टीम वुमन इंडिया, रोको आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचा विशेष विजय..!!









































टीम वुमन इंडिया, रोको आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचा विशेष विजय..!!


प्रत्येक जण विशेष असतो हे खरे नाही. प्रत्येकजण कधीकाळी विशेष होता व त्याच्याकडे अजूनही ती विशेष क्षमता आहे व जे अतिशय विशेष असतात केवळ तेच हे करू शकतात.”

― क्रिस जेमी

“पापमुक्त होण्यासाठी तुम्हाला अतिशय वैयक्तिक, निर्भिड प्रयत्न करावे लागतात. आपली काही पात्रे तिथे पराभूत होतात, काही मार्गावरून भरकटतात, तर काही ते पुन्हा मिळवतात.”

― जॉस व्हेडॉन

खरी गंमत तेंव्हा येते, जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करता येणार नाही असे म्हणत असते व तुम्ही नेमके तेच करून दाखवता… मी.


अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील लिंचबर्ग येथे २९ मे, १९८७ रोजी जन्मलेल्या क्रिस जेमी म्हणजेच ख्रिस्तोफर जेम्स, यांनी अनेक पुस्तके लिहीली, त्या किलोसोफर ॲपरेलच्या निर्मात्या/डिझायनर आहेत, व मेटल संगीत या प्रकारातील क्रिमसन ग्रेफन या प्रकल्पाच्या संगीतकारही आहेत. जोसेफ हिल “जोस” व्हेडन हे अमेरिकी पटकथा लेखक, दिग्दर्शक, कॉमिक पुस्तकांचे लेखक व संगीतकार होते. तिसरे वाक्य माझे आहे. मी केवळ क्रिस किंवा जोस यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारातून मला जो काही बोध झाला आहे तो शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे! लेखाचा विषय आहे क्रिकेट व मला (जगभरातील असंख्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणे) दिवाळीच्या आठवड्यात दोन अतिशय सुंदर क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले, जे भारतीय क्रिकेटच्या इतिहास स्वर्णाक्षरात कोरले जातील. एक म्हणजे रोकोचा (रोहित आणि कोहली) खेळ आणि दुसरे म्हणजे महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचा उपांत्य सामना. योगायोगाने (किंवा काही) म्हणा, दोन्ही ठिकाणी ऑस्ट्रेलियाच प्रतिस्पर्धी होती. मला नेहमीच ऑस्ट्रेलिया हा आपला सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचे वाटत आले आहे, याची अनेक कारणे आहेत, एक म्हणजे त्यांची शरीरयष्टी मुळातच दणकट असते व बहुतेक खेळामध्ये ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असते. दुसरे म्हणजे, ते कदाचित फार कुशल किंवा उपजत गुणवत्ता असलेले नसतील, परंतु ते सरावावर व नियोजनबद्धपणे सगळ्या गोष्टी करण्यावर विश्वास ठेवतात. ऑस्ट्रेलियन खेळाडू कोणताही खेळ निष्ठूरपणे खेळतात व कोणतीही मॅच अजिबात सहजपणे घेत नाहीत, यामुळे त्यांना फारसा धोका कधीच नसतो. सर्वात शेवटची व महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळतात विशेषतः कोणताही मोठा सामना. या सर्व वैशिष्ट्यांमुळे ते कोणत्या खेळामध्ये विजेते ठरतात, ज्याला क्रिकेटही अपवाद नाही. म्हणूनच कोणत्याही खेळामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे हे कोणत्याही संघासाठी एक आव्हान असते, ज्याला भारतीय संघही अपवाद नाही. क्रिकेट म्हटले की भारत-पाकिस्तान सामना हा कोणत्याही मालिकेचा परमोच्च बिंदू असे. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे या दोन्ही संघांमधील सामने थांबले. परंतु आपल्या देशातील राजकीय, सामाजिक व आर्थिक स्थैर्यामुळे भारतीय संघही बदलत होता. पाकिस्तानी खेळाडूंविषयी पूर्णपणे आदर राखून असे सांगावेसे वाटते की पाकिस्तानी संघाची आता भारतीय संघाशी अजिबात तुलना होऊ शकत नाही. त्याचवेळी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळातील कट्टर शत्रुत्वही भारत-पाकिस्तानसारखेच होते, ज्यामध्ये बहुतांश काळ ऑस्ट्रेलियाच वरचढ ठरल्याने, काळाच्या ओघात या शत्रुत्वाची धारही कमी होऊ लागली. परंतु क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये भारत हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात सशक्त प्रतिस्पर्धी म्हणून उदयास आला आहे, सद्यपरिस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी झाला आहे, विशेषतः मोठ्या स्पर्धांमधील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये. म्हणूनच या संघाविरुद्धचा कोणताही सामना विशेष असतो. कोणत्याही खेळामध्ये अशक्य गोष्टी घडतात, परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ प्रतिस्पर्ध्याला अशक्यप्राय गोष्ट साध्य करू देण्यापेक्षा स्वतःच अशक्य कामगिरी करून दाखवण्यासाठी ओळखला जातो, म्हणूनच हा सर्वात धोकादायक संघ आहे.

आता हे सगळे तुम्हाला माहिती आहे, असे तुम्ही म्हणालात, तर ऑस्ट्रेलियाचा संघ का विशेष आहे हे ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांना असे वाटत नाही त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण आहे. माझ्यासाठी क्रिकेट म्हणजे (जंगलाप्रमाणेच) फक्त एखादा खेळ किंवा मनोरंजन नाही तर जीवनाचे धडे देणारी शाळा आहे. या शाळेमध्ये जेवढा विषय अवघड तसेच शिक्षक जेवढे कडक तेवढा तुम्हाला जीवनाचा मोलाचा धडा मिळतो, ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्धी म्हणून तसा आहे. जीवनातही तुमचा प्रतिस्पर्धी किंवा काम जेवढे कठीण, तेवढी तुम्हाला तुमच्या क्षमतांच्या मर्यादांची चाचणी घेण्याची संधी मिळते, हा पहिला धडा मी शिकलो. आता लेखाचा पहिला भाग म्हणजे रोको अर्थात रोहित शर्मा व विराट कोहली यांची जोडी. मी ते किती महान आहेत याविषयी सांगण्यासाठी फारसे शब्द खर्च करणार नाही, केवळ एवढेच सांगतो की महान सचिन तेंडुलकरनंतर एक दिवसीय प्रकारामध्ये या दोघांच्या नावे सर्वाधिक विक्रम आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक दुहेरी शतके, षटकार, झेल व अशा अनेक विक्रमांचा समावेश आहे, तर असो! भारतीय संघाच्या अलिकडेच झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांची दुहेरी मालिका या दोन्ही खेळाडूंचा तिथला शेवटचा दौरा होता व चाहते त्यांचा खेळ पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होते व त्याहूनही उत्सुक होते टीकाकार. कोणाच्याही कारकिर्दीमध्ये, विशेषतः खेळाच्या बाबतीत, तुम्ही जेव्हा अखेरच्या टप्प्यात असता तेव्हा टीकाकार एखाद्या गिधाडाने त्याच्या मरणप्राय सावजाकडे पाहावे त्याप्रमाणे पाहतात, तुमच्या एवढ्याशा अपयशाने तुमचा लचका तोडण्यासाठी तयार असतात. पहिल्या एक दिवसीय सामन्यात, रोहित 8 धावा करून बाद झाला तर विराट शून्यावरच बाद झाला. भारत तो सामना हरला व मांस आणि रक्ताचा सुगावा लागताच गिधाडांना अत्यानंद झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये रोहितने  70 धावा केल्या तर विराट पुन्हा एकदा शुन्यावर बाद झाला, भारत पुन्हा हरला. रोहितने संघात सर्वाधिक धावा करूनही टीकाकार सरसावलेलेच होते, त्याचा धावांचा दर व शारीरिक हालचाली अतिशय संथ होत्या असे त्यांचे म्हणणे होते व विराटची कारकिर्द आता संपली आहे वगैरे, वगैरे. भारत तीनपैकी दोन सामने गमवून मालिका आधीच पराभूत झाला होता परंतु ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा कधीही एकदिवसीय प्रकारामध्ये मालिकेत तीन विरुद्ध शुन्याने पराभव झालेला नव्हता. त्यामुळे आपली प्रतिष्ठा पणाला लागली होती व रोकोसाठी प्रतिष्ठेपेक्षाही अधिक काहीतरी पणाला लागले होते, ते म्हणजे टीकाकारांना उत्तर.

त्या दोघांनीही त्यांना जो मार्ग माहिती होता त्यानेच प्रत्युत्तर दिले, ते म्हणजे त्यांच्या कामगिरीतून, त्यांनी एक शतक व अर्धशतकाच्या जोरावर २ऱ्या गड्यासाठी तडाखेबाज भागीदारी रचली व भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. मी आता काही आकडेवारीमध्ये जाणार नाही कारण या दोघांसाठी त्याची समस्या कधीच नव्हती, इथे मुद्दा काहीही सिद्ध करण्याचा नव्हताच तर स्वतःकडून असलेल्या स्वतःच्याच अपेक्षा पूर्ण करण्याचा होता. ज्या वयामध्ये बहुतेक खेळाडू आनंदाने निवृत्त होण्याचा निर्णय घेतात, या दोघांनीही देशासाठी खेळण्याची इच्छा दाखवली व त्यांना त्यांचा स्वतःचा निर्णय योग्य होता हे दाखवून द्यायचे होते, जे त्यांनी केले. ज्या लोकांना (तरुणांसह) स्वतः तयार केलेल्या मार्गावरून चालायचे आहे त्यांच्यासाठी हा धडा आहे, व असे करण्यासाठी काय लागते हे रोकोच्या जोडगळीने आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिले. रोहितने त्यासाठी जवळपास अकरा किलो वजन कमी केले कारण वय त्याच्या बाजूने नाही हे तो जाणून होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांविरुद्ध व वेगवान खेळपट्ट्यांवर शरीराच्या हालचाली वेगाने होण्यासाठी त्याने वजन कमी करून समतोल साधण्याचा प्रयत्न केला. विराटच्या बाबतीत तर त्याचा शत्रूही त्याच्या तंदुरुस्तीविषयी शंका घेणार नाही. त्याच्यासाठी महत्त्वाचे होते खेळपट्टीवर टिकून राहणे व त्यासाठी आवश्यक असते ती शिस्त व संयम, त्यानेही तो पुन्हा मिळवला. आपल्या सगळ्यांना आपल्या कारकिर्दीमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मनात किंवा प्रश्न शंका येतात, विशेषतः जेव्हा आपली कामगिरी सर्वोत्तम नसते किंवा आपण सर्वोच्च स्थानी नसतो तेव्हा. अशावेळी आपण जे नाही ते सिद्ध करून दाखवण्यापेक्षा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे. मेहनत असो अथवा खेळ (किंवा काम), हे करताना आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा म्हणजे पुढे जाण्याचा मार्ग मिळेल, रोकोच्या जोडगळीनेही हेच केले व मी यातून हाच धडा घेतला. त्या दोघांनाही काहीच सिद्ध करायचे नव्हते केवळ लोकांच्यासमोर आपले हसे होऊ नये (या जगात तुमचे चाहते हे अतिशय झटपट शत्रू होतात, हा आणखी एक धडा मला मिळाला) याची खात्री करायची होती व त्यांच्या कारकीर्दीचा शेवट नकारात्मक होऊ द्यायचा नव्हता. विजेते नेमके हेच करतात, उत्तम कामगिरी करून त्यांच्या कारकिर्दीचा तिला एका उंचीवर नेऊन करतात. रोको एकदिवसीय क्रिकेटमधून खेळणे कधी थांबवतील हे ते ठरवतील, पण आता चाहते आनंदी आहेत, टीकाकारही आणखी काही वेळ थांबतील व मी थोडा आणखी शहाणा होईन!

आता दुसऱ्या भागाविषयी, तुमचा क्रिकेट आणि जीवनाबाबतचा संयम अजूनही टिकून असेल तर, आज महिलांच्या विश्वचषकामध्ये क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारामध्ये अंतिम सामना सुरू आहे. त्याआधी एक रोचक तथ्य सांगतो: महिलांचा पहिला विश्वचषक पुरुषांचा पहिला विश्वचषक खेळला गेला होता त्याआधी दोन वर्षे म्हणजे १९७३ साली खेळण्यात आला होता. नेहमीप्रमाणे यातही ऑस्ट्रेलियाचा संघ सातवेळा जग्गजेता झाला आहे व विश्वचषकातील गेल्या 15 सामन्यांमध्ये ती विजयी झाला. साखळी सामन्यांमध्ये 331 धावांच्या विश्वविक्रमाचा पाठलाग करताना त्यांनी भारताचा पराभव केला आहे व अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला कुणीही संधी दिली नाही. जी काही थोडीफार आशा होती ती देखील ऑस्ट्रेलियानी केलेल्या भरभक्कम 337 धावांमुळे धुळीला मिळाली कारण ऑस्ट्रेलिया वगळता कुठल्याही संघाने एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला नव्हता. भारतीय संघाने आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे 264 धावांचा पाठलाग केला होता, तेदेखील तुलनेने सोप्या गोलांदाजीपुढे. त्याचशिवाय हा विश्वचषकाचा उपांत्य सामना होता, तुमच्यावर त्याचा ताणच एवढा असतो की, अपेक्षांच्या ओझ्याखाली तुमच्या कामगिरीवर परिणाम होतो. इथेच भारतीय संघाने मला एक धडा शिकवला, ते म्हणजे ताणाचा वापर सर्वोत्तम कामगिरी करण्याकरता लक्ष्य केंद्रित करण्याची एक संधी म्हणून करा. हे म्हणणे अतिशय सोपे आहे व फार छान वाटते परंतु तो ताण सहन करणे व चांगली कामगिरी करून दाखवणे ही वेगळी गोष्ट आहे. परंतु मी उपांत्य सामन्यामध्ये भारतीय संघाला ते प्रत्यक्षात उतरवताना पाहिले. ताणाखालीच ऑस्ट्रेलिया संघाने काही अगदी सोपे झेल सोडले, ज्यामुळेही, भारतीय संघाला मदत झाली.  त्याचप्रमाणे काही खेळाडूंनी जबरदस्त वैयक्तिक कामगिरी केली, पण त्याला संपूर्ण संघाच्या सामूहिक प्रयत्नांची जोड लाभली. आपणही यातून हेच शिकले पाहिजे, की जेव्हा एखादे काम किंवा खेळ सांघिक असतो तेव्हा प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असते, मग अगदी लहानसे का असेना! तारांकित खेळाडू असलेला संघही अशा खेळाडूंच्या संघाकडून पराभूत होऊ शकतो जे आपापली काम जाणतात व त्यावर टिकून राहतात, इथेच शिस्त व यंत्रणा महत्त्वाची असते, जे भारतीय संघाने केले. आपल्याकडे काही उत्तम खेळाडू होते, परंतु आपण केवळ त्यांच्यावरच अवलंबून राहिलो नाही. तर प्रत्येक खेळाडूने मला माझा संघ जिंकावा यासाठी कसे योगदान देता येईल असा विचार केला. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला तुम्ही अशाप्रकारेच मात देऊ शकता.

भारतीय कप्तान हरमनप्रीत म्हणाली, ती हरण्यास कंटाळली होती (कारण उपांत्य सामान्यपूर्वी भारत सलग तीन सामने हरला होता) व आता पुन्हा हरायचे नाही असा निर्धार तिने केला होता व हा एकच विचार तिच्या मनामध्ये होता! जेमिमा रॉड्रिग्जने, तिच्या पहिल्या शतकानंतर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिने जेव्हा संघामध्ये निवड झाली नव्हती तेव्हा मनातील चिंता व भीतीशी सुरू असलेली झुंज मोकळेपणाने सांगितली. तरीही तिने उत्तम कामगिरी करून दाखवली जी सर्वात मोलाची ठरली. ही सगळी धैर्य, निश्चय, समर्पण, तंदुरुस्ती, जबाबदारी व संघ वृत्तीचे जिवंत उदाहरणे आहेत कारण तुम्ही हे शब्द कुठेही वाचू शकता किंवा कोणत्याही तथाकथित गुरूकडून ऐकू शकता. परंतु हा सामना म्हणजे हे शब्द वास्तविक जीवनात कसे वापरायचे याचे जिवंत उदाहरण होते.  शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जेमिमाने सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना येशू तिच्या पाठीशी उभा राहिल्याबद्दल त्याचे आभार मानले. हे जात व धर्माच्या आधारावर दुफळी माजलेल्या आपल्या देशाच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे, कारण तिने येशूची प्रार्थना केली किंवा त्याचे कौतुक केले हे उघडपणे सांगितले म्हणून कुणीही तिच्यावर टीका करण्याचे किंवा तिचा अपमान करण्याचे धाडस केले नाही. हाच खरा आपला देश आणि आपली संस्कृती आहे (व असली पाहिजे) जिथे प्रत्येकाला ज्या देवावर श्रद्धा आहे त्याची प्रार्थना करण्याचा त्याच्यापुढे नतमस्तक होण्याचा अधिकार आहे. आपण जोपर्यंत एका झेंड्याखाली म्हणजे तिरंग्याखाली लढत आहोत तोपर्यंत त्यात गैर काहीच नाही.

सर्वात शेवटी, वैयक्तिक पातळीवर मला भारतीय महिला क्रिकेट संघाची माफी मागावीशी वाटते. मी आत्तापर्यंत महिलांचे सामने फारसे पाहिले नाहीत. मला नेहमी असे वाटायचे की महिलांचे क्रिकेट थोडे संथ असते व त्यांच्यात खेळातली ती खुन्नस दिसून येत नाही; मी आज माझे हे मत मागे घेतो कारण हा सामना पुरुष क्रिकेट संघाच्या मी पाहिलेल्या कुठल्याही सामन्यापेक्षा अधिक सरस होता. मला असे वाटते भारतीय महिला संघाला माझी ही सर्वोत्तम मानवांना ठरेल. मला माहितीय, अंतिम सामना अजून खेळला जायचा आहे, पण म्हणून काय झाले, मी आणखी धडे घेण्यासाठी तयार आहे. एवढे सांगून निरोप घेतो व रोको आणि भारतीय महिला संघाचे मनःपूर्वक आभार!

(हा लेख तुम्ही वाचत असाल तेंव्हा टीम महिला इंडिया जगज्जेती झाली आहे,  त्या विषयी भेटूच)


संजय देशपांडे 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!