वाइल्ड फेस्ट फॉर किड्स- सीजन 3; ताडोबा बफरची जादू..!!🐾🐾
वाइल्ड फेस्ट फॉर किड्स- सीजन 3; ताडोबा बफरची जादू..!!🐾🐾
"मोडलेल्या प्रौढ व्यक्तींना जोडण्यापेक्षा सशक्त मुले घडवणे अधिक सोपे असते" … फ्रेड्रिक डग्लस
"आपण आपल्या मुलांना जी संपत्ती देऊ शकतो त्यातली सर्वात उत्तम संपत्ती म्हणजे, त्यांचे पाय जमीनीवर राहण्यासाठी घट्ट मुळे व दुसरे म्हणजे त्यांना उडता यावे यासाठी पंख" …. जॉन वुल्फगँग व्हॉन गॉथे
"आपण जर आपल्या आयुष्यामध्ये वाघांचे महत्त्व आपल्या मुलांना समजावून सांगू शकलो, तरच संपूर्ण जंगलासाठी काही आशा आहे" … मी
वरील व त्यातील विषयामुळे गोंधळून जाऊ नका कारण बाल मानसशास्त्र हा निश्चितच माझा विषय नाही. मात्र लेखाचा विषय असा आहे की जो मुलांना आवडतो किंवा आवडू लागला आहे व तो म्हणजे वन्यजीवन. या लेखामध्येही ताडोबा आहे परंतु तो फक्त ताडोबाविषयी नाही (सुदैवाने, हाहा)! तर शब्दाचा खेळ पुरे झाला, हा लेख “लहान मुलांसाठी वन्य महोत्सव; आवृत्ती 3 री” या उपक्रमाविषयी आहे जो जंगल बेल्स व नेचर वॉक (कृपया गूगल करा) यांनी आयोजित केला होता. त्यापेक्षाही अधिक म्हणजे हा लेख या महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी आहे व तीच वन्यजीवनासाठी सर्वात मोठी आशा आहे, विशेषतः आपले माननीय सरकार (म्हणजे संपूर्ण यंत्रणा) ढळढळीतपणे वन्यजीवनाविरुद्ध वर्तन करीत असताना, अर्थात सर्वजण हे उघडपणे मान्य करणार नाहीत. तुम्ही आज कोणतेही वर्तमानपत्र उघडा, मग ते पश्चिम घाट असोत किंवा अरवली (कृपया गूगल करा) किंवा अगदी आपले प्रिय ताडोबा, सगळीकडे वन्यजीवनाला धोका निर्माण झाला आहे व हे केवळ आपल्यामुळे म्हणजे माणसांमुळे झाले आहे. आपली हाव, ज्याला आपण आपली गरज म्हणतो किंवा विकास किंवा वाढ प्रत्येक चौरस इंच जमीन गिळंकृत (माफ करा मी याच शब्दाचा विचार करू शकतो) करत चालली आहे, जी प्रत्येक स्वरूपातील वन्य जीवनाचे घर आहे. हे कमी असावे किंवा काय आपण कोणत्याही वन्यप्राण्याच्या, पक्ष्याच्या, किंवा माशाच्या आयुष्याची काळजी करत नाही, कारण जंगलातून जाणाऱ्या आपण बांधलेल्या रस्त्यांवरून आपल्या गाड्या चालवतो तेव्हा त्यामध्ये दरवर्षी हजारो प्राणी मारले जातात. आपल्या बोटी व सांडपाण्यामुळे नद्या व जलाशय प्रदूषित होतात व सर्व प्रकारचे मासे व जलचर मारले जातात, आपण हवाही प्रदूषित करतो व आपण आपल्या घरांसाठी झाडे तोडतो, ज्यामुळे लाखो पक्षी, फुलपाखरे बेघर होतात, व हा सगळा आपल्याच कृत्यांचा परिणाम आहे म्हणजे काही वन्यजीवनाचा मृत्यू होतो. याच कारणामुळे लहान मुलांना त्यांच्या भविष्यासाठी आम्ही काय करत आहोत याविषयी जागरुक करायचे ठरवले. कारण आपल्या देशाची संपत्ती व जमीन यासारख्या मालमत्ता हाताळणाऱ्या कायद्यानुसारही, दोन प्रकारच्या मालमत्ता असतात, एक म्हणजे स्वकष्टार्जित व दुसरी म्हणजे वडिलोपार्जित. दुसऱ्या प्रकारच्या मालमत्तेवर कुटुंबातील अगदी लहान मुलांचाही हक्क असतो व तुम्ही स्वतःच्या इच्छेने तो त्यांपासून हिरावून घेऊ शकत नाही. तर अशा मालमत्तेमध्ये समान हक्क असलेल्या लहान मुलांना तुम्हाला नुकसानभरपाई द्यावी लागेल. ही तरतूद यासाठी आहे की मालमत्ता तुमच्या वाडवडिलांनी कमावली असेल; तर पुढील पिढीचा त्यावर हक्क असतो व केवळ एखाद्याच पिढीला त्याचा फायदा होऊ नये व तिने तो टाकून देऊ नये किंवा त्याचा उपभोग घेऊ नये. त्याचप्रकारे, आज आपल्याकडे जे वन्यजीवन आहे, ती केवळ कोणत्याही एका पिढीच्या मालकीची संपत्ती नाही तर निसर्गच तिचे संवर्धन करतो व ती आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेसारखी आहे व आपण ती पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवलीच पाहिजे किंवा तिचे संरक्षण केलेच पाहिजे. जर आपण या कायद्याचे पालन करत नसू व ही मालमत्ता वाया घालवत असू तर पुढील पिढ्यांना आपण आपल्या कृतींविषयी तसेच त्यांच्याकडे असलेल्या किंवा त्यांचा हक्क असलेल्या मालमत्तेविषयी जागरुक केले पाहिजे, हाच या लहान मुलांसाठी वन्य महोत्सवाचा (डब्ल्यूएफएफके) एकमेव हेतू होता!
आपल्याकडे असलेल्या समृद्ध वारसा मुलांना समजावा यासाठी ताडोबा (माफ करा, ताडोबाचे वेड असलेला केवळ मीच वेडा माणूस नाही) त्यातही तेथील बफर क्षेत्र याहून अधिक चांगली संकल्पना कोणती असू शकते. म्हणूनच असे ठरवण्यात आले की यावर्षीची लहान मुलांसाठीच्या वन्यजीवन महोत्सवाची आवृत्ती ताडोबाच्या बफर क्षेत्राला व सहजीवनाला समर्पित करायची. एकदा ही संकल्पना ठरवण्यात आल्यानंतर दुसरी पायरी अशी होती की, आपण लहान मुलांना काय दाखवावे म्हणजे लहान मुलांना हा विषय जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे समजेल व हाच सर्वात किचकट भाग असतो कारण आजकालच्या मुलांना संयम अतिशय कमी असतो हे आपण जाणतो. तरीही आम्ही हे ठरवले होते की केवळ वाघांची छायाचित्रे किंवा माहितीपट दाखवायचे नाही, कारण ते कुणालाही ओटीटी वाहिन्यांवर व इन्स्टाग्रामवर पाहता येतील, अशी माध्यमे सर्वोत्तम छायाचित्रकारांनी काढलेल्या वन्यजीवनाच्या सर्वोत्तम छायाचित्रांनी भरलेली आहेत. म्हणूनच, असे कुणीतरी हवे जे या मुलांशी ताडोबातील वन्यजीवन प्रत्यक्षात कसे आहे याविषयी, त्यांना कंटाळवाणे होणार नाही अशाप्रकारे बोलू शकेल. सुदैवाने आम्ही अशा व्यक्तींचा विचार करत असताना आम्हाला एकापेक्षा अधिक व्यक्ती सापडल्या. कारण ताडोबामध्ये केवळ वाघच नाहीत तर माणसेही आहेत जी वाघ तसेच वन्यजीवन अतिशय बारकाईने जाणतात. आम्हाला ताडोबाची छुपी बाजू, तसेच ताडोबामध्ये वन्यजीवनाच्या यशस्वी सहजीवनाच्या मागे असलेल्या व्यक्तीही दाखवायच्या होत्या. म्हणूनच आम्ही भारतीय वनसेवेतील अधिकारी, श्री कुशाग्र पाठक यांची निवड केली जे भारतीय प्रादेशिक सेनेतील लेफ्टनंट सुद्धा आहेत व ताडोबातील बफर क्षेत्राचे उप संचालक आहेत. त्यानंतर असा एक माणूस आहे ज्याने शंभराहून अधिक वाघांवर उपचार केला आहे व त्यांना वाचवले आहे ते म्हणजे डॉ. रविकांत खोब्रागडे जे ताडोबातील पशुचिकित्सक आहेत व वाघांना पकडणे व त्यांच्यावर उपचार करण्यात त्यांचे नैपुण्य आहे. त्याचप्रमाणे आम्ही श्री अनंत सोनावणे यांनाही बोलावले होते, ज्यांनी ताडोबाची राणी असलेल्या माया या वाघीणीविषयी एक अतिशय उत्तम पुस्तक लिहीले आहे, तसेच ते ताडोबाचे मासिक ‘ताडोबा डायरीज’चे संपादकही आहे. त्याचप्रमाणे आम्ही श्री. सुमेश लेखी, या छायाचित्रणकारांनाही बोलावले होते जे वन्यजीवनावरील चित्रपटांचे चित्रण करतात व ताडोबा तसेच आजूबाजूच्या जंगलातील चित्रिकरणाविषयी त्यांच्याकडे अतिशय रोचक कथा होत्या. त्याचप्रमाणे श्रीमत मृदुला केळकर व त्यांच्या संघाने वाघांविषयी कठपुतळ्यांचा खेळही सादर केला. सर्वात शेवटी होते श्री. सुमेध वाघमारे, जे ताडोबामध्ये गाईड आहेत व बर्डमॅन या टोपण नावाने ओळखले जातात. ते जवळपास शंभराहून अधिक वन्य पक्ष्यांची नक्कल करू शकतात. अशाप्रकारे कार्यक्रमाची रूपरेखा तयार झाली. आश्चर्य म्हणजे आम्ही वरील लोकांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी संपर्क केला, त्या सर्वांनी ते स्वीकारले व केवळ या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटर लांब प्रवास करून पुण्याला येण्याचे आश्वासन दिले. त्याचशिवाय आणखी दोन नावे महोत्सवाशी जोडली गेली ती म्हणजे पुणे वन विभाग व त्याचसोबत खुद्द महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), यासाठी श्री. आशीष ठाकरे, आयएफएस, सीसीएफ पुणे व श्री. निलेश गटणे, आयएएस, एमटीडीसी, या दोघांचेही आभार, या दोघांना महोत्सवाची संकल्पना आवडली व त्यांनी त्यामध्ये सहभागी होण्याचे मान्य केले!
यामध्ये महत्त्वाची समस्या होती (व अजूनही आहे), निधी उभारण्याची कारण एक वैयक्तिक कंपनी म्हणून आमच्या मर्यादा आहेत, तरीही संजीवनी म्हणून आम्हाला शक्य ती जी मदत करता येईल ती करायचा आम्ही प्रयत्न करतो. सुदैवाने या हेतूची काळजी करणारी, आदर करणारी व मदत करणारी श्री.झाला, श्री. किरण नेहते व तथास्तु समूहाचे श्री. अनिल अग्रवाल यासारखी मंडळी होती, व सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोगनव्हिला फार्मचे श्री. सिद्धार्थ गोखले होते, कारण पुण्यासारख्या शहरामध्ये आर्थिक व जागेच्या दृष्टीने कार्यक्रमाचे ठिकाण महत्त्वाचे असते. मी स्वतः या सगळ्यांचा अतिशय आभारी आहे व निश्चितच त्यांच्या प्रायोजकत्वामुळे दोघांचाही फायदा झाला, त्याविषयी या लेखाच्या शेवटच्या भागात सांगेन. तर हा कार्यक्रम अतिशय विचारपूर्वक 10 जानेवारी 26 रोजी आयोजित करण्यात आला, कारण नवीन वर्षातील पहिला आठवडा सरल्यानंतर दुसरा शनिवार होता, लोक सुट्ट्या संपवून परत आलेले होते. त्याचप्रमाणे शाळेच्या परीक्षाही अजून सुरू व्हायच्या होत्या, त्यामुळे लहान मुले तुलनेने मोकळी होती. आम्ही रविवारच्याऐवजी शनिवार निवडला, कारण रविवारी बहुतेक लोकांचे काहीना काही कार्यक्रम ठरलेले असतात व हा कार्यक्रम केवळ लहान मुलांसाठी होता, परंतु लहान मुलांसोबत आलेल्या पालकांचेही स्वागत होते, lol! त्याचप्रमाणे वेळही विचारात घेणे आवश्यक होते, वर नमूद केलेल्या सर्व वक्त्यांना त्यांचा विषय मांडण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक होते, त्याचवेळी मुलांचा संयम किती असेल हेदेखील विचारात घेणे आवश्यक होते, जी खरोखरच तारेवरची कसरत होती. वेळेची काटछाट करूनही संपूर्ण कार्यक्रम जवळपास पाच तासांचा होत होता. यावेळी या सर्व गोष्टी विचारात घेऊन, आम्ही खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच टॅटू (तात्पुरते) व फेस पेंटिंग यासारख्या काही मनोरंजक स्टॉलचे नियोजनही केले होते, यामुळे मुलांना थोडी मौजमजा करता येईल तसेच विश्रांतीही मिळावी असा हेतू होता.
अगदी दुपारी 4 वाजल्यापासूनच गर्दी सुरू झाली होती, यात सर्वात नेत्रसुखद दृश्य होते ते म्हणजे मुलांसोबत त्यांचे पालक व आजी-आजोबाही कार्यक्रमासाठी नावनोंदणी करण्यासाठी रांग लावून उभे होते. हे सगळे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून आलेले होते. यातून पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे वन्यजीवनाला जात, धर्म किंवा आर्थिक स्थिती अशा सीमा नसतात. कार्यक्रमाची सुरुवात वाघांविषयीच्या कठपुतळ्यांच्या कार्यक्रमाने झाली ज्यात त्यांचे महत्त्व सांगण्यात आले. त्यानंतर पुढील पाच तास मुलांना वन्यजीवनाचा निखळ आनंद देणारे होते, जो त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांमधून, टाळ्यांमधून व एकाग्रतेतून दिसून येत होता. मी नमूद केल्याप्रमाणे डॉ. खोब्रागडे यांचा विषय थोडा तांत्रिक होता तरीही मुले ऐकत होती, त्यांच्या कामाविषयी, त्यातील आव्हानांविषयी व संबंधित बाबींविषयी प्रश्न विचारण्यास उत्सुक होती. लेफ्टनंट कुशाग्र पाठक यांनी, वन विभाग जंगलाच्या अवतीभोवती राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या जीवनात वन्यजीवनाला सामावून घ्यावे यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करत आहे तसेच गाभा क्षेत्र म्हणजे काय, बफर क्षेत्र म्हणजे काय हे समजून सांगितले. लेखक अनंत सोनावणे यांनी अनुज खरे यांनी घेतलेल्या एका उत्स्फूर्त मुलाखतीमध्ये माया वाघीणीविषयी गोष्टी सांगितल्या, जी ताडोबातील बहुधा सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक छायाचित्रे काढण्यात आलेली वाघीण असावी. विशेष म्हणजे, कार्यक्रम स्थळाच्या प्रवेशद्वारापाशी माया व मातरम (मध्यप्रदेशातील पेंचमधील वाघीण) यांची मोठ्या आकारातील चित्रे लावण्यात आली होती. मी पाहात होतो की दर दहा मुलांपैकी आठ मुले माया व मातरमच्या चित्राशेजारी उभी राहून सेल्फी काढत होती. पुढच्या पिढीला वन्यजीवनाविषयी असलेला जिव्हाळा व त्यांचे त्याच्याशी असलेले नातेच यातून ठळकपणे दिसून येत होते. जंगल बेल्सच्या हेमांगी वर्तक यांनी सुमेश लेखी यांची मुलाखत घेतली व त्यांनी वन्यजीवन तसेच ताडोबातील भूदृश्याविषयी समजून सांगितले, ज्याला मुलांना अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. शेवटचा कार्यक्रम होता सुमेध वाघमारे यांचा, त्यांनी त्यांच्या ताडोबातील बोलीमध्ये वन्यजीवनातील त्यांचे अनुभव विषद करून लहान मुलांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही थक्क करून सोडले. त्यांनी वाघांसोबतच इतर प्रजातींचे महत्त्वही नमूद केले. या सर्व कार्यक्रमाला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की रात्री 9.30 वाजता आम्हाला प्रेक्षकांना हात जोडून कार्यक्रम समाप्त करत असल्याची विनंती करावी लागली, कारण जवळपास सहा तासांहून अधिक काळ होऊन गेला होता. आमचा संघ दिवसभर काम करत होता, सर्व थकून गेले होते, परंतु चेहऱ्यावर आनंद व समाधान होते. किंबहुना जंगलामध्ये संपूर्ण दिवसाच्या सफारीच्यावेळी जशी भावना असते ज्यासाठी आपल्याला सकाळी 5 वाजता उठावे लागते व जंगलात जवळपास चौदा तास घालवल्यानंतरही आपल्याला दमायला होत नाही कारण वन्यजीवनाचा आपल्यावर होणारा परिणामच तसा असतो, या वन्यजीवन महोत्सव त्या सफारीसारखाच होता. हा वन्यजीवन महोत्सव कोणत्याही लोकप्रिय व्यक्तीच्या सहभागाशिवाय किंवा वन्यजीवनातील तथाकथित बड्या नावाशिवाय यशस्वी झाला, कारण यातील सर्वात लोकप्रिय पात्र होते ताडोबा व ताडोबातील वन्यजीवनासाठी अतिशय बांधिलकीने काम करणारी माणसे.
शेवट करण्यापूर्वी मी काही तथ्ये (कटू) सांगतो, आम्हाला हे मुलांसाठी करायचे होते व आम्ही ते निःशुल्क ठेवले होते व कोणत्याही मुलांकडून अथवा पालकांकडून एक रुपयाही घेतला नव्हता. या सगळ्या आयोजनासाठी बराच खर्च येतो, प्रायोजकांच्या मदतीनंतरही जाणवणारी तूट मोठी होती व जंगल बेल्स व नेचर वॉकच्या संघांनी अनेक सधन व्यक्तींना, कंपन्यांना संपर्क केला होता ज्यांनी कधीच प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांना फेटाळून लावले. मला मान्य आहे, तुम्ही कुणालाही स्वयंसेवी कार्यासाठी बळजबरी करू शकत नाही, परंतु ज्या व्यक्ती अथवा कंपन्या अनेक कारणांसाठी विविध हेतूने लाखो रुपये खर्च करतात ज्यामध्ये प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग असतो किंवा त्या काही राजकारणी व्यक्तींची खुशामत करण्याचा प्रयत्न करतात (म्हणजे राजकारणी किंवा नोकरशहा), त्या आपणहून वन्यजीवनासाठी मदत का करू शकत नाहीत? माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या उत्पादनाचे ब्रँडिंग करण्यासाठी ही सर्वोत्तम संधी पण असू शकते. त्याचप्रमाणे इथे मुलांची व पालकांची मोठ्या संख्येने हजेरी केवळ आभासी जगातील नव्हे तर प्रत्यक्ष असते. शाश्वतेमुळे दोन्ही बाजूंना लाभ होईल व वन्यजीवन महोत्सवामुळे वन्य संवर्धनास व त्याच्याशी संबंधित असलेल्या ब्रँडनाही व्यावसायिक मदत होईल. आपल्याकडील सधन व्यक्ती (श्रीमंत व्यक्ती) व वन्यजीवनाशी संबंधित कार्यक्रमांना मदत करण्यासंदर्भातील त्यांचा दृष्टिकोन पाहता, वन्यजीवनाची ताकद पुरेशी समजून न घेण्याइतपत आपण मूर्ख आहोत, त्याचसोबत आपण वन्यजीवनासंदर्भातील व आपल्या पुढील पिढीसंदर्भातील आपल्या जबाबदारीविषयी अनभिज्ञही आहोत. म्हणूनच लोकहो जागे व्हा, एवढे बोलून निरोप घेतो व मुलांसाठीच्या वन्य महोत्सवाची पुढील आवृत्ती अधिक उत्साहाने व जोमाने घेऊन परत येण्याचे आश्वासन देतो.
खाली दिलेल्या दुव्यावर वन्य जीवन महोत्सवाच्या ३ऱ्या आवृत्तीची आणखी क्षणचित्रे पाहा …
https://www.flickr.com/photos/coexistance_is_the_key/albums/72177720331545469
https://www.instagram.com/reel/DTpX-NkEfy-/?igsh=dWwzd2xqY3BxeHAw
(आमच्या संपर्कात राहण्यासाठी आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा)
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in











टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा