योग्य कम्युनिकेशन, करिअर आणि रिअल इस्टेट..!!





































योग्य कम्युनिकेशन, करिअर आणि रिअल इस्टेट..!!



“तरुणाईला मार्गदर्शकांची गरज आहे, टीकाकारांची नव्हे.”… अमित कलंत्री


“तुम्ही ज्याप्रकारे विचार करता तसा विचार तरुणाई करेल अशी अपेक्षा करू नका! किंबहुना आपण या तरुण पिढीप्रमाणे विचार केला, तरच आपण त्यांच्यासोबत अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकू” ... जावेद अख्तर


“तरुण पिढीला प्रेरणा देणे हे तुमचे कर्तव्य आहे असा विचार करत जगणे थांबवा, ते तुमचे कर्तव्य नाही; तुम्हाला त्यांना खरोखरच प्रेरणा द्यायची असेल, तर तुम्ही सामान्यपणे जसे आहात तसे जगा, म्हणजे त्यांना प्रेरणा घ्यायचीच असेल तर ते त्यातून नक्कीच घेतील” ... मी


माझ्या लिंक्डइन खात्यावर मी टाकलेली पोस्ट …


"तरुण पिढीतील उमेदवारांचे वर्तन!"

मी अलिकडेच माझ्या लिंक्डइन पोस्टला प्रतिसाद देऊन माझ्या कंपनीमध्ये स्थापत्य अभियंत्याच्या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यातला दुर्दैवी भाग म्हणजे ज्याप्रकारे त्यांनी संपर्काला दिलेला प्रतिसाद दिला, म्हणजे ईमेलला उत्तर न देणे, कॉल न घेणे, कॉलला उत्तर न देणे व मुलाखतीसाठी ते वेळेत पोहोचू शकणार नाहीत हेदेखील न कळवणे. निवडण्यात आलेल्यांपैकी काही जणांनी, रुजू होण्यासाठी पत्र मागितले, परंतु त्यासंदर्भातील ईमेलला उत्तर दिले नाही, तसेच आमच्या ऑफिसच्या कॉलला उत्तर दिले नाही व ते दुसऱ्या एखाद्या ठिकाणी रुजू झाले आहेत असे त्रोटक ईमेल केले. तुमच्यावर कुणीही कुठल्याही कंपनीमध्ये रुजू होण्यासाठी सक्ती करू शकत नाही, हे मान्य आहे. परंतु तुम्ही ज्याप्रकारे संवाद साधता त्यातून तुमचा केवळ तुमच्या कामविषयीचाच नव्हे तर एकंदर जीवनाविषयाचा दृष्टिकोन दिसून येतो. याबाबतीत तरुण पिढी अतिशय अव्यावसायिक आहे असे म्हणावे लागेल. निश्चितच, अशा दृष्टिकोनामुळे ते स्वतःसाठी जे कोणते करिअर निवडतील त्यात त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, कारण त्याने अथवा तिने ज्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला आहे तिच्याशी नीट संवाद सुद्धा साधू शकत नसेल, तर अशा व्यक्तीकडून आपल्याला कशाप्रकारच्या कामाची अपेक्षा करता येईल? मी तर म्हणेन, की असे लोक आमच्या कंपनीमध्ये रुजू झाले नाहीत, हे एकप्रकारे बरेच झाले!!

-- संजय देशपांडे

smd156812@gmail.com

www.sanjeevanideve.com

#नोकऱ्या #दृष्टिकोन #व्यावसायिकता #करिअरमधील प्रगती

-

त्यानंतर मला माझ्या क्रेडाई महाराष्ट्राच्या (बांधकाम व्यावसायिकांची संघटना) सहकाऱ्याकडून विचारणा करण्यात आली की मला संघटनेच्या मासिकासाठी कोणत्याही विषयावर काही लिहीता येईल का, म्हणूनच हा लेख लिहीत आहे. मला खात्री आहे की अमित कलंत्री, जावेद अख्तर यांची अवतरणे, नोकरीविषयी लिंक्डइनवरील माझी पोस्ट व क्रेडाईच्या मासिकासाठी लेख लिहीणे यामध्ये काय संबंध आहे यात तुमचा जरा गोंधळ झाला असेल. मी तुम्हाला दोष देणार नाही, तर नेमके काय झाले त्याची गोष्ट तुम्हाला सांगतो. माझा गोष्टींवर विश्वास आहे कारण एखादी कथा नसेल तर आपल्याला कशातही असलेला रस अतिशय वेगाने नाहीसा होता. तुम्ही मनोरंजनाचे कोणतेही माध्यम घ्या, कादंबरी असो, चित्रपट किंवा वेब मालिका, त्यातील सर्वात शक्तिशाली भाग असतो कथा, याचे श्रेय जाते सलिम-जावेद यांना! मला खात्री आहे की वाचकांच्या मनात आता आणखी गोंधळ निर्माण झाला असेल, तोच तर गोष्टीचा खरा उद्देश आहे तुम्हाला गुंतवून ठेवणे व तुमची उत्कंठा वाढणे, lol, फक्त गंमत करतो! असो, तर आता आणखी टी.पी. नको, टी.पी. म्हणजे टाईम पास अथवा वेळेचा अपव्यय, टाउन प्लॅनिंग किंवा नगर नियोजन नव्हे, जे असेही आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात नाही (टोकाचा उपहास)! या सगळ्या गोष्टीतील समान धागा म्हणजे जेव्हा तुम्ही राज्याच्या रिअल इस्टेटविषयी लिहीता तेव्हा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राविषयी विचार करावा लागतो (म्हणजे पॅन इंडिया, पॅन आशियातील सिनेमासारखे). याचा अर्थ असा होतो की विषय सगळ्यांना आपलासा वाटणारा किंवा संपूर्ण राज्यातील रिअल इस्टेटच्या पैलूंचा समावेश करणारा असला पाहिजे, केवळ एखाद्या प्रदेशातील काही शहरांमधील नसावा. म्हणूनच मला रिअल इस्टेटच्या (खरेतर सर्व व्यवसायांच्या) एका अशा पैलूविषयी बोलावेसे वाटले, तो म्हणजे, तरुण पिढीचा दृष्टिकोन जे रिअल इस्टेटमध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक आहेत व ती एक मोठी समस्या आहे. अगदी अलिकडे पूर्वीपर्यंत लोक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांमध्ये नोकरीसाठी रांग लावायचे (माझा अनुभव) कारण रिअल इस्टेटमध्ये सर्वप्रकारच्या उमेदवारांना सहजपणे सामावून घेतले जाते असा एक सर्वसाधारण समज होता, किंबहुना उमेदवार जेवढा बुद्धीने सामान्य असेल तेवढे अधिक चांगले व त्यात त्यांचे काही चूक नव्हते. असे एक उत्पादन, जेथे मागणी पुरवठ्यापेक्षा नेहमी मोठी होती, त्यामुळेच मालकांना (म्हणजेच बांधकाम व्यावसायिक) तसेच कर्मचाऱ्यांना नैपुण्य, सेवा, सुधारणा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवाद यासारख्या गोष्टींमध्ये फारसा रस नव्हता. परंतु, काळ बदलला, जे एक ना एक दिवस होणारच होते, (मला अग्निपथमधला माझा सर्वात आवडता संवाद आठवला, “हवा तेज चलता है दिनकर राव, टोपी संभालो, उड़ जाएगा", कृपया गूगल करा). यूडीसीपीआरमुळे (कृपया गूगल करा) अचानक मोठ्या प्रमाणात एफएसआय म्हणजे बांधकामयोग्य क्षेत्र राज्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आता मागणी व पुरवठा यामध्ये पूर्वीसारखी तफावत उरलेली नाही. किंबहुना बऱ्याच ठिकाणी आता उलट परिस्थिती झाली आहे, मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला आहे. रिअल इस्टेटमध्ये नेमके इथेच करिअर तसेच उमेदवारांच्या वर्तनाची भूमिका महत्त्वाची झाली आहे, हाच माझ्या लेखाचा विषय आहे. 

अजूनही, बऱ्याच बांधकाम व्यावसायिकांना योग्य उमेदवारांचे महत्त्व पटलेले नाही किंवा त्यांनी ते स्वीकारलेले नाही. कारण आत्तापर्यंत त्यांच्या व्यवसायाची एवढी खडतर परीक्षा कधीच झालेली नाही. तरीही रेरा तसेच डिजिटल समाजमाध्यमे अतिशय सशक्त असल्यामुळे योग्यप्रकारे संवाद साधणे हा सर्वात मोलाचा घटक झाला आहे व दीर्घकाळ असाच राहील ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी पहिला बदल नोकरी देणाऱ्यांनी केला पाहिजे कारण त्यानंतरच टीम त्याचे पालन करेल. त्याचवेळी तुम्हाला बाजारातील अतिशय कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची इच्छा असेल जेथे मागणी व पुरवठा संतुलित आहेत, स्पर्धा अतिशय तीव्र आहे, ग्राहक जागरुक असतात व कायदे कडक होत आहे, अशा वेळी तुम्ही बोललेले किंवा लिहीलेले प्रत्येक वाक्य त्याच्या वेळेसह महत्त्वाचे ठरते, मग तुम्ही तुमचे उत्पादन विकत असाल किंवा ताबा देत असाल. म्हणूनच रिअल इस्टेटमध्ये, तुम्ही कुठल्याही शहरात काम करत असला तरीही योग्य संवाद हे तुमचे सर्वोत्तम साधन ठरते. परंतु अडचण अशी आहे की योग्य संवाद शिकवायचा कसा कारण कोणत्याही शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये तुम्हाला पत्राला वेळेत उत्तर द्यायला किंवा वेळेवर पोहोचायला शिकवले जात नाही. ते तुम्हाला भाषा शिकवतात व पत्रव्यवहार कसा करायचा हे शिकवतात, परंतु तो प्रतिसाद देण्यासाठी लागणारा वेळही महत्त्वाचा आहे, हे शिकवायला सगळेजण विसरून गेले आहेत. परिणामी, तरुण पिढी (मी केवळ माझा वैयक्तिक अनुभव देत आहे व मी चांगल्याप्रकारे संवाद साधतो असे मला वाटते) कोणत्याही कंपनीमध्ये रुजू झाल्यापासून त्यांच्या सोयीनुसार संवाद साधता येतो हे गृहित धरते, व ही पिढी त्यांच्या घरीही तसेच वागते यात काहीच आश्चर्य नाही. ही तरुण पिढी केवळ त्यांच्या मित्रांशी अगदी तत्परतेने संवाद साधत असतात . याचाच अर्थ असा होतो की जेन झीमध्ये (किंवा जे काय म्हणाल) योग्यप्रकारे संवाद साधण्याच्या क्षमतेचा अभाव आहे असे नाही तर त्यांना त्यासाठी योग्य कारण आहे असे वाटते तेव्हाच ते योग्यप्रकारे संवाद साधतात, ही माझ्यासाठी रुपेरी किनार आहे. यासाठीच आधी रिअल इस्टेटमधील ज्येष्ठांनी योग्य संवादाचे महत्त्व स्वतः समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण त्यानंतरच आपण या व्यवस्थेतील किंवा संघटनेतील तरुणांना त्याच्या महत्त्वाची जाणीव करून देऊ शकतो.

मला सांगायला वाईट वाटते की संवादाच्या बाबतीत रिअल इस्टेट हा संपूर्ण उद्योग क्षेत्रातील सर्वात अव्यावसायिक उद्योग आहे. तुम्हाला असे वाटत असेल की मी एखाद्या टीकाकारांची वा जागल्याची (व्हिसल ब्लोअर) भूमिका पार पाडतोय, तर तुम्ही रिअल इस्टेटच्या संपर्कात आलेल्या आणि अधिकारी पदावर नसलेल्या कुणाही व्यक्तीला विचारू शकता. म्हणजे रिअल इस्टेटममधील व्यक्ती (म्हणजे बांधकाम व्यावसायिक) जेव्हा एखादी गोष्ट त्यांच्या हिताची असेल तेव्हा त्याबाबतीत कम्युनिकेशनसाठी अतिशय तत्पर असतात, उदाहरणार्थ एखादा वरिष्ठ नोकरशहा बांधकाम व्यावसायिकाला कॉल करत असेल, किंवा एखादा बँकर किंवा गुंतवणुकीसाठी चौकशी करणारा ग्राहक असेल तर अशा सर्व उदाहरणांमध्ये रिअल इस्टेटमधील बॉस लोकं कोणत्याहीप्रकारे संपर्क करण्यात आल्यास क्षणार्धात उत्तर देतात. परंतु, जर तुम्ही सप्लायर वा ठेकेदार असाल व बिलाच्या पाठपुरावा करत असाल किंवा एखादे ग्राहक असाल ज्याची एखाद्या सेवेविषयी तक्रार असेल किंवा तुम्ही एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी असाल व काही प्रायोजकत्वाची तुमची अपेक्षा असेल, व अशाच प्रकारची इतरही काही उदाहरणे असतील तर बांधकाम व्यावसायिकांसाठी तुमचे अस्तित्व नसतेच म्हणजे कधीही रिटर्न कॉलअपेक्षित धरू नका! जर माझ्या बांधकाम व्यावसायिकांना हे विधान अतिशय कटू वाटले, तर, “तुम्ही जे आहात त्याविषयीची वस्तुस्थिती तुम्ही स्वीकारली, तरच तुम्हाला सुधारणेची काही आशा आहे” एवढेच मी म्हणू शकतो. त्यानंतर ज्यांना करिअर घडवायचे आहे त्यांना रिअल इस्टेट क्षेत्र कधीच विशेष प्रिय नव्हते. यासंदर्भातसुद्धा महाविद्यालयांमधून बाहेर पडणाऱ्या तरुण मुलांशी बोला व त्यांच्यापैकी किती जणांना रिअल इस्टेटमध्ये करिअर करायचे आहे किंवा रिअल इस्टेट कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा आहे असे विचारा, म्हणजे तुमचे एका झटक्यात शंकानिरसन होईल. मला असे म्हणायचे नाही की रिअल इस्टेटमध्ये व्यावसायिकपणे काम करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या नाहीत, मी महानगरांमधील मध्यम व लहान आकाराच्या रिअल इस्टेट कंपन्यांबद्दल बोलतो आहे, तसेच महानगराव्यतिरिक्त विशेषतः जिल्हा किंवा लहान शहरांमधील कंपन्यांविषयी बोलतो आहे. या कंपन्यांना जाणवणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे योग्य मनुष्यबळाची, कारण रिअल इस्टेटमधील अव्यावसायिक दृष्टिकोनामुळे फारश्या तरुणांना रिअल इस्टेटमध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात करायची नसते व त्यानंतर आपल्याला जे काही मिळाले आहे त्यावर समाधान मानावे लागते. त्याचशिवाय आपण स्वतः कधीही संवाद सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही व परिणामी अशा कंपन्यांमध्ये जे तरुण रुजू होतात तेदेखील संवादाच्या चुकीच्या स्वरूपाचेच पालन करतात. ते वरिष्ठ झाल्यानंतर कालांतराने त्यांना तीच सवय होते, याच दुष्टचक्रामध्ये रिअल इस्टट कंपन्यांचे कर्मचारी व मालक अडकले आहेत. याच कारणामुळे, रिअल इस्टेटला जाणावणारी सर्वात मोठ समस्या म्हणजे योग्य संवाद साधणारे कर्मचारी न मिळणे! त्यानंतर क्रमांक येतो तो कामाच्या ठिकाणी योग्य संवादाचा, हाच माझ्या लेखाचा विषय आहे.

प्रशिक्षणाची सुरुवात आपल्या स्वतःपासून होते, हे रिअल इस्टेटमध्ये तीन दशके घालवल्यानंतर मी शिकलो आहे, माझ्या पिढीने असा एक कालखंड पाहिला आहे ज्यामध्ये आम्ही सेलफोन किंवा वॉट्सॲप तर सोडाच पण इंटरनेटशिवाय काम केले आहे. म्हणूनच आम्ही योग्य संवादाचे महत्त्व जाणतो कारण वेळ वाचवण्याचे ते एकमेव साधन आहे, व पूर्वीही वेळ म्हणजेच पैसा होता व आत्ताही आहेच. आपल्याकडे आज संवादाची शक्य ती सर्व माध्यमे आपल्या हाताच्या बोटांवर उपलब्ध आहेत (शब्दशः) परंतु आपल्याकडे ती शक्ती योग्यप्रकारे वापरण्याचा दृष्टिकोन नाही. आजकाल तर तुम्हाला टाईप करायचीही गरज नाही, तुम्ही बोलता व तुमचा सेल फोन टाईप करतो, तुम्ही एखाद्या विषयाचा उल्लेख करता व एआय तुमच्यासाठी पत्र/संदेश लिहीतो. असे असूनही तुम्ही योग्य वेळेत संवाद साधत नाही, ही समस्या आहे! मी वॉट्सॲप वापरताना काही साध्या मूलभूत गोष्टींचे पालन करतो जे आज संवादाचे सर्वात वेगवान व खात्रीशीर माध्यम आहे, ज्याचे एकट्या भारतामध्ये जवळपास 85 कोटी वापरकर्ते आहेत, उदाहणार्थ मेसेज वाचल्याचे बरोबरची खूण असलेले निळे चिन्ह नेहमी दाखवले जाईल व माझे शेवटचे पाहिलेले (लास्ट सीन) हे दोन्ही सेटिंग नेहमी ऑन असतात. यामुळे माझ्या स्टाफला किंवा माझ्याशी संवाद साधणाऱ्या कुणालाही मी त्याचा किंवा तिचा संदेश वाचला आहे किंवा नाही हे माहिती असते. त्यामुळे एकदा संदेश वाचल्यानंतर त्याला प्रतिसाद देणे माझ्यावर बंधनकारक असते, कारण आता समोरच्या व्यक्तीला माहिती असते की मला तो संदेश मिळाला आहे. त्याचप्रमाणे वॉट्सॲवरील लास्ट सिन (शेवटचे पाहिलेले) सेटिंगमुळे समोरच्या व्यक्तीला मी या ॲपवर शेवटचा कधी सक्रिय होतो ते कळते, यामुळेही माझ्यावर प्रतिसाद देण्याचे बंधन असते. दुर्दैवाने, रिअल इस्टेटमधील वरिष्ठांनाच या दोन गोष्टी इतरांपासून लपवायला आवडतात, ज्या तुम्ही योग्यप्रकारे संवाद साधत आहात किंवा नाही याचा निर्णय घेण्यासाठी साधन असल्यासारख्या आहेत. मित्रांनो तुम्ही व्यावसायिक माणसे आहात, तुम्ही एखादा कलाकार किंवा नोकरशाहा नाही ज्याला व्यवसायापेक्षाही वैयक्तिक जीवनाला प्राधान्य देण्याची चैन परवडू शकते, अर्थात ही माझी वैयक्तिक विचारप्रक्रिया झाली, तुमचा विचार वेगळा असू शकतो, हा तुमचा निर्णय आहे. त्यानंतर मुद्दा येतो जे ग्रूप केवळ केवळ कामासाठी तयार करण्यात आले आहेत त्यातील संवादाचा व त्यासाठीच्या शिस्तीचे पालन करण्याचा. यामध्ये कामाविषयी सर्वकाही घडामोडी त्या ग्रुप मध्ये कळण्याची सवय सर्वोत्तम, म्हणजे सगळ्यांना त्याविषयी माहिती मिळते व त्यामुळे तुम्ही जबाबदार झाला नाही तरी किमान उत्तरदायी तरी होता. त्यासाठी साहेबांनी स्वतः या ग्रूपद्वारेच संवाद साधण्याच्या व वेळेत प्रतिसाद देण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

त्यानंतर मुद्दा येतो ईमेलला प्रतिसाद देण्याचा, जो परत रिअल इस्टेटच्या कामकाजातील एक मोठा “कच्चा दुवा” आहे, कारण इथे तुम्ही कुणालातरी ईमेल करता व त्यानंतर त्याला कॉल करता तसेच वॉट्सॲपवर कळवता की तुम्ही त्यांना ईमेल केले आहे, कृपया ती वाचा, मी काम करण्याची हीच पद्धत स्वीकारली आहे. त्यामुळेच माझ्या कार्यालयाने विविध पदांसाठी ज्या उमेदवारांची नावे काढली होती, त्यातील काही अपवाद वगळता कुणीच अशाप्रकारे संवाद साधू शकले नाही. ज्या पाच उमेदवारांना मुलाखतीची वेळ देण्यात आली होती, त्यापैकी तीन जण आलेच नाहीत व नंतर त्यांनी माझ्या संघाला संदेश पाठवला की ते कुठल्यातरी कामात व्यग्र असल्यामुळे येऊ शकले नाहीत. हेदेखील माझ्या कार्यालयाने त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केल्यानंतर व मुलाखतीची वेळ टळून गेल्यानंतर करण्यात आले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वेळीच उपलब्ध नसण्यासाठी त्यांनी दिलेल्या कारणांविषयी पूर्णपणे आदर राखून असे सांगावेसे वाटते की जेव्हा मी माझ्या कर्मचाऱ्यांना त्यांना ईमेल पाठवण्यास सांगितले की स्वतःच्या करिअरसंदर्भात संवाद साधण्याविषयी इतका निष्काळजी दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींची नावे आता मुलाखतीसाठी निचारात घेता येणार नाहीत कारण काम करताना ती विश्वसनीय कशी असू शकतील हा माझ्या त्यामागचा तर्क होता. यावर माझा कर्मचारी मला म्हणाला, “सर, तुम्ही असा दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला कुणीही उमेदवार मिळणार नाही, आपण त्यांना दुसरी संधी देऊ”! मी यावर पुन्हा विचार केल्यानंतर, मला या (किंवा अशा सर्व) उमेदवारांना दोष देता येणार नाही असे वाटले, कारण मला थोडेफार का होईना परंतु सुदैवाने योग्य मित्र व व्यक्ती मिळाल्या ज्यांनी मला योग्य संवादाचे महत्त्व शिकवले. कदाचित या सगळ्या तरुणांना अजूनही असे कुणी मिळाले नसावे, त्यामुळे त्यांना एक संधी देऊ! कारण, जेव्हा मी दोन दशकांपूर्वी अमेरिकेला भेट दिली, तेव्हाच मला पाश्चिमात्य लोक किती काळजीपूर्वकपणे (म्हणजे अत्यंत काटेकोरपणे) संवाद साधतात हे समजले, व तेव्हापासून मी या सवयी अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतोय. उदाहरणार्थb यूएसए मध्ये एखाद्या ईमेलला जर चोवीस तासात उत्तर दिले नाही तर तो ग्राहक किंवा विक्रेता, अथवा तो किंवा ती जो कुणी असेल (याला अपवाद केवळ तुम्ही अमेरिकी अध्यक्ष असाल) त्याचा विसर पडतो, हा संवादाचा साधा, सरळ नियम आहे. मला असे वाटते हा एकमेव नियम पळायचा  ठरविला तर निम्म्याहून अधिक रिअल-इस्टेट उद्योग व्यवसायाच्या बाहेर होईल, नाही का?

खरे सांगायचे तर आता रिअल इस्टेटने आपल्या कर्मचाऱ्यांना तसेच मालकांना योग्य संवादाच्या महत्त्वाविषयी जणीव करून देणे व त्यांना प्रशिक्षण देणेही आवश्यक आहे. इथे क्रेडाई म्हणून आपण पुढाकार घेऊ शकतो, कारण आपण कामातील संवादाच्या घटकाविषयी ऑनलाईन सत्रे सुरू करू शकतो व आपल्याकडे काही अत्यंत चांगले नेतृत्व आहे जे कितीही व्यग्र असले तरीही अतिशय तत्परतेने संवाद साधतात. श्री. सतीश मगर व श्री. शांतीलालजी कटारीया ही त्यापैकी अशीच दोन नावे आहेत ज्यांना मी व्यक्तिशः ओळखतो. जर ते योग्य  संवाद साध्य करू शकतात तर मग आपण अधिक चांगल्याप्रकारे संवाद का साधू शकत नाही असा प्रश्न मला संपूर्ण समुदायाला विचारायचा आहे. लोकहो, काळ बदलतोय, आयपीएलची (कृपया गूगल करा) ताजी आवृत्ती कशाप्रकारे खेळली जातेय ते पाहा, आत्तापर्यंतच्या अठरा चषकांपैकी पंधरा चषक ज्या तीन संघांना मिळाले आहेत ते कामगिरीच्या फलकावर तळाशी आहेत, ज्यात सर्वात काही अतिशय ज्येष्ठ खेळाडूंची नावे आहेत. आणि जे संघ अगदी अलिकडेपर्यंत कुणीच नव्हते, ते अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत व त्यामध्ये कुणीही मोठे खेळाडू नाहीत. म्हणजे सगळ्यात  शेवटी संघ व तुम्ही त्यांना कसे प्रशिक्षित करता हेच सर्वात महत्त्वाचे असते व रिअल इस्टेटही काम करण्याच्या या साध्या नियमाला अपवाद नाही; हे लक्षात ठेवा व योग्य संवाद साधण्याच्या बाबतीत स्वतःमध्ये सुधारणा करून सुरूवात करा असे मी म्हणेन, एवढे सांगून निरोप घेतो!


संजय देशपांडे smd156812@gmail.com 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!