संयम आणि चिकाटी यांची टेस्ट घेणारी टेस्ट सिरीज!!
संयम आणि चिकाटी यांची टेस्ट घेणारी टेस्ट सिरीज!!
“कसोटी क्रिकेटची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे पाच दिवस प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्यांच्या पसरदारी खेळायचे असते किंवा घरच्या मैदानावर आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आघाडी लढवायची असते – प्रत्येक सत्रावर वर्चस्व गाजवायचे असते, प्रत्येक दिवसावर वर्चस्व गाजवायचे असते, स्पर्धा जिंकण्यासाठी २० गडी बाद करायचे असतात. ही चाहत्यांना ऐतिहासिकदृष्ट्या क्रिकेटची सर्वात चित्तवेधक भेट आहे”… रवी शास्त्री.
"ही मालिका आमच्यापैकी प्रत्येकाचीच शारीरिक, मानसिक व भावनिक रित्या दमवणारी होती, परंतु त्या बदल्यात आम्हाला काहीतरी अतिशय महत्त्वाचे मिळाले, ते म्हणजे स्वतः चा शोध ” ... केएल राहुल.
“युद्धे त्यांच्या निकालांसाठी लक्षात ठेवली जात नाहीत तर ज्याप्रकारे योद्धे लढले त्यावरून ती लक्षात ठेवली जातात”… मी.
भारत व इंग्लंड दरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका अखेरीस काल संपली व त्याविषयी दोघांच्या प्रतिक्रिया वर दिल्या आहेत. त्यापैकी एक अतिशय उत्तम समीक्षक तसेच स्वतः जेष्ठ खेळाडू होते, शास्त्री, व दुसरी व्यक्ती त्या मालिकेचा एक भाग होती व गेले पंचवीस दिवस मैदानावर व एकंदरीतच त्या वातावरणामध्ये जवळपास चाळीस दिवस तो होता, राहुल. त्यानंतर मी केवळ शेवटच्या कसोटी सामन्याविषयीच नव्हे तर एकंदरीतच ही मालिका ज्याप्रकारे लढली गेली त्याविषयी माझे शब्द मी आज माझे स्टेटस म्हणून लावले होते. ही मालिका इतकी अटीतटीची होती की ती खेळली गेली असे म्हणणे फारच सौम्य ठरेल, लढल्या गेली म्हणा! चौथ्या कसोटी मालिकेमध्ये ऋषभ पंतच्या उजव्या पावलाचे हाड मोडले होते व तो कसाबसा उभा राहू शकत होता तरीही त्याने फलंदाजी केली. पाचव्या कसोटी मालिकेच्या अंतिम दिवशी क्रिस वोक्सचा खांदा निखळला होता, प्रत्येक पावलागणिक त्याच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती तरीही अखेरच्या मिनिटाला त्याने खेळण्याचा निर्णय घेतला कारण त्याने फलंदाजी करणे त्याच्या संघाच्या मॅच मध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक होते. ही सगळी दृश्ये केवळ खेळाचा भाग नव्हती तर ती एक लढाई होती व तरीही त्यामध्ये खेळभावना सुद्धा होती. जेव्हा पंत ड्रेसिंग रूमधून बाहेर पडून लंगडत खेळपट्टीच्या दिशेने जाऊ लागला किंवा जेव्हा वोक्स नववा गडी बाद झाल्यानंतर जेव्हा मैदानावर बाहेर आला तेव्हा त्यांना प्रेक्षकांनी उभे राहू सलामी दिली. जेव्हा भारताने शेवटाचा कसोटी सामना जिंकला तेव्हा सिराजने वोक्सला मिठी मारली, हे सगळे क्षण आता इतिहास म्हणुन नोंदवले गेले असले तरीही प्रत्येक क्रीडाप्रेमीच्या, अगदी क्रिकेट न आवडणाऱ्यांच्या मनामध्येही दीर्घकाळ रेंगाळत राहतील, असा या मालिकेचा परिणाम होता!
तर हा लेख क्रिकेटविषयी आहे व माझ्यासाठी एकप्रकारचा विक्रमच आहे कारण पाच कसोटी सामन्यांपैकी चार वेळा मला त्याविषयी लिहीण्याची तीव्र इच्छा झाली आणि मी लिहिले! मी गेली चाळीस वर्षे क्रिकेट पाहतोय व मी कधीही सामान्यांची अशी मालिका अनुभवलेली नाही (कारण केवळ पाहिली किंवा ऐकली हे शब्द पुरेसे ठरणार नाहीत) व मी जे जुने विक्रम मोडीत काढून जे नवीन विक्रम रचण्यात आले त्याविषयी बोलत नाही तर खेळाच्या उच्च पातळीविषयी व प्रत्येक खेळाडूने पाचही कसोटी सामन्यांमध्ये जी बांधिलकी दाखवली त्याविषयी बोलतोय. तो एक खरेखरच अविस्मरणीय अनुभव होता. सुदैवाने, इंग्लंडमध्ये सामने खेळले जात होते, तेव्हा मी दिवसभराच्या खेळापैकी निम्मा भाग रात्री घरी परत आल्यानंतर बघू शकत होतो, जी माझ्यासाठी अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. कसोटी क्रिकेट हा प्रकार आता नामशेष होत चालला आहे लोक म्हणत असताना हे सर्व घडत होते. कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी सकाळी आमच्या बॅडमिंटनच्या खेळानंतर, माझा मित्र जो वैशालीचा व्यवस्थापक आहे तो माझ्याशी सामन्याचा निकाल काय लागण्याची शक्यता आहे याविषयी चर्चा करत होता व आपण जिंकू असे मी म्हटलो होतो. असे झाले तर मी वैशालीमध्ये फ्लोअरवर काम करणाऱ्या सर्व मुलांना (सफाई कर्मचारी, टेबल पुसणारे) दुपारचे जेवण देईन असे आश्वासन दिले होते. एक वेटर आमचे बोलणे ऐकत होता, तो म्हणाला, सरांना माहितीय की त्यांना पार्टी द्यावी लागणार नाही कारण आपण जिंकणारच नाही असे त्याला वाटत होते! भारतामध्ये, तीन गोष्टींविषयी कुणालाही त्याचे किंवा तिचे मत व्यक्त करण्याची परवानगी असते (व त्याचे स्वागत केले जाते) ते म्हणजे राजकारण, चित्रपट व क्रिक्रेट. आणि अशाप्रकारच्या मालिका केवळ क्रिकेटच नव्हे तर एकूणच खेळाच्या लोकप्रियतेत भर घालण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात, असे माझे वैयक्तिक मत आहे. या वेगवान युगामध्ये लोकांना एखाद्या गोष्टीमध्ये अल्पकाळ म्हणजे अगदी जेमतेम २० सेकंदांपर्यंत रस वाटतो (रिलचे वेड) अशावेळी लोकांना दिवसाला सात तास व पाच दिवस बसवून ठेवणे अति अवघड असतानाही हे शक्य होऊ शकते, हेच आपल्याला या कसोटी मालिकेने दाखवून दिले.
मी नमूद केल्याप्रमाणे या मालिकेमध्ये खेळ लढाईच्या पातळीवर नेताना अनेक जुने विक्रम मोडीत निघाले तसेच नवीनही विक्रम घडले. परंतु त्याहीपेक्षा अनेक तरुण खेळाडूंना स्वतःचा शोध घेण्यास मदत झाली व ही केवळ माझी निरीक्षणे नाहीत तर इंग्लंडच्या कप्तानाचे शब्द आहेत, ज्याने आपला संघ जिंकावा यासाठी शारीरिक मर्यादेपेक्षाही जास्त प्रयत्न केले व या प्रक्रियेमध्ये त्याला शेवटच्या कसोटी सामन्यासाठी बाहेर बसावे लागले इतके त्याचे शरीर त्रासले होते. मी या कसोटी मालिकेतून काय निष्कर्ष काढला हे सांगण्यापूर्वी आपण वैयक्तिक तसेच सांघिक नैपुण्याची पातळी, ज्या आधारावर ही मालिका खेळण्यात आली (म्हणजे लढली) ते जाणून घेतले पाहिजे व त्यातले काही निष्कर्ष मी देत आहे. मी जाणीवपूर्वक आकडेवारीला फारसे महत्त्व हेत नाही तर कामगिरीला देतोय, त्यामुळेच आकडेवारीमध्ये किंवा तथ्यांमध्ये काही चुका आढळल्या तर मला माफ करा…
दोन्ही संघांद्वारे एकत्रितपणे करण्यात आलेल्या एकूण धावांची संख्या ही क्रमवारीत दुसरी आहे.
दोन्ही संघांच्या फलंदाजांनी केलेली शतके तसेच पन्नास धावांची आकडेवारीही पदतालिकेत पहिल्या क्रमांकाची आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संघाद्वारे खेळल्या गेलेल्या चेंडूची संख्या कमाल आहे.
भारतीय संघासाठी जितक्या धावांच्या फरकाने सामना जिंकला तो दुसऱ्या कसोटीमध्ये विदेशात खेळलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक होता, तर शेवटच्या कसोटीमध्ये सर्वात कमी फरकाने सामना जिंकला.
अलिकडच्या काळामध्ये, ही पहिली अशी पाच कसोटी सामन्यांची मालिका होती ज्यामध्ये सर्व कसोटी सामने पाच दिवस चालले.
भारताने आत्तापर्यंत कधीही विदेशामध्ये पाच कसोटी सामान्यांच्या मालिकेतील शेवटाचा सामना जिंकला नव्हता.
पहिल्यांदाच भारतीय जलदगती गोलंदाजांनी कसोटी मालिकेमध्ये पाच वेळा पाच गडी बाद करण्याची दणदणीत कामगिरी करून दाखवली.
जे काही सांघिक विक्रम रचले गेले व मोडले त्यापैकी काही इथे दिले आहे व आपण इथे शंभराहून अधिक वर्षांच्या काळाविषयी बोलत आहोत. वैयक्तिक विक्रमांच्या बाबतीतही या मालिकेमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली व प्रत्येक सांघिक सदस्याने स्वतःची शारीरिक व मानसिक मर्यादा ताणून प्रयत्न केले व त्यामुळेच वैयक्तिक कामगिरीच्या बाबतीतही असामान्य कामगिरी होणे अपेक्षितच होते...
शुभमन गिलने फलंदाज म्हणून जी कामगिरी केली आहे त्यामुळे त्याने एकाच मालिकेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा कप्तान होऊन आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. या प्रक्रियेमध्ये त्याने सुनिल गावस्कर, विराट कोहली व सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षाही वरचढ कामगिरी केली आहे व हे सगळे भारतीय क्रिकेटसाठी दैवतच मानले जातात! त्याचवेळी त्याने सर डॉन ब्रॅडमन, सर गॅरी सोबर्स यांच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे, ते देखील वयाच्या पंचवीसाव्या वर्षी!
जडेजा सहाव्या क्रमांकावर खेळून इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध एकूण पाचशे धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.
जवळपास पाच फलंदाजांनी विदेशात खेळल्या गेलेल्या एकाच मालिकेमध्ये त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली.
मोहम्मद सिराज इंग्लंडमध्ये एकाच मालिकेमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला, त्याने या स्थानावर बुमराची बरोबरी केली. या मालिकेनंतर, अनेक भारतीय खेळाडूंनी आसीसीच्या क्रमवारीमध्ये वैयक्तिक वर्गवाऱ्यांमध्ये त्यांची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही, तुम्ही जेव्हा जीव तोडून खेळता तेव्हा अशीच कामगिरी घडते. असो, तुम्हाला या लेखामध्ये नमूद केलेल्या सर्व खेळाडूंची नावे, ठिकाणे याविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा अधिक तपशील जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही गूगल करू शकता.
याव्यतिरिक्तही अनेक विक्रम रचण्यात आले आहे, अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडल्या आहेत, परंतु मी त्याविषयी बोलणार नाही, कारण हा लेख विक्रमांविषयी नाही तर भारतीय संघाने जो दृष्टिकोन दाखवला त्याविषयी आहे. मी जाणीवपूर्वक भारतीय संघाचा दृष्टिकोन व चारित्र्याविषयी बोलतोय. याचे कारण, एक म्हणजे, आपण अशा एका देशाच्या दौऱ्यावर होतो जेथे आपल्या अगदी मोठ्या खेळाडूंच्याही कामगिरीचा इतिहास आपल्याविरुद्ध होता, दुसरे म्हणजे, हा संघ अतिशय तरुण होता, व तिसरे म्हणजे प्रतिस्पर्धी संघ प्रत्येकच आघाडीवर केवळ अनुभवीच नव्हता तर त्यांची शैलीही बॅझ-बॉलसारखी (कृपया गूगल करा) अधिक आक्रमक होती. भारतीय संघाला आपण अशा प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळण्यासाठी लायक आहोत हे सिद्ध करायचे होते व सर्वात शेवटचा व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच प्रत्येकानेच या भारतीय संघाला कमी लेखले होते. या पार्श्वभूमीवर जेव्हा मालिका २-२ व एक सामना अनिर्णित अशी बरोबरीत सुटते, तेव्हा मला असे सांगावेसे वाटते की आकडेवारीतून झालेली लढाई व तिची तीव्रता यांचे कधीच समर्थन होऊ शकत नाही, ज्याचे प्रदर्शन भारतीय संघाने दाखवले. जर थोडी अधिक परिपक्वता व अनुभव असता कर ही गुणसंख्या ३-१ व एक सामना अनिर्णित अशी किंवा अगदी ४-० व एक सामना अनिर्णित अशी भारतीय संघाला अनुकूलही झाली असती. याआधी अनेकजणांनी हे विधान हसण्यावारी नेले असते, परंतु आता मालिका संपल्यानंतर भारतीय संघाचे बहुतेक टीकाकारही माझ्या मताशी सहमत असतील याची मला खात्री आहे व हीच आपल्या संघाची सर्वात मोठी कामगिरी आहे. शेवटच्या सामन्यानंतर केवळ क्रीडाजगतच नव्हे तर सर्व माध्यमांमध्येच एकाच शब्दाची चलती आहे, “बिलीव्ह” म्हणजेच विश्वास ठेवा (जो आता मोहम्मद सिराजचा ट्रेडमार्क झाला आहे) व हेच भारतीय संघाने केले. श्रद्धा आणि सबुरी या फॉर्म्युल्यावर जगणाऱ्या देशातील समस्त वैतागलेल्या आम जनतेसाठी ही सर्वोत्तम प्रेरणा ठरू शकते, ज्यांना “इथे काहीच बदलणार नाही असे वाटते” अगदी अशा टीकाकारांना सुद्धा. “आशेपासून” ते “विश्वासा”पर्यंतचा हा दृष्टिकोनातील बदल हेच भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे सर्वात मोठे व सर्वोत्तम फलित आहे. हे केवळ खेळाडूंसाठी नव्हे तर खेळाशी संबंधित प्रत्येकासाठी आहे. ज्यांना क्रिकेट हा खेळ अजिबात आवडत नाही तेदेखील त्याची क्षणचित्रे पाहतात (जिओ ह़ॉटस्टारचे आभार), कारण आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आपल्या सर्वात कठीण कसोटीला तोंड द्यावे लागते, खुप जणांसाठी तो कमनशीबीपणा असतो तर काहीजणांसाठी आपली क्षमता सिद्ध करण्याची ती संधी असते व ते काही जणच शेवटी विजेते ठरतात. या तरुण भारतीय संघाकडे खरेतर गमावण्यासारखे काहीच नाही, जेव्हा ते संघ म्हणून खेळण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचा दारूण पराभव झाला असता तरीही त्यांना कुणी दोष दिला नसता. सगळ्यांची केवळ एवढीच अपेक्षा होती की ते थोडीफार लढत देतील. परंतु हा संघ केवळ आशेवर अवलंबून नव्हता, त्याऐवजी त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला व कुणीही ज्याची अपेक्षा केली नव्हती अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली, मालिका बरोबरीत सोडवणे ही खरेतर विजयापेक्षाही मोठी कामगिरी आहे!! केएल राहुलने म्हटल्याप्रमाणे, अशाप्रकारच्या लढाया तुमच्याकडून बरेच काही हिरावून घेतात परंतु तुम्हाला तुमची ओळख व चारित्र्य परत देतात व त्यातूनच तुमचे भवितव्य कायमस्वरूपी ठरणार असते. मला इतरांचे माहिती नाही, तरीही माझ्या वयातही म्हणजे पन्नाशी उलटून गेल्यावरही मी या कसोटी मालिकेतून बरेच काही शिकलो, ते अर्थातच क्रिकेट कसे खेळावे हे नव्हते तर त्यापेक्षा बरेच काही अधिक होते. ते म्हणजे सर्वात अवघड आव्हानांना कसे तोंड द्यायचे. तरुण भारतीय संघाने मला माझ्या लढाया लढताना “विश्वास ठेवणे“ या शब्दाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजून सांगितल्याबद्दल त्यांचे आभार, निश्चितपणे तुमची कामगिरी यापुढेही अशीच होत राहील; लढत राहा व प्रत्येक लढ्यासोबत मोठे होत राहा, एवढे बोलून निरोप घेतो!
(वैयक्तिकपणे सांगायचे तर, माझ्यासाठी सर्वात समाधानकारक बाब होती ती म्हणजे, ‘कृष्णा व मोहम्मद’ या दोन खेळाडूंचा एकत्र गोलंदाजी करतांना पाहणे, जे भारतीय संघ या लढ्यात जिंकावा यासाठी जीव तोडून खेळत होते, खांद्याला खांदा लावून लढत होते, अनेकांनी भारतीय संघाला आधीच निकाली काढले असताना त्यांनी एकत्रितपणे हे करून दाखवले!! किमान आता तरी, आपल्या देशामध्ये जे धर्म व जातीवरून भांडत बसतात त्यांना विजयाचा खरा मार्ग कोणता आहे याची जाणीव यावरून झाली असेल अशी आशा करुयात!!
टीम संजीवनीचा टीम इंडियाला सॅल्युट ..!
संजय देशपांडे www.sanjeevanideve.com








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा