संबंधित प्रजातींना जगण्यासाठी व आरामासाठी त्यांच्या गरजांची काळजी घेतो. ज्याप्रकारे आपल्याला जगण्यासाठी मॉल, शाळा, हॉटेल, रुग्णालये, बाजार लागतात, त्याचप्रमाणे, फुलपाखरे, खारुताई, चिमण्यांनाही जगण्यासाठी काहीतरी लागले, ज्याला आपण अधिवास म्हणतो. अधिवासासाठी जागा लागते, एकांत लागतो, जे काहीवेळा जमीनीचा आकार लहान असलेल्या प्रकल्पांमध्ये शक्य होत नाही व म्हणूनच मला जेव्हा सहजीवनमध्ये संधी मिळाली, तेव्हा मी ते करण्याचा विचार केला, कारण जर मी (म्हणजे आम्ही) वरील सर्व प्रश्नांविषयी विचार केला नाही तर कोण करेल, बरोबर? इथेच शैलजा देशपांडे, अंकुर पटवर्धन, अनुज खरे, रणजीत गाडगीळ यांच्यासारख्या नावांचा मी विचार केला कारण हे सगळे अधिवास ज्यापासून तयार होतो त्या सर्व घटकांचे तज्ज्ञ व अधिकारी व्यक्ती आहेत. ज्याप्रकारे कोणत्याही प्रकल्पासाठी आपल्याला वास्तुविशारद, वास्तुरचनाकार, इलेक्ट्रिक सल्लागार, नळजोडणी सल्लागार आवश्यक असतात जे माणसांचे जीवन आणखी आरामदायक बनविण्यासाठीच्या सेवांचे तज्ज्ञ आहेत, त्याचप्रमाणे, जर मला फुलपाखरे, मासे व पक्ष्यांसाठी काही बांधायचे असेल तर मला त्यांच्या गरजा अधिक चांगल्याप्रकारे समजून घेणाऱ्या व्यक्तींची गरज पडेल, बरोबर? आता निसर्ग संवर्धसाठी काम करणारे कार्यकर्ते व समाजाने (म्हणजे बांधकाम व्यावसायिक व त्यांचे ग्राहक असे मला म्हणायचे आहे) एका सामायिक मंचावर एकत्र आले पाहिजे ज्यातच आपल्या संपूर्ण जैवविविधतेचे भविष्य आहे. असे झाले नाही तर संवर्धन केवळ मूठभर लोकांपुरतेच मर्यादित राहील व केवळ परिषदांमध्ये त्याविषयी चर्चा होईल, प्रत्यक्षात मात्र सगळीकडे अंधःकार असेल, मी या लेखाच्या सुरुवातीला विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या नकारात्मक उत्तरांतूनच त्याची तीव्रता जाणवते, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

अनेकांच्या, (विशेषतः हाडाच्या संवर्धकांच्या) कपाळाला आठ्या पडतील कारण आमच्या सदनिका विकण्यासाठी प्रसिद्धीकरता ही क्लुप्ती आहे असे ते म्हणतील; असो, मी त्यांची तोंडे (व बोटे, मोबाईल वरील) बंद करू शकत नाही (समाज माध्यमांचे वर्चस्व असलेल्या युगात निश्चित नाही ज्यामध्ये प्रत्येकाला त्याचे किंवा तिचे मत असते) परंतु असे प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला मला प्रतिप्रश्न करावासा वाटतो की असे करून बघण्यात गमावण्यासारखे काय आहे? आपण सर्व जण शाश्वततेविषयी बोलतो व जर आपल्या शाश्वतता हवी असेल तर पृथ्वीशी संबंधित सर्व घटकांना आरामात जगता आले पाहिजे, तर व्यवसायांनाही त्यांचे आर्थिक आरोग्य जपता आले पाहिजे, त्यात काही गैर नाही. परंतु असे करताना जर मी अधिवास तयार करायचा प्रयत्न करत असेन तर त्यात गैर काय आहे, असा प्रश्न मला ज्यांना शैलजा, अनुज व अंकूर सर यांच्यासारख्या नावांशी जोडले जाण्यामागचे कारण खरोखरच जाणून घ्यायचे आहे त्यांना विचारायचा आहे. ते सहजीवनचे सल्लागार/तज्ज्ञ असण्याव्यतिरिक्त स्वतःला त्याचे ब्रँड दूतही म्हणवत असतील तर त्यात गैर काय आहे, जो संपूर्ण जैवविविधतेचे व्यापक हित विचारात घेऊन विकसित करण्यात आला आहे, असा प्रश्न मला इथे विचारावासा वाटतो. ही सगळी सुक्षिक्षित व तळमळीने काम करणारी मंडळी आहेत ज्यांना पर्यावरणाशी संबंधित घटकांची काळजी आहे व जो प्रकल्प केवळ त्यांच्या चेहऱ्याचा वापर करतो व प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस पावले उचलत नाही अशा कुठल्याही प्रकल्पाशी ते केवळ प्रसिद्धी व पैसा यासाठी जोडले जाणार नाहीत, एवढा विश्वास आपण त्यांच्यावर नक्कीच ठेवू शकतो, बरोबर? किंबहुना या प्रकल्पाचा मूळ उद्देश म्हणजे प्रत्येक प्रजातीसाठी घर त्याची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प योग्य दिशेने वाटचाल करेल हे ते पाहतील व इतर कुणी त्या मार्गाचे पालन करत असेल, तर त्यामध्येच या शहराचे हिरवे भविष्य आहे, जे सध्यातरी गडद दिसते. आपल्या देशाची किंवा समाजाची समस्या अशी आहे की, आपल्याला एखाद्या गोष्टीची किंमत मोजून काहीतरी वाचवायचे असते, यासाठीच आपण संवर्धनाच्या आघाडीवर पुन्हा, पुन्हा अपयशी ठरतो. वाघांच्या संवर्धनाचेच पाहा, जेव्हा वाघ जंगलाभोवती राहणाऱ्या स्थानिकांसाठी उत्पन्नाचा स्रोत झाले, तेव्हाच त्यांचे संवर्धन यशस्वी झाले व त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे ताडोबा जेथे 2 लाख लोकांमध्ये जवळपास 200 वाघ राहतात, कारण दोघांनाही एकमेकांची गरज आहे. अशाच प्रकारे जर पुण्यातून झाडे, ताजे पाणी, फुलपाखरे, चिमण्या व इतरही अनेक प्रजाती माणसांच्या घरांमुळे (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांमुळे) नाहीशा होत असतील तर, बांधकाम व्यावसायिकांसोबत काम करून, आपण त्या सर्वांना परत बोलावू शकतो, हा माझ्या लेखाचा विषय आहे. तसेच हे काम फक्त सहजीवनपुरतेच मर्यादित नाही, टीम संजीवनी जंगल बेल्ससह शालेय विद्यार्थ्यांसाठी जागरुकता कार्यक्रम राबवते जी निसर्ग संवर्धनासाठी आपली आशा आहेत व आम्ही इतर गृहनिर्माण संस्थांनाही जल संवर्धनासारख्या मुद्द्यांवर मदत करण्याचा प्रयत्न करतो कारण आता आपल्या भोवती असलेला निसर्ग वाचवणे हे सगळ्यांचेच युद्ध आहे, आता हे माझे किंवा तुमचे राहिलेले नाही.

इथे झेन फिलॉसॉफी मधील एक गोष्ट सांगून मी समारोप करतो,कारण मी या तत्वज्ञानानुसार जगण्याचा प्रयत्न करतो.

" एका झेन साधकाच्या आश्रमात, जेथे तो त्याच्या शिष्यांना तत्त्वज्ञान शिकवत असे, तेथे त्यांच्या वैयक्तिक वस्तू चोरीला जाऊ लागल्याची विद्यार्थ्यांना जाणीव होऊ लागते, म्हणजे विद्यार्थ्यांपैकीच कुणी चोर असावा अशी शंका घेतली जाते. एकेदिवशी ते विद्यार्थ्यांपैकी एकाला पकडतात व त्याची वर्गातून हकालपट्टी करावी अशी गुरूकडे  मागणी करतात. परंतु गुरु  असे करायला नकार देतो व म्हणतो की चोर विद्यार्थी वर्गातच थांबेल, हे ऐकून उर्वरित विद्यार्थी रागावतात व म्हणतात की मग सर्वजण वर्गातून बाहेर पडतील कारण ते एका चोरासोबत वर्गात बसू शकत नाहीत. तरीही भिक्षुक म्हणतो काही हरकत नाही, तुम्ही वर्गातून बाहेर जाऊ शकता, मी काही त्या चोराला माझ्या वर्गातून बाहेर जायला सांगणार नाही. भिक्षुकाच्या उत्तराने आश्चर्य वाटून एक विद्यार्थी विचारतो की एका चोराने तुमच्या वर्गात बसणे व इतरांनी वर्गाबाहेर जाणे हे तुम्हाला कसे काय मान्य आहे? यावर भिक्षुक स्मितहास्य करतो, व उत्तर देतो, या चोरी करणाऱ्या विद्यार्थ्यालाच, माझ्या शिकवण्याची सर्वाधिक गरज आहे हे तुम्हाला दिसत नाहीये का !!"

ही गोष्ट इथेच संपते व मला असे वाटते हाच तर्क लावला, तर निसर्गाचे सर्व संवर्धक जे समाजासाठी झेन साधकाच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांनी या गोष्टीतून शिकले पाहिजे, कारण इथे निसर्गाच्या आघाडीवर तथाकथित चोर ( सॉरी) म्हणजे बांधकाम व्यावसायिक व त्यांच्या घरांचे ग्राहक जे ह्या सगळ्याच गोष्टींविषयी अनभिज्ञ आहेत. मला आनंद होतो की भविष्यात जेव्हा आम्ही मागे वळून पाहू, तेव्हा आम्हाला सहजीवनचा अभिमानच वाटेल, किमान आम्ही असे काहीतरी बांधण्याचा प्रयत्न तर केला ज्यासाठी आमच्या पुढच्या पिढ्या विहीर, फुलपाखरे, वडाची झाडे, पक्षी व इतरही बऱ्याच गोष्टींचे त्यांच्यासाठी संवर्धन केल्याबद्दल आमचे आभार मानतील; एवढे बोलून निरोप घेतो!

*या  आघाडीवर आमचे  काही प्रयत्न सोबतच्या लिंक्स वर कृपया पाहा …

 

https://flic.kr/s/aHsjwzKptx

 

संजय  देशपांडे

smd156812@gmail.com  

www.junglebelles.in

www.sanjeevanideve.com




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जुनाबाई वाघिणीचा संयमाचा धडा आणि ताडोबाची शाळा!!🐾

शेअरिंगवाली दिवाळी !

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड