बाबा

 











13 03 35 - 18 09 26

वडील म्हणजे फक्त जन्मदाता नव्हे,  तर ती एक एज्युकेशन सिस्टीम आहे,  नशिबवान  लोकांनाच अ‍ॅडमिशन मिळते इथे...

बाबा, 

92 वर्षे,  "बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही बडी होनी चाहीये", अनेक वर्षे ह्या डायलॉगचा अर्थ समजला नव्हता,  की काय फरक आहे बडी काय आणि लंबी काय,  दोन्हीचा मतलब मोठे किंवा खूपच ना!! बाबांना बघितला की कळायचं जिंदगी बडी भी हो सकती है और लंबी भी!! बाबा, तुम्ही फक्त तुमच्या मनाने जगलात आणि गेलात पण तसेच कारण 6च महिन्यापूर्वी वाढदिवसाला तुमचा थकलेला जरी फोटो होता तरी मीच कॅप्शन दिली होती, "I am old, not obsolete" i.e. म्हातारा झालोय, संपलो नाहिये! पण प्रत्येक प्रवास कुठेतरी कधीतरी संपतोच,  आणि मागे राहतात प्रवासाच्या आठवणी! तुम्ही मला दिलेल्या असंख्य शिकवणी मधून सिनेमाचा वेड ही एक आणि कदाचित आपल्या फारच थोड्या साधर्म्य गुणांपैकी एक, म्हणुनच सिनेमाचे संदर्भ मला फार कामात येतात स्वतःला एक्सप्रेस करायला! आजच्या ( माझ्या सुद्धा) मुलांकडे बघितले आणि त्यांच्या वडील   ( आणि आई पण) या व्यक्ती कडून अपेक्षा आणि त्या अपेक्षा पुर्ण नाही झाल्यावरच्या रिअ‍ॅक्शन्स बघितल्या तर आम्ही रोजच आत्महत्या करायला पाहिजे होती आणि ह्यात तुमचा दोष नाहिये,  रादर आम्ही मोस्ट लकी होतो की आम्हाला आमची किंवा आमच्या भावनांची शुन्य किम्मत करणारे वडील मिळाले कारण त्यामुळेच पुढे जेंव्हा खूप काही मिळाल, तेंव्हा प्रत्येक गोष्टीची किम्मत पण कळली आणि टिकली पण मनात कायम ती किम्मत!!आणि तेंव्हा सगळेच वडील असेच होते, सो, थँक्स तुम्ही योग्य पाथ  फॉलो केला आणि आम्हालाही कायम जागेवर ठेवले!बाबा, सगळ्यात मोठी गिफ्ट तुम्ही दिलीत ती शिस्तीची कारण त्यामुळेच पुढच्या सगळ्या शिकवणी सोप्या गेल्या आणि अमलात पण आणता आल्या! आपल्यामधे रोज बोलणं नव्हता किंवा दूर असताना कॉलची  पण सोय नव्हती तरीही एक Wi-Fi कनेक्शन कायम होतं,  दिसायच नाही पण जाणवायचा! तुम्ही रुढ अर्थानी लाड नाही केलेत शिक्षा मात्र भरपूर केल्या पण त्यामुळेच लाडाची पण एक किम्मत असते हे कळल आणि सगळ्यात महत्वाचं, सगळे काही विकत किंवा उधार आणता येतं पण मनाचा कणखरपणा आणि जबाबदारी घेण्याची वृत्ती, हे मात्र आपल्या स्वतःलाच घडवावी लागते, ही जाणिव! आणि  हो, हे सगळ करताना जपलेला स्वतःचा अभिमान (जो बर्‍याच जणांना इगो सुद्धा वाटु शकतो), पण हीच तर शिकवणी होती,  "मुझ पर एक एहसान करना की मुझ पर कोई एहासान ना करना" वाला अ‍ॅटॅटीट्यूड," ही तुमचीच  गिफ्ट  आहे  मला, lol!! आणि स्वता:चे मन पण मारायचे तुम्ही जबाबदारीसाठी, खामगाव मधे आपल्या एरियात पहिला फ्रिज आपल्याकडे आला,  पहिला  कलर टीव्ही  आपल्याकडे आला,  पहिला फोन आपल्याकडे आला कारण तुमची हौस, तुम्हाला 4 चाकी घ्यायची खुप इच्छा होती पण केवळ आमच शिक्षण आणि आमचे संसार नजरेसमोर ठेऊन तुमची इच्छा बाजूला ठेवली,  हे तुम्ही नाही बोलून दाखवलं तरीही आम्हाला समजलं होतं आणि त्यामागचा धडा सुद्धा! आणि दहा पैश्यांचा हिशोब सुद्धा  लिहून ठेवायची सवय, ती मला आजसुद्धा  बिझनेस मधे कामात येतेय! तुम्ही टीचर होतात आणि मी रुढ अर्थाने तुमचा विद्यार्थी कधीच नव्हतो पण जगाच्या वर्गात कायम क्लास टीचर म्हणुन तुम्ही मिळाला, I am मोस्ट लकी स्टुडंट! बर्‍याच गोष्टी एकमेकाना कधी प्रत्यक्षात सांगितल्या नाहीत आणि ऐकल्या पण नाहीत,  मात्र त्यामुळे दुरावा कधीच नव्हता,  हे नक्की! आणि हो तुमचं झाडांवरच प्रेम, त्यामुळेच लोकं काय म्हणतील याचा विचार ना करता तुमच्या अस्थी  आपल्या टेरेसवरच्या सगळ्या कुंड्यां मधील मातीत  मिसळून टाकल्या!आज तुमचा आत्मा जर आजूबाजूला अडकला असेल तर तो तुमचाच चॉईस आहे कारण आजही तुम्ही काय करायचय ते तुम्हाला सांगायची ऑथॉरिटी  घेण्याची माझी ताकद नाही! इतकच सांगतो,  आता तुम्ही शरीराने इथे नाहीत पण तुमचा अस्तित्व कायम सोबत असेल आणि ज्या रस्त्यावर तुम्हाला मी चालणे अपेक्षित होते तोच रस्ता माझा राहील कारण तोच योग्य रस्ता होता आणि असेल, आणि रोहित,  रोहन, निखिल, केतकी सुद्धा त्यावरच चालतील ह्यासाठी मी माझ्या परीने पुर्ण प्रयत्न करीन,  हीच माझी आणि नीताची तुम्हाला श्रद्धांजली!!🌱🙏🏻

नीतासाठी पण मीच लिहितोय, कारण एक म्हणजे तिने मुलापेक्षा जास्त जबाबदारी निभावली तुमची आणि दुसरा म्हणजे ती ईतके लिहूच शकणार नाही, हे तुम्हाला कळेल, lol!!

तुमचा मुलगा आणि मुलगी


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

हनुमान अंश; प्रवास, श्रद्धा आणि आशेचा!

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??