स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??































स्वच्छ पुणे,  सुंदर पुणे;  प्रदूषण मुक्त पुणे??


“वायू प्रदूषणाच्या अपायकारक परिणामांपासून स्वतःला वाचवण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतात हे इतर लोकांनी आपल्याला सांगावे असे आपल्याला वाटत असते” …अरविंद केजरीवाल.


“तुम्ही आधी स्वतःला ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, हिंदू किंवा इतर कौणत्याही धर्माचे म्हणवण्याआधी, माणूस म्हणून जगायला शिका, कारण त्यानंतरच तुम्ही निसर्गाचे रक्षण करू शकाल.” … शेनॉन एल. अल्डर.


“वायू प्रदूषण हा एका साथीच्या रोगासारखा आहे ज्यामध्ये संपूर्ण समाज एक रुग्ण होतो” … मी.


या अवतरणातून लेखाचा विषय काय आहे हे पुरेसे स्पष्ट होते व जेव्हा विषय वायू प्रदूषण असतो तेव्हा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, श्री. केजरीवाल असोत किंवा प्रोत्साहनपर लेखन करणारे अमेरिकी लेखक, मानस उपचारतज्ज्ञ श्री. अल्डर असोत किंवा माझ्यासारखा एखादा लहान बांधकाम व्यावसायिक अथवा अभियंता असतो. प्रदूषण अथवा त्याच्या परिणामातून (म्हणजे वाईट) कुणीच वाचत नाही हा माझ्या लेखाचा विषय आहे. गेल्यावर्षीच मी या विषयावर माझे काही विचार मांडले होते व त्यावेळी त्याचे कारण होते आपल्या स्थानिक प्रशासकीय संस्थेद्वारे म्हणजेच पुणे महानगरपालिकेद्वारे वाढत्या वायू प्रदूषणाविरुद्ध स्थापित करण्यात आलेली समिती अथवा मंच (कृपया गूगल करा). या आठवड्यामध्ये यासंदर्भात एक पाऊल पुढे टाकत, पुणे महानगरपालिकेने आत्तापर्यंत उचललेल्या पावलांचा परिणाम व आणखी काय करता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी एका परिसंवादाचे आयोजन केले होते. क्रेडाई पुणे यांचा (कृपया गूगल करा) प्रतिनिधी म्हणून, मला या मंचावर माझे विचार मांडण्याची संधी देण्यात आली, येथे शहरातील बरीच नामवंत मंडळी उपस्थित होती. मी त्याविषयी नंतर सांगेन, परंतु आधी परिसंवादाविषयी थोडक्यात सांगतो.

अशा परिसंवादाचा केवळ उल्लेख जरी केला तरी अनेक लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात, व “काही फऱक नाही पडणार”, “कशाला वेळ घालवतोयस आपला” आणि खरे सांगायचे तर या टिप्पणी मी शब्दात मांडू शकेन पण त्यामागचा हताशपणा व निराशा मला व्यक्त करता येणार नाही, त्यामुळे असो. मी अशा लोकांना दोष देत नाही कारण दुर्दैवाने संपूर्ण समाजाचा आपण ज्यांना सरकार म्हणतो त्या यंत्रणेविषयीचा विश्वास किंवा भरवसा हरवत चालला आहे, परंतु तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. माझे वैयक्तिक मत असे आहे की जर सगळ्यांनीच सगळ्याच आघाड्यांवर प्रयत्न सोडून दिले तर प्रलयाचा दिवस फार लांब नाही. प्रदूषण, त्यातही वायूप्रदूषणाचा त्रास आपल्या सगळ्यांच होतो व आपण त्याविरुद्ध लढा दिला नाही किंवा ही लढा जे लढत आहेत त्यांच्याशी हातमिळवणी केली नाही, तर आपल्याला सुसंस्कृत म्हणवून घेण्याचा काहीही हक्क नाही. दुसरे म्हणजे, आपली पुढची पिढी (जर ती अस्तित्वात आली तर) आपण त्यांच्यासाठी हे केले नाही त्यासाठी आपल्याला माफ करणार नाही. असो, तर मला माहितीय की मी भावनिक डोस पाजतोय पण वायूप्रदूषणाविरुद्धचे युद्ध नुकतेच सुरू झाले असताना कपाळाला आठ्या पाडणाऱ्या, निराशाजनक टिप्पणी करणाऱ्या लोकांना गदागदा हलवणे आवश्यक आहे. डब्यूआरआर (वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट) हे परिसंवादाचे सहआयोजक होते, ही संस्था हवामान किंवा हवेच्या दर्जाचा अभ्यास करते व पुणे महानगरपालिकेला याविषयी मदत करते. त्यांच्या सादरीकरणात त्यांनी शहरातील परिस्थितीचा, शहरातील हवेचा दर्जा खालावण्याच्या कारणांचा व त्यासाठीच्या जबाबदार असलेल्या घटकांचा व त्यासाठी जी पावले उचलली जात आहेत त्यांचा आढावा घेतला. त्या सादरीकरणातून जो निष्कर्ष काढण्यात आला होता, त्यामुळे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, ज्यामध्ये शहरामध्ये सुरू असलेले बांधकाम व वाहनांमधून बाहेर पडणारा धूर हे एकत्रितपणे सत्तर टक्क्यांहून अधिक प्रदूषित कण हवेत पसरण्यासाठी जबाबदार असतात, ज्यामुळे हवेचा दर्जा खालावतो. त्यातही बांधकाम (केवळ रिअल इस्टेट नव्हे) हवेत पसरणाऱ्या प्रदूषित कणांसाठी किंवा धुलीकणांसाठी जबाबदार आहे असे सगळ्यांचे म्हणणे होते. खरे सांगायचे झाले, तर मी या आकडेवारीवर जात नाही, कारण एका मोठ्या शहरामध्ये हवेच्या दर्जासाठी अनेक घटक जबाबदार असतात व त्यसाठी एखाद्याच उद्योग, संघटना किंवा संस्थेला जबाबदार धरणे अवघड असते. मी तुम्हाला आकडेवारी व ती किती धोकादायक आहे हे सांगत बसणार नाही, कारण वर्तमानपत्रे हे काम अगदी चोख करत आहेत (उपहास)!

म्हणूनच, डब्ल्यूआरआरच्या सादरीकरणामध्ये वर्तमानपत्रातील अलिकडच्या मथळ्यांची स्कॅन केलेली छायाचित्रे होती, की पुण्यामध्ये वायूप्रदूषण कसे वाढले आहे (बांधकामांमुळे). त्यामध्ये बांधकामाच्या ठिकाणी एअर सेन्सर बसविण्याचे महत्त्वही नमूद करण्यात आले होते. त्यांचा मुद्दा असा होता की तुम्ही काय हाताळत आहात हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते योग्यप्रकारे हाताळू शकता, म्हणूनच याची पहिली पायरी म्हणजे बांधकामांच्या ठिकाणांवरील  वायू प्रदूषण (किंवा हवेचा दर्जा) मोजणे व मला हा मुद्दा मान्य आहे. या सादरीकरणामध्ये पुढे बांधकामाच्या ठिकाणी जी खबरदारी घेणे व सोयी करणे आवश्यक आहे त्या नमूद करण्यात आल्या होत्या, त्यासाठी पुणे महानगरपालिकेने (तांत्रिक समितीच्या मदतीने) तयार केलेली मार्गदर्शकतत्वेही प्रेक्षकांना दाखवण्यात आली होती. पुण्याचे माननीय महापौर व महापालिका आयुक्तांनी व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले व वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न सांगितले. त्यांच्यापैकी बहुतेकांनी वर्तमानपत्रातील वायू प्रदूषणाच्या मथळ्यांचा उल्लेख केला व माननीय महापालिका आयुक्तांनीही त्यांची दिल्लीहून पुण्याला बदली झाल्याचे नमूद केले, जेथील हवेचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे हे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे पुण्यामध्ये जरा मोकळा श्वास घेता येईल असे त्यांना वाटत होते, कारण ते इथे आधी पुण्याचे जिल्हाधिकारी होते. परंतु हवेच्या दर्जाच्या पातळीच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. विनोदाने ते म्हणाले की प्रदूषणाने दिल्लीहून पुण्यापर्यंत त्यांची पाठ सोडलेली नाही. परंतु चांगली गोष्ट म्हणजे पुणे महानगरपालिका विकासकांसोबत असल्याचे त्यांनी नमूद केले व काही प्रमाणात यूडीपीसीआर जमीनी/गृह निर्माण संस्थांना एफएसआय वाढवून देण्यासाठी जबाबदार आहे. सर्व अधिकारी तसेच निवडून आलेल्या सदस्यांनी आवाहन केले (म्हणजे इशारा दिला) की बांधकाम व्यावसायिकांनी वायू प्रदूषणाच्या निकषांचे पालन करावे, नाहीतर त्यांच्याविरुद्ध क़डक कारवाई केली जाईल (दुसरे काय). त्याचप्रमाणे पन्नास हजार चौरस फूटांपेक्षा जास्त बांधकाम क्षेत्रासाठी एअर सेन्सर लावणे बंधनकारक आहे, आता महानगरपालिका लहान आकाराच्या इमारतींसाठीही ते बंधनकारक करण्याचा व त्याचा खर्च बांधकाम व्यावसायिकांनाच द्यायला लावण्याचा विचार करत आहे (दुसरे काय).

या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शहरातील हवेच्या दर्जाविषयी माझे विचार मांडण्यासाठी मी उभा राहिलो, त्यावेळी मला सार्वजनिक हत्यासत्र घडवणाऱ्या एखाद्या मारेकऱ्यासारखे वाटत होते ज्याची बाजू मांडण्यासाठी वकीलही नाही व ज्याला तो निरपराध असल्याचे सिद्ध करायचे आहे. तर, मी स्वतःला किंवा विकासकांना निरपराध सिद्ध करण्याच्या हेतूने अजिबात काहीही बोललो नाही, कारण यात तीन गोष्टी आहेत, एक म्हणजे, कुणालाही ते ऐकण्यामध्ये रस नाही, दुसरे म्हणजे, आपल्या देशात बांधकाम व्यावसायिक नेहमी चूकच असतात व तिसरे म्हणजे, कोण चूक व कोण बरोबर हे सिद्ध करण्याचा मुद्दा नाही तर हवेचा दर्जा चांगला असावा यासाठी काय करणे आवश्यक आहे हा मुद्दा आहे, हाच दृष्टिकोन असला पाहिजे, ज्याचे पालन करण्याचा मी प्रयत्न केला. हा विषय गुंतागुंतीचा आहे व त्यावरील तोडगा त्याहूनही गुंतागुंतीचा आहे. मी अशा अनेक कंपन्या आङेत ज्या आपल्याला हवेच्या दर्जाचा निर्देशांक दाखवतात असे सांगून मी सुरुवात केली. ज्याप्रमाणे आपला रक्तदाब मोजण्यासाठी अनेक साधने असतात, परंतु माझा रक्तदाब नियंत्रित कसा करायचा हे मला सांगणारे कोणतेही साधन नसते, ते मला माझ्या जीवनशैलीद्वारे करावे लागते, वायू प्रदूषणही तसेच आहे! मी खरोखरच सांगतो, जर रक्तदाब व मधुमेह जीवनशैलीमुळे होणारे आजार असतील तर वायूप्रदूषणाचेही तसेच आहे, फरक केवळ इतकाच आहे यामुळे संपूर्ण शहराची रुग्णासारखी अवस्था झाली आहे. तुम्ही केवळ शरीराच्या एका अवयवाला दोष देऊ शकत नाही, तसेच वाढलेल्या रक्तदाबासाठी त्या अवयवाला जबाबदार धरू शकत नाही, त्याचप्रमाणे केवळ एक उद्योग किंवा घटक किंवा संघटना शहरातील हवेच्या दर्जासाठी जबाबदार असू शकत नाही, ही वस्तुस्थिती आपण समजून घेण्याची व स्वीकारण्याची वेळ आता आली आहे, अशी विनंती मी केली (लक्षात ठेवा, विनंती केली)!

एअर सेन्सर महत्त्वाचे आहेतच कारण जोपर्यंत तुम्हाला काय नियंत्रित करायचे हे माहिती नसेल, तोपर्यंत तुम्ही नियंत्रित कसे करणार आहात हा त्यामागचा तर्क आहे, परंतु खरी लढाई त्यानंतरच सुरू होते. त्याचवेळी शहरातील हवेचा दर्जा एकाच दिवसात वाईट झालेला नाही त्यामुळे तो एका दिवसात सुधारणार नाही ही वस्तुस्थितीही आपण विचारात घेतली पाहिजे. बांधकामाच्याभोवती हिरव्या-जाळीचे आच्छादन, तसेच पाण्याचा फवारा मारणारी यंत्रे बसविणे या वरवरच्या किंवा अल्पकालीन तरतुदी आहेत, आपण दीर्घाकाळात काय करणार आहोत हेदेखील मह्त्त्वाचे असेल असेही मी नमूद केले. पाण्याची फवारणी करणारे यंत्र गाडीवर बसवले जाते व संपूर्ण शहरात फिरवले जाते, ते दिसायाला छान दिसते व त्यामुळे काही वेळ परिणाम होईल. परंतु फवारलेल्या पाण्यामुळे हवेतील धुळीचे कण जमीनीवर जाऊन बसतात (साधे भौतिकशास्त्र), जेव्हा त्या पाण्याचे बाष्पीभवन होते तेव्हा ते धुलीकण मुक्त होऊन परत रस्त्यावर धूळ होते, याचा आपण कधी विचार केला आहे का? त्यामुळेच धोरणात्मक पातळीवर समांतर तरतूद करायला सुरुवात करणे आवश्यक आहे. मी हवेच्या दर्जाच्या आकडेवारीमध्ये जाणार नाही, यामागचा साधा तर्क आहे, आपल्याकडे खूप घनदाट झाडी हवी, पुष्कळ जास्त प्रमाणात हवी ज्यामुळे हवेतील प्रदूषित घटक शोषून घेतले जातील. त्यासाठी यूडीसीपीआपमधील मूलभूत गोष्टी किंवा बांधकामांचे परवाना नियम आम्हाला बदलावे लागतील. उदाहरणार्थ, आधीही बांधकाम होत असे परंतु पार्किंगची वाढती गरज व तळघरासाठी भूखंडाच्या अगदी कडेला जाण्याची मुभा यामुळे आम्ही बहुतेक भूखंडांच्या कडेला लावलेली मोठी झाडे काढून टाकली आहेत. खरेतर ही झाडे धुलीकण गाळण्याचे सर्वोत्तम साधन होती, व आपण त्यांना आता काढून टाकले आहे, म्हणूनच आपण पार्किंगसाठी उंचीचे नियम शिथील केले पाहिजेत व प्रकल्पांच्या सीमेला लागू असलेल्या मोठ्या झाडांना जागा देण्यासाठी तळघरांवर निर्बंध घातले पाहिजेत, हवेचा दर्जा कायमस्वरूपी चांगला करण्याचा हा हमखास मार्ग आहे! बहुतेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचेही असेच आहे कारण पार्किंग व ड्राईव्ह-वेसाठी आपण झाडे तोडतो. आपण नवीन झाडे लावतो, परंतु ती उंच होण्यासाठी व त्यांनी त्यांच्या भोवतालची हवा स्वच्छ करण्यासाठी बरीच वर्षे लागतात, तोपर्यंत काय, असा माझा सगळ्यांना प्रश्न आहे. यासाठी आपण लवकर पावले उचलली पाहिजेत, एका तांत्रिक समितीची स्थापना केली पाहिजे, जी हवेच्या चांगल्या दर्जासाठी धाडसी परंतु योग्य निर्णय घेईल व कोणत्याही उद्योगाच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न बाळगता ते मंजूर करून घेईल व त्यांची अंमलबजावणी करेल, हाच योग्य मार्ग आहे. बांधकाम तंत्रांच्या संदर्भात खरेतर तयार काँक्रीट व पंपिंग यंत्रणेमुळे बांधकामाच्या ठिकाणी धूळ तयार होण्याचे प्रमाण खरेतर कमी झाले आहे व हेच पृष्ठभागावरील ट्रीटमेंट बाबतीत घडले आहे, ज्याने बाहेरील व आतील प्लास्टरची जागा घेतली आहे, जे आधी धुळीचे मुख्य कारण होते!

त्याचवेळी, आपण या समस्येला तोंड देत असलेले एकमेव शहर नाही, तर जगातील अनेक मोठ्या शहरांचा हवेचा दर्जा खालवला आहे, म्हणूनच योग्य परिणाम साध्य करण्यासाठी ती काय करत आहेत याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. सुदैवाने, इंटरनेट व गूगलमुळे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी प्रत्यक्ष अभ्यास सहलींची आवश्यकता नाही (अर्थात त्या महत्त्वाच्या आहेत) व ही समिती उपलब्ध असलेली सर्व माहिती शोधू शकते, तिची पडताळणी करू शकते व आमच्या स्वतःच्या उपाययोजना तयार करू शकते. पुणे महानगरपालिका ज्याप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना शिक्षा देण्यासाठी सज्ज असते, आपण चांगल्या पद्धतींचे पालन करण्यासाठी व हवेचा दर्जा निरोगी राखण्यासाठी प्रकल्पांना बक्षीसही देऊ शकतो व त्यासाठी बांधकाम स्थळावरील स्वच्छ हवेसाठी स्पर्धेचाही विचार केला जाऊ शकतो. मी म्हटल्याप्रमाणे वायू प्रदूषण हे जीवनशैलीच्या आजारासारखे आहे, त्यावर सगळीकडे समान तोडगा काढून चालणार नाही, तर प्रत्येक प्रकरणाचा वैयक्तिक अभ्यास करणे आवश्यक आहे व त्यानुसार उपचार केला पाहिजे, त्यासाठी क्रेडाई पुणे सर्वांना मदत करण्यासाठी तयार आहे याची मी त्यांना खात्री दिली. इथे नागरिकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे, सदनिकेच्या ग्राहकांनी सदनिका बूक करतांना व नंतरसुद्धा हे प्रश्न त्यांच्या संबंधित बांधकाम व्यावसायिकांना विचारले पाहिजेत की तो किंवा ती एकूण निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना हाती घेत आहे व तुम्ही केवळ प्रति चौरफूट दराच्या व तुम्ही तुमचे घर खरेदी करताना तुम्हाला मिळणाऱ्या सवलतींच्या पलिकडे पाहिले पाहिजे. शेवट करताना पुन्हा तेच उदाहरण देतो, तुमचा रक्तदाब किंवा साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही केवळ तुमचा हात किंवा पाय किंवा यकृताला काम करायला लावू शकत नाही व संपूर्ण शरीरावर त्याचे चांगले परिणाम व्हावेत अशी अपेक्षा करू शकत नाही. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण शरीर व मनाने एकत्रितपणे काम केले पाहिजे, त्याचप्रमाणे, पुणे महानगरपालिका (म्हणजे सरकार) म्हणजे मन व बांधकाम व्यावसायिक तसेच इतर उद्योग म्हणजे शरीर, व ते जेव्हा एकत्रितपणे काम करतात, तेव्हा आपण वायू प्रदूषण नियंत्रित करू शकतो, एवढा इशारा देऊन निरोप घेतो!


संजय देशपांडे smd156812@gmail.com 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!