पोस्ट्स

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

इमेज
  नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड "कठीण काळ खंबीर माणसं घडवतो. खंबीर माणसं चांगला काळ आणतात. चांगला काळ दुर्बळ माणसं निर्माण करतो. आणि दुर्बळ माणसं पुन्हा कठीण काळ आणतात." ― जी. मायकेल हॉफ. "स्वतःवर प्रेम करणारे पुरुष धोकादायक ठरू शकतात; पण  पुरुषांवर प्रेम करणाऱ्या स्त्रिया त्याहूनही अधिक धोकादायक ठरू शकतात." ― नाओमी वोल्फ. "शॉर्टकट आणि सोपे रस्ते बऱ्याचदा आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात, हे आपल्याला माहीत असतं. तरीही आपल्यापैकी बहुतांश जण तोच रस्ता निवडतात; कारण बहुधा चुकीच्याच ठिकाणी पोहोचणं आपल्या नशिबात लिहिलेलं असतं म्हणून..." ― मी       नीट (NEET), टीईटी (TET) आणि लोहगड— मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेकांना यातील पहिल्या आणि शेवटच्या शब्दाबद्दल (म्हणजे नीट आणि लोहगडबद्दल) आतापर्यंत नक्कीच माहिती झाली असेल. पण यातला जो दुसरा शब्द आहे 'TET', तो या दोन्ही गोष्टींना जोडणारा एक दुवा आहे; आणि त्याबद्दल फारशा लोकांना माहीत नाही, कारण तो सगळ्यांच्याच उपयोगाचा विषय नाही! हे लेख लिहिताना सुरुवातीलाच अशी 'हिचकॉक' (Hitchcock - रहस्यमय क...

आग दुर्घटना आणि समाज!!

इमेज
आग दुर्घटना आणि समाज!! “प्राण्यांना अन्न, पाणी व निवारा लागतो. माणसांनाही या सगळ्या गोष्टी लागतात, परंतु त्याचसोबत आपल्याला विस्तव(आग) सुद्धा लागतो.” ― रिचर्ड डब्ल्यू राँगहॅम “तुम्ही जोपर्यंत आग नियंत्रणात ठेवू शकता तोपर्यंतच तुमची तिच्याशी मैत्री असते! तिच्यावर नियंत्रण नसेल, तर तुमच्यासमोर एक सशक्त शत्रू आहे!” ― मेहमत मूरत इल्दान "मला आगीविषयी एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे, आग निष्ठुर असते”… मी.        राँगहॅम यांनी इतर सर्व प्राणी व माणसांमधील फरक किती नेमक्या शब्दात मांडला आहे, आपण आपले आयुष्य अधिक सुखकर बनवण्यासाठी आगीचा वापर करतो तर इतर सर्व सजीव प्रजाती आगीपासून दूरच राहणेच पसंत करतात, ही गोष्ट आपल्या कधीही लक्षात येत नाही किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मेहमत, यांचे विद्वत्तापूर्ण शब्द म्हणजे जणू पॉवर प्लेमधील षटकेच असतात (कृपया गूगल करा), त्यातून त्यांनी आपल्या अज्ञानाबद्दल आपल्याला नेमक्या शब्दात इशारा दिला आहे. मी केवळ त्यांच्या ज्ञानातून काढलेला निष्कर्ष मांडला आहे, म्हणजे आग एकच गोष्ट जाणत, जवळ आलेली गोष्ट जाळून टाकणे! तुम्ही जर विचार करत असाल की ही ...

बांधवगड टु गुंजेवाही(ताडोबा); वाघ आणि मनुष्य !!

इमेज
बांधवगड  टु गुंजेवाही(ताडोबा); वाघ आणि मनुष्य !! “आपल्याकडे कोक विरुद्ध पेप्सी एवढीच जैवविविधता शिल्लक राहणार आहे” … चुक पलाहनिउक. “आपल्याकडे आता जैवविविधता वाचवण्याचे सर्वात स्वार्थी कारण आहे – ते म्हणजे आपले स्वतःचे कल्याण.” … डॅन सॅलॅडिनो “आम्हाला वाघ नको आहेत, तुम्हाला वाघ आवडत असतील तर आमच्या गावातून सगळे वाघ घेऊन जा व त्यांना तुमच्या शहरातच ठेवा” … ताडोबाजवळ 22 मे 26 रोजी एका वाघीणीने केलेल्या हल्ल्याविषयी इन्स्टाग्रामच्या पोस्टवर अशी टिप्पणी करण्यात आली होती. “वाघाला निसर्गाचा असा शाप आहे की, इतर सर्व प्रजाती एकतर त्याचे सावज असतात किंवा शत्रू” … मी.          माझ्या सर्वात आवडत्या जंगलांपैकी एक असलेल्या बांधवगढ अभयारण्याविषयीचा हा लेख मी आधी संजय दुबरी अभयारण्याविषयीच्या लेखासोबतच जोडणार होतो. परंतु तो लेख अतिशय मोठा (धुरंधर  सारखा) झाला व लोकांना एवढा मोठा लेख एकाचवेळी वाचायला लावणे म्हणजे मोठी शिक्षा ठरली असती. दुसरे म्हणजे मी जेव्हा माझ्या बांधवगढच्या दौऱ्याविषयी लिहायला सुरुवात केली तेव्हा वन्यजीवनातील दोन अतिशय दुःखद बातम्या आल्या. त्यातली...

माननीय पंतप्रधान, सार्वजनिक वाहतूक आणि जनता..!!

इमेज
माननीय पंतप्रधान, सार्वजनिक वाहतूक आणि जनता..!! पंतप्रधानांना खुले पत्र. “तुम्ही एखादे शहर तिथली सार्वजनिक वाहतूक यंत्रणा वापरल्याशिवाय समजून घेऊ शकत नाही.” ― इरोल ओझान “शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी चांगली वाहतूक यंत्रणा, तसेच चांगले रस्ते आवश्यक आहेत.” ― लैला गिफ्टी अकिता "शक्य असेल तिथे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करा. मेट्रोचा, इलेक्ट्रिक बसचा व सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा, कारचा सामूहिक वापर करण्यास चालना द्या." ... मा. नरेंद्र मोदीजी. "    खर म्हणजे  मला स्वतःला गाडी चालवायाला अजिबात आवडत नाही, मला ड्रायव्हर  ठेवणे परवडू शकते आणि आपल्या रस्त्यांवरून प्रवास करायला खूप जास्त वेळ लागत असला तरीही मला तो प्रवास आवडतो" … मी. माननीय पंतप्रधान सर,         माझ्या पत्राच्या सुरुवातीलाच (पत्राचा सूर ठरवण्यासाठी) पंतप्रधान वगळता इतर वाचकांसाठी काही प्रश्न विचारत आहे; तुम्हाला मे महिन्यामध्ये वर्तमान पत्र वाचताना (म्हणजे तुम्ही वाचत असाल तर) काही वेगळे लक्षात आले आहे का? या काळात आपल्या शाळांना अधिकृतपणे सुट्ट्या असतात व पर्यटन सर्वाधिक असण्...