बिबट्या, वाघ, समाजमाध्यमे आणि सत्य..🐾


































बिबट्या, वाघ,  समाजमाध्यमे  आणि सत्य..🐾


“बिबट्यांना, तेदेखील जंगलातील सामान्य बिबट्यांना, पाऊस आवडत नाही व पावसात ते हमखास आडोसा शोधतात, परंतु तो नरभक्षक सामान्य बिबट्या नव्हता, आणि त्याला काय आवडते किंवा काय आवडत नाही हे मला माहिती नव्हते.”― जिम कॉर्बेट.


“या सर्व व्यवस्थेमध्ये वाघाचे कार्य म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करणे व क्वचितप्रसंगी अतिशय आवश्यक असेल तेव्हा, तो माणसांना मारतो किंवा जेव्हा त्याचे नैसर्गिक खाद्य माणूस निष्ठूरपणे नष्ट करून टाकतो, तेव्हा त्याने मारले आहे असा आरोप करण्यात आलेल्या जनावरांपैकी दोनच टक्के तो मारतो, म्हणूनच संपूर्ण प्रजाती क्रूर आणि रक्तपिपासू असल्याचा शिक्का मारणे न्याय्य होणार नाही.”― जिम कॉर्बेट.


जेव्हा लेखाचा विषय बिबट्या व वाघ असतो, तेव्हा तुम्हाला वरील माणसाशिवाय इतर कुणीही योग्य व्यक्ती सल्ला घ्यायला सापडणार नाही, कारण शंभर वर्षांपूर्वी जेव्हा गूगल किंवा ड्रोन किंवा तत्सम कोणतेही तंत्रज्ञान मदतीला नव्हते तेव्हा या माणसाने पायी चालत व प्रत्यक्ष या प्रजातींसोबत राहून त्यांच्याविषयी अभ्यास केला (त्यांना फक्त मारले नाही, हे लक्षात ठेवा). म्हणूनच आजही बिबट्या व वाघांच्या वर्तनाच्या बाबतीत कॉर्बेट यांचा शब्द अंतिम मानला जातो. हे केवळ वन्य प्राण्यांच्या संदर्भात नाही तर कॉर्बेट यांनी या प्राण्यांच्याभोवती  राहणार्‍या माणसांनाही तितकाच न्याय दिला आहे. त्याचशिवाय, त्यांनी ज्या माणसांनी या प्राण्यांना नर भक्षक होण्यासाठी भाग पाडले आहे त्यांना इशाराही दिला व टीकाही केली, कारण या वन्य प्राण्यांचा मूळ स्वभाव नरभक्षकाचा नसतो. आपला देश जीवनाच्या प्रत्येक पैलूविषयी व विशेषतः निसर्गाविषयीच्या ज्ञानाने समृद्ध होता व आहे. परंतु तरीही दुर्दैवाने आपण क्वचितच याविषयी जाणत्यांच्या मताचा आदर करतो. बिबटे व वाघांविषयी आज जे समाज माध्यमांमध्ये मथळे वाचायला मिळत आहेत ते या ज्ञानाची जाणीव नसल्यामुळेच, हा माझ्या लेखाचा विषय आहे!

होय, हा लेख बिबटे व वाघांविषयी आहेच (त्यामध्ये ताडोबाही आहे परंतु केवळ संदर्भासाठी), परंतु रोचक बाब म्हणजे मानवी समाजाच्या बाबतीत या नाण्याच्या दोन बाजू आहेत, खरोखरच आपण माणसे फार विचित्र प्रजाती आहोत. जे लोक वर्तमानपत्रे वाचतात, टीव्हीवरील बातम्या पाहतात (सशुल्क/निःशुल्क), कुणीतरी पाठवलेले वॉट्सॲपवरील संदेश व फेसबुकवर करण्यात आलेल्या पोस्ट वाचतात (तुम्ही यापैकी काहीही करत नसाल तर तुम्ही संत आहात), त्यांना पुणे जिल्ह्याच्या शहरी भागामध्ये बिबट्याचा धुमाकूळ (म्हणजे दहशत) माहिती असेल. याला दुजोरा देण्यासाठी आपले शासनकर्ते, यंत्रणा (म्हणजे सरकार) व माध्यमे तसेच स्वघोषित तज्ज्ञ व गावकऱ्यांची यांची निवेदने व टिप्पण्या आहेतच. आता बरेचजण असे म्हणतील की मीसुद्धा एक स्व-घोषित तज्ज्ञ आहे, तर तुम्ही तसे म्हणू शकता परंतु मी जे काही सांगत आहे ते माझे मत नाही तर विश्लेषण आहे. मी जे काही सुचवत आहे त्या माझ्या सूचना आहेत ज्या संबंधित विभागाकडून किंवा व्यक्तीकडून वापरल्या जाऊ शकतात, केवळ त्यांनी तर्कशुद्धपणे त्याचा स्वीकार केला पाहिजे (डिस्क्लेमर 1). तसेच माझे नशीब म्हणजे मला गेल्या पंचवीस वर्षात काही काळ जंगलामध्ये व त्याभोवती घालवता आला. मी जे लोक जंगलाभोवती राहतात त्यांच्याही संपर्कात आहे, त्यामुळे माझी या विषयाशी थोडी तोंडओळख आहे असे मी म्हणू शकतो. मला हे लिहावेसे वाटले कारण माझे वन्यजीवनावर अतिशय प्रेम आहे ज्याचा बिबटे अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. तसेच स्थानिकही अतिशय महत्त्वाचा भाग आहेत जे बिबट्यांसोबत राहतात, त्यामुळे दोघांचेही जीवन तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्यातील एकमेव फरक म्हणजे बिबटे माणसाचे आयुष्य आणखी चांगले कसे होऊ शकेल यासाठी विचार व कृती करू शकत नाहीत, परंतु माणसे मात्र बिबट्यांसाठी वरील दोन्ही गोष्टी करू शकतात म्हणूनच व दुसरी गोष्ट म्हणजे बिबटे माझे शब्द वाचू शकत नाहीत (उपरोधिक)! त्याचवेळी, मला स्थानिकांविषयी संपूर्ण आदर व सहानुभूती आहे जे बिबट्यांच्या दहशतीखाली जगत असतात व ज्यांनी बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये त्यांचे कौटुंबिक सदस्य गमावले आहेत. परंतु मी जो हा लेख लिहीतो आहे तो इतरांना बिबट्यांच्या प्रश्नाची (मी समस्या म्हणणार नाही) नेमकी काय परिस्थिती आहे हे समजून सांगण्यासाठी आहे व जर माझ्या लेखामुळे माणसांचा व बिबट्यांचाही जीव वाचण्यास मदत व्हावी (डिस्क्लेमर 2) हा हेतू आहे.


सर्वप्रथम बिबट्यांचा हा प्रश्न समजून घेऊ व इथे अनेकजण म्हणतील, यात समजून घेण्यासारखे काय आहे, त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे (जसा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांनी घातला आहे) व आपण त्यांच्यापासून सुटका करून घेतलीच पाहिजे. पण हे वाटते तितके सोपे नाही, असे असते तर आपण भटक्या कुत्र्यांनाही मारू शकलो असतो (माफ करा, मी केवळ समजून सांगण्यासाठी उदाहरण देतो आहे). इथे आपण वन्यजीवन कायद्यानुसार श्रेणी 1 मधील प्राण्याविषयी बोलतोय, म्हणजे सर्वोच्च संरक्षण असल्याकारणाने त्यांना सहज ठार करता येत नाही. बिबट्यांशी संबंधित कुठल्याही धोरणासाठी सर्वोच्च मंजुरी (सर्वोच्च न्यायालयाची) लागते. दुसरा मुद्दा म्हणजे बिबट्यांचा हा प्रश्न एका रात्रीत निर्माण झालेला नाही, हा प्रश्न जवळपास तीन दशकांपासून आहे विशेषतः जुन्नरच्या भागामध्ये. परंतु नेहमीप्रमाणे आपण (म्हणजे यंत्रणा किंवा सरकार) त्यासंदर्भात काहीच केले नाही. आता जेव्हा बिबटे व माणसांच्या लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे (ज्यामुळे दोघांमध्ये संघर्ष होत आहे) त्यावर उपाय काय याविषयी आपण निरुत्तर आहोत. त्याशिवाय वाघासारखा बिबट्यांचा अभ्यास करण्यात आलेला नाही, याला केवळ बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानासारखे काही अपवाद आहेत. जोपर्यंत आपण एखाद्या प्रजातीचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपण त्यांना आपण योग्यरीत्या हाताळू शकत नाही, मग तो एखादा विषाणू असेल किंवा बिबट्या, हे बिबट्यांचा अभ्यास करण्याचे  कष्ट न घेतल्यामुळे  यंत्रणेला आलेले आणखी एक अपयश आहे. म्हणूनच अनेक लोक (म्हणजे शासनकर्ते) बिबट्यांचे निर्बिजीकरण करावे, त्यांना आफ्रिकी देशांना द्यावे, त्यांना कुत्री व शेळ्या खाऊ घालाव्यात, इतर जंगलांमध्ये स्थलांतरित करावे, तसेच त्यांना ठार मारावे (दिसताक्षणी ठार करावे) यासारखी विधाने व दावे करत आहेत. हे सगळे दावे आपल्या अपरिपक्वतेची, तसेच आपण बिबट्यांना व त्यांच्या प्रश्नाला समजून घेत नसल्याचे निदर्शक आहे (म्हणजे मूर्खपणा आहे). असो, दशकभरापूर्वी पुणे जिल्ह्याच्या या भागांमध्ये बिबट्यांची सफारी सुरू करावी असा एक प्रस्ताव होता म्हणजे स्थानिकांना बिबट्यांचा वापर अर्थाजनासाठी करता येईल ज्याप्रमाणे तो इतर जंगलांमध्येही वन्यजीव संवर्धनासाठी करण्यात आलेला आहे. परंतु ही एक चूक होती, कारण हे जंगल नाही व बिबट्या म्हणजे काही वाघ नव्हे जो तुम्ही सहज पर्यटकांना दाखवू शकता. हा अधिवास कृषी व शहरी भाग (अलिकडे) आहे व ताडोबा किंवा विदर्भासारख्या ठिकाणी जंगलातील सफारींमुळे वन्यजीवन संवर्धन यशस्वीपणे करता आले याचे मुख्य कारण म्हणजे तेथील स्थानिकांकडे उपजीविकेचे इतर काही साधन नव्हते. परंतु इथे स्थानिकांच्या जमीनी उसासारख्या नकदी पिकाच्या लागवडीखाली आहेत व त्यांच्याकडे उत्पन्नाची पुरेशी साधने आहेत. त्यांना नक्कीच त्यांच्या जमीनी बिबट्यांच्या सफारीसाठी वापराव्यात असे वाटणार नाही, तसेच ज्याप्रमाणे वाघ दिवसाढवळ्या रस्त्यावर दिसतात तसे बिबटे दिसत नाहीत. बिबट्यांशिवाय, तुम्ही पर्यटकांना काय दाखवाल, शेतजमीनी व कचऱ्यांचे ढीग? म्हणूनच स्थानिकांचे बिबट्यांशी मैत्रीपूर्ण नाते असावे यासाठी एकूणच सफारीचा पर्याय व्यवहार्य होणार नाही, आहे त्या स्वरुपात तरी.

तर आता या बिबट्यांचे करायचे काय, तर यावरील तोडगा दुहेरी आहे तो म्हणजे काही बिबटे पकडायचे व तर काहींना ठार मारायचे जे नरभक्षक झाले आहेत(माफ करा पण ही केवळ एक सूचना आहे), जे माणसांवर नियमितपणे हल्ले करतात. त्याचवेळी आपण विदर्भ किंवा राज्याच्या इतर भागातील मनुष्यबळाचा येथे जास्तीत जास्त वापर करून घेतला पाहिजे कारण ते लोकं वन्यजीवन जाणतात. याचे कारण म्हणजे तुम्ही शहरी भागात राहणाऱ्या लोकांकडून ते बिबट्यासारख्या वन्य प्राण्याला हाताळू शकतील अशी अपेक्षा करू शकत नाही. अशा लोकांची गस्त घालण्यासाठी पथके तयार करा, विशेषतः संध्याकाळपासून ते सकाळपर्यंत जेणेकरून बिबट्यांना मानवी वसाहतींपासून लांब ठेवता येईल. बिबट्या हा अतिशय हुशार प्राणी आहे व स्वसंरक्षणासाठी जगण्याच्या बाबतीत कदाचित सर्वोत्तम आहे (जिम कॉर्बेट यांचे अवतरण वाचा). असें जनावर जागृत माणसे असलेल्या अधिवासात जगणे, ते सुद्धा प्रशिक्षित होऊन व रस्त्यावर फिरणे सोपे नाही. यामुळे अंधारात शिकारीला निघाल्यानंतर त्याच्या हालचालींसाठी मोठा अडथळा निर्माण होईल हे तो समजून घेईल. हळूहळू तो तो येथून काढता पाय घेईल व नक्कीच दुसरा अधिवास शोधेल. हे एका महिन्यात किंवा वर्षात होणार नाही तरीही यामुळे स्थानिकांना आरामात राहता येईल व माणसांवरील व पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले निश्चितपणे कमी होतील. कारण वाघाच्या उलट बिबट्या माणसांना किमान मोठ्या माणसांना तरी घाबरतो हे नक्की. यामुळे यंत्रणेला (म्हणजेच सरकार व वन विभाग) दीर्घकालीन उपाययोजना तसेच योग्य धोरणे तयार करण्यास नक्कीच उसंत मिळेल व पर्यटन हा निश्चितपणे त्याचा एक भाग असेल, कारण आज ना उद्या तिथे सहजीवन अपरिहार्य होणार आहे.

परंतु तुम्हा आत्ता या भागात गेलात व तेथील लोकांना बिबट्यांचा स्वीकार करण्याविषयी किंवा पर्यटनासाठी त्यांचा वापर करण्याविषयी किंवा खबरदारी घेण्यासाठी व त्यांची जीवनशैली बदलण्याविषयी सांगितलेत, तर ते तुमच्यावरच उलटेल एवढा प्रचंड गोंधळ आपणच करून ठेवला आहे, बिबट्यांनी नव्हे. आगामी काळात लोकांमध्ये आणखी जागरुकता निर्माण होईल, पॅकेज दिली जातील, तसेच या गावांच्याभोवती, शहरांभोवती आरक्षित अधिवास वगैरे गोष्टी तयार केल्या जातील, त्यामध्ये उसाच्या शेतीचाही समावेश असू शकतो व त्यानंतर आपण त्यांच्यासाठी सावज उपलब्ध करून देऊ शकतो ज्याची आता या बिबट्यांना सवय होऊ लागली आहे व त्यानंतर सफारीचे नियोजन करू शकतो. याचे कारण म्हणजे तुम्ही उसाची शेते बिबट्यांसाठी अधिवास म्हणून आरक्षित केली तरीही तुम्ही त्यांच्यासाठी अन्न कुठून आणणार आहात, याचा विचार इथे सफारीचा प्रस्ताव तयार करणाऱ्या कुणीही केला नाही. त्याचप्रमाणे हे बिबटे त्यांच्या जगण्यासाठी अधिक चांगली परिस्थिती असलेल्या जागी आपणहून स्थलांतर करू शकतील अशा प्रवास भ्रमण मार्गांचा विचार करा, कारण त्यांचा आणि माणसांमधील संघर्ष जसा कमी होईल, तशी त्यांची अन्न साखळीही कमी होईल. त्यानंतर कोणताही वन्यप्राणी पहिला पर्याय निवडेल तो म्हणजे दुसरा अधिवास शोधणे व सध्या आपण त्यांच्या स्थलांतराचे साधनच कमी केले आहे व म्हणून ते त्यांच्या मार्गात जे येतील त्यांच्यावर हल्ला करत आहेत. यामुळेच अलिकडच्या काळात हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, कारण आत्तापर्यंत बिबट्यांची संख्या एका पातळीपर्यंत होती तोपर्यंत त्यांना या क्षेत्रातील भटकी कुत्री, डुकरे व अगदी ससे इत्यादी प्राण्यांच्या स्वरूपात अन्न मिळत होते. त्यांची संख्या वाढली परंतु त्यांच्यासाठी उपलब्ध असलेले सावज मर्यादित असल्याने त्यांनी अन्नासाठी निकराचे प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. त्याचवेळी वाघ व बिबट्यामधील फरक म्हणजे, वाघ हा अतिशय व्यक्तिवादी प्राणी आहे, एका क्षेत्रामध्ये केवळ एकच वाघ राहतो. बिबट्यांचे जरी क्षेत्र असले तरीही, ते इतरांशी वाटून घ्यायला त्यांची हरकत नसते (त्यांनी इथे हा दृष्टिकोन इथे स्वीकारला आहे असे किमान दिसून येते), कारण त्यांच्यासाठी स्वाभिमानापेक्षाही जगणे अधिक महत्त्वाचे असते. नर वाघ त्याच्या क्षेत्रामध्ये वाघिणीची इतर नर वाघांपासून झालेली बछडी मारून टाकतो, यामुळे वाघांची संख्या नियंत्रणात राहते, बिबट्यांच्या बाबतीत मात्र असे नसते. यामुळेच बिबट्यांच्या वाढत्या संख्येची खरी समस्या म्हणजे जे एकमेकांशी जुळवून घेत, कमी अन्न असतानाही जगायला शिकले तरीही याच्या परिणामी निकराचे हल्ले केले जातात किंवा बेधडक वर्तनाच्या पातळीत वाढ होते. आपण याचाच अभ्यास करण्यात अपयशी ठरलो आहोत व अभ्यासाचा हा पैलू दीर्घकालीन उपाययोजनांचा एक भाग असला पाहिजे. याचे उत्तम उदाहरण आपल्याकडे आधीच आहे व ते म्हणजे झालना, हे राजस्थानातील जयपूर शहराजवळीच बिबट्यांचे अभयारण्य. अर्थात हा अधिवास पूर्णपणे वेगळा आहे परंतु आपण तसा एखादा अधिवास तयार करण्यास आत्तापासून सुरुवात करू शकतो व बिबट्यांना त्याकडे वळवू शकतो. तसेच वनताराप्रमाणे फक्त बिबट्यांसाठी काही तयार करू शकतो. अर्थात हे सगळे वेगाने केले पाहिजे व प्रत्यक्ष साकार झाले पाहिजे, नाहीतर, पुन्हा एकदा ते केवळ कागदोपत्रीच राहील जी वन्यजीव संवर्धनाची मुख्य समस्या आहे. तोपर्यंत समाजातील सर्व पातळ्यांवर हळूहळू जागरुकता निर्माण करणारी एखादी मोहीम सुरू ठेवली पाहिजे विशेषतः राजकारण्यांमध्ये ज्यांना खरी समस्या सोडवण्यापेक्षाही त्यांच्या मतांमध्ये जास्त स्वारस्य असते.


आता वन्यजीवनाच्या आणखी एका नमुनेदार उदाहरणाविषयी बोलू, ज्यामध्ये चंदा नावाच्या वाघिणीचे ताडोबाच्या बफर क्षेत्रातून कोल्हापूरजवळच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतर करण्यात आले. यातील रोचक तथ्य पाहा, कारण एका बाजूला बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांवर लोक चिडलेले आहेत, तर दुसरीकडे ताडोबातील स्थानिक लोकांचा चंदाला स्थलांतरित करण्यासाठी व सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आणखी एका वाघिणीचा समावेश करण्यासाठी विरोध होता, कारण यामुळे त्यांच्या पर्यटनाचे नुकसान होईल असे त्यांना वाटते. तर दुसरीकडे सह्याद्रीचा संपूर्ण प्रदेश या वाघिणीचे स्वागत करत आहे कारण तिच्यामुळे आता पर्यटनात वाढ होणार आहे, त्यामुळेच या जंगलांच्याभोवती राहणाऱ्या लोकांच्या उपजीविकेतही वाढ होईल. आपण माणसे फार मजेशीर प्राणी आहोत; नाही का, कारण समाज म्हणून दोन वन्य प्रजातींबाबतचे आपले वागणे पाहा. एका प्रकरणामध्ये आपण वाघांची पूजा करत आहोत व दुसऱ्या प्रकरणामध्ये आपले बिबट्यांशी वैर आहे. यात शहाणपणे म्हणजे, योग्य प्रकारे जगणे म्हणजे सहजीवन, ज्यामध्ये माणसे, बिबट्या व वाघ सर्व एकत्रतपणे सौहार्दाने जगतील व ही केवळ माणसांचीच जबाबदारी आहे, एवढे सांगू निरोप घेतो!


संजय  देशपांडे smd156812@gmail.com www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!