एमटीडीसी, जागतिक पर्यटन दिवस व वन्यजीव पर्यटन!









































एमटीडीसी, जागतिक पर्यटन दिवस व वन्यजीव पर्यटन!


“काही शोधण्याच्या खऱ्या प्रवासामध्ये नवीन भूमी शोधण्याचा समावेश होत नाही, तर नव्या नजरेने ती पाहण्याचा समावेश होतो.”

― मार्सेल प्रॉस्ट.

“जंगलात जा, नाहीतर, देवाने माणसाला किती सुंदर भेट दिली आहे हे तुम्हाला कसे समजेल, जी आपलीही जबाबदारी आहे”- मी.

पहिल्या अवतरणाचे लेखक आहेत, व्हॅलेन्टाईन लुईस जॉर्जेस यूजिन मार्सेल प्रॉस्ट हे एक फ्रेंच कादंबरीकार, साहित्य समीक्षक, व निबंधकार होते, जे त्यांची कादंबरी ए ला रिसेर्शे डू टेम्स पर्ड्यू (गतकाळाच्या आठवणी) यासाठी सर्वात प्रसिद्ध आहेत. त्यानंतरचे अवतरण माझे आहे. ते काही वन्यजीवन पर्यटनाविषयीचे अवतरण नाही तर त्या माझ्या भावना आहेत, जो माझ्या लेखाचा विषय आहे. वन्यजीवनाने मला केवळ अतिशय आनंदच दिलेला नाही तर मला वनसंवर्धनासाठी थोडेफार काही करण्याची संधीही दिली आहे ज्यामुळे मला अतिशय समाधान मिळाले आहे व त्याहीपेक्षा अधिक म्हणजे, वन्यजीवनाशी संबंधित असल्यामुळे, मला ओळख व मानसन्मान मिळाला आहे जो बांधकाम व्यावसायिक म्हणून मला कधीही मिळाला नसता. मला बांधकाम व्यावसायिक असल्याबद्दल अजिबात लाज वाटत नाही, किंबहुना मला त्याचा अभिमान वाटतो परंतु दुर्दैवाने या व्यवसायाची प्रतिमा झाडाच्या ढोलीप्रमाणे झाली आहे. त्याच्याशी संबंधित जे काही आहे त्याला काळ्या रंगात रंगवले जाते. परंतु अलिकडच्या काळात तथाकथित वन्यजीवप्रेमींचा जो महापूर आला आहे, त्यामुळे वन्यजीवनाची चलती आहे व माझा त्याच्याशी संबंध असल्यामुळे मलाही मानसन्मान मिळतो, हे सुद्धा मी तितक्याच उत्साहाने स्वीकारतो ज्याप्रकारे मी बांधकाम व्यावसायिक असल्याने टोमणे स्वीकारतो. असो, ही समाजशास्त्रीय चर्चा पुरे, तर अशाच मानसन्मानाचा एक भाग म्हणून मला एमटीडीसीकडून (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) बोलावणे आले, जी आपल्या राज्याची पर्यटन हाताळणारी अधिकृत संस्था आहे. मला २७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त त्यांच्या संपूर्ण चमूपुढे माझे विचार मांडायचे होते.

तुम्ही एमटीडीसीविषयी गूगल करू शकता, म्हणजे त्यांच्या कामकाजाची व्याप्ती तुम्हाला समजेल, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची २९ रिसॉर्ट पसरली आहेत, त्यांची २७ उपाहारगृहेही आहेत, धाडसी खेळांचे आयोजन करणारी ३ केंद्रे आहेत व २५ मोहिमा राबवल्या जातात, व मी खरोखरच सांगतो हे प्रमाण अतिशय मोठे आहे. त्याचशिवाय सरकारच्या पाठिंब्यामुळे ते केवळ जनतेसाठीच विश्वसनीय नाव नाही तर उच्चभ्रू समाजातही त्यांचे नाव आहे व अशा एका संघटनेने मला माझी मते व्यक्त करण्यासाठी बोलावणे हा माझा सन्मानच होता. अर्थात मी सुरुवातीला थोडासा धास्तावलेला होतो कारण श्रोते म्हणजे एमटीडीसीच्या सर्व केंद्रावरून आलेले त्यांचे चमू होते व त्यांच्यासमोर बोलायचे म्हणजे माझी तयारी परिपूर्ण असणे आवश्यक आवश्यक आहे. अभियांत्रिकी व्यवसायाची समस्या म्हणजे ते तुम्हाला सेवा कशी द्यायची हे शिकवत नाही व पर्यटन हे शंभर टक्के सेवा क्षेत्र आहे. तरीही मी माझे वन्यजीवनासंदर्भातील माझ्या कामासाठी जो काही प्रवास केला आहे त्यातून काही मुद्दे काढले आहेत, ते मी आत्ता तुमच्यासमोर मांडणार आहे, म्हणूनच मी त्याचपद्धतीने हे मुद्दे मांडणार आहे…

१. पर्यटन म्हणजे काय किंवा लोक प्रवास का करतात?

कोणत्याही सेवा उद्योगामध्ये सेवेचा हेतू तसेच तुमच्या ग्राहकांना त्या सेवेकडून काय अपेक्षित आहे हे समजून घेतले पाहिजे, कारण असे झाले तरच तुम्ही त्याला किंवा तिला तुमच्याकडून जी अपेक्षा आहे ती अधिक योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. लोक अनेक कारणांनी प्रवास करतात परंतु जेव्हा आपण पर्यटनाचा विचार करतो तेव्हा तो केवळ प्रवास नसतो, सोप्या शब्दात सांगायचे तर आपल्याला रटाळ आयुष्यातून थोडी उसंत काढणे व एकांतात किंवा कुणासोबत थोडा चांगला वेळ घालवणे हा उद्देश असतो. इथेच पर्यटन व्यावसायिक प्रवास किंवा कार्यक्रमांपेक्षा, काही हेतूने केलेल्या प्रवासापेक्षा किंवा करिअरशी संबंधित प्रवासापेक्षा वेगळे असते. एमटीडीसीच्या कोणत्याही रिसॉर्टमध्ये आलेली व्यक्ती थोडा निवांत वेळ घालवण्यासाठी आली आहे हे एकदा आपल्याला समजल्यावर आपल्या संपूर्ण व्यवस्थेने त्याच उद्देशाने काम केले पाहिजे, मग ती खोलीमध्ये दिली जाणारी सेवा असो किंवा जेवण किंवा पाहुण्यांना कोणतीही मदत करणे असो, आपण पाहुण्यांना चांगले वाटावे, जेणेकरून तो पुन्हा येईल असा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२. वन्यजीव पर्यटन

जेव्हा पर्यटनाचा उद्देश वन्यजीवन असतो, जो आपल्या आजच्या लेखाचा मुख्य विषय आहे तो पर्यटनामध्ये आजकालच्या काळातील ओघ आहे, कारण आपल्या जैवविविधतेने समृद्ध देशामध्ये अशी अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत, परंतु पर्यटन मर्यादित होते व एका विशिष्ट वर्गापुरतेच ते मर्यादित होते, जनतेपर्यंत पोहोचले नव्हते, कारण आपल्याला वन्यजीवनाचे सामर्थ्य किंवा खरी मजाच समजलेली नाही. वन्य पर्यटन म्हटले की अनेक लोकांना कान्हा, रणथंबोर, कॉर्बेट आठवते, अर्थात त्यांच्यापैकी बहुतेक कधीच तिथे गेलेले नाहीत किंवा केवळ एका सफारीपुरती (जंगलातील फेरफटका) भेट दिली आहे, कारण बरेचजण वन्यजीवनाविषयी प्रश्न विचारतात की तिथे काय करायचे. त्यानंतर केवळ उत्सुकतेपोटी काही पर्यटक जंगलांना भेट देतात परंतु गोवा किंवा दुबईच्या तुलनेत ते जंगलांना क्वचितच पुन्हा भेट देतात, कारण दुसरा प्रश्न असतो, कान्हा किंवा कॉर्बेटमध्ये (या यादीमध्ये आता ताडोबाचा समावेश करा) पुन्हा काय पाहायचे, आम्ही तिथे आधीच जाऊन आलेलो आहोत. एमडीटीडीसीसारख्या महामंडळांनी या दोन प्रश्नांकडे संपूर्ण वन्यपर्यटनाच्या आघाडीवरील सर्वात मोठी आव्हाने म्हणून पाहिले कारण आपण या प्रश्नांची उत्तरे देऊ शकलो व त्यांना योग्य प्रकारे चालना दिली तर वन्यजीव पर्यटन हा खजिना आहे जो कधीही अटणार नाही, परंतु आपण जनतेला त्याविषयी जागरुक केले पाहिजे. वन्यजीवनामध्ये केवळ प्रत्येक दिवसच नव्हे तर प्रत्येक सकाळ, दुपार व संध्याकाळ नवीन असते व त्यामुळे आपल्याला अवर्णनीय आनंद किंवा समाधान मिळू शकते जी आपण पर्यटनासाठी प्रवास करण्याची दोन प्रमुख कारणे असतात, आपल्यापैकी बहुतेक जण वन्यजीवनाच्या या पैलूविषयी अनभिज्ञ असतात. उदाहरणार्थ मी गेली वीस वर्षे कान्हा व ताडोबासारख्या ठिकाणांना भेट देत आहे व प्रत्येक वेळी मी त्यांना भेट देण्यासाठी उत्सुक असतो व ताजातवाना होऊन तसेच थोडे नवे ज्ञान घेऊन परत येतो. तर, एमटीडीसी त्यांच्या सध्याच्या रिसॉर्टच्या माध्यमातून तसेच माध्यमांद्वारे वन्य पर्यटनाविषयी जागरुता निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, कारण तिथेच महसूलाचे भविष्यही आहे.

३. वन्य पर्यटनस्थळे ओळखणे

आपले महाराष्ट्र राज्य जैवविविधतेने (वन्यजीवनाने) समृद्ध आहे, संपूर्ण देशामध्ये फार थोड्या राज्यांची या आघाडीवर आपल्याशी बरोबर होऊ शकते. मध्य भारतातील ताडोबासारख्या जंगलांपासून ते मेळघाटातील डोंगराळ जंगलांपर्यंत ते पेंचमधील सदाहरित जंगलांपर्यंत, तसेच पुणे व सोलापुरातील गवताळ पट्टे, मराठवाड्यातील कोरडी जंगले तसेच राज्याच्या पश्चिम भागातील पश्चिम घाट व सह्याद्रीतील जंगले व जवळपास ७०० किलोमीटरच्या किनाऱ्यावरील जंगले आपल्या दिमतीला आहेत. थोडक्यात आपल्याला जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये काहीना काही प्रकारचे किंवा अनेक प्रकारची जंगले आहेत, ज्यांचा एमटीडीसीने उपयोग करून घेतला पाहिजे व अशी ठिकाणे ओळखून, तेथे रिसॉर्ट बांधली पाहिजेत. यामुळे दुहेरी-परिणाम होईल, एक म्हणजे कमी गुंतवणूकीत महसूल वाढेल कारण बऱ्याच ठिकाणी प्रस्थापित वन्य केंद्रांच्या तुलनेत स्वस्त दराने जमीन उपलब्ध आहे व दुसरे म्हणजे स्थानिकांना रोजगार मिळेल ज्यामुळे या भागांमधून शहरांमध्ये स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. त्याचवेळी अप्रत्यक्षपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्यजीवनाचे संरक्षण केले जाईल कारण एमटीडीसीच्या सहकार्याने वन्य पर्यटनामध्ये सहभागी असलेले हे सर्व लोक जंगलांचे संरक्षक बनतील जे आम्ही ताडोबा व भोवतालच्या भागामध्ये पाहिले आहे. त्याचवेळी यामुळे पर्यटकांसाठी कमी खर्चात आणखी पर्याय उपलब्ध होतील, जो पुन्हा पर्यटन उद्योगाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

४. सध्या अस्तित्वात असलेल्या वन्यजीव केंद्रांचा महसूल वाढवणे

ताडोबामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये एमटीडीसीचा क्रमांक पहिला होता, आज प्रत्येक वन्यप्रेमी पर्यटकाच्या यादीमध्ये मोहार्ली येथील रिसॉर्ट व मेळघाटातील चिखलदारा यांना वरचे स्थान असते. जेव्हा या जागी राहण्यासाठी काहीही पर्याय नव्हता तेव्हा एमटीडीसीने हा पर्याय उपलब्ध करून दिला परंतु सध्याच्या रिसॉर्टचा विस्तार करण्याव्यतिरिक्त नंतर काहीही करण्यात आले नाही. इतर खाजगी व्यवसायांनी ज्यामध्ये मोठ्या व्यवसाय समूहांसह वैयक्तिक गुंतवणूकदारांचा समावेश होतो, त्यांना ताडोबातील वन्यपर्यटनाच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेतला व एमटीडीसीचा पर्यटनातील वाटा घटला. जेव्हा एमटीडीसीने ताडोबातील मोहार्लीमध्ये आपले रिसॉर्ट उघडले तेव्हा जंगलामध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ ३ प्रवेशद्वारे होती व आज ताडोबामध्ये प्रवेश करण्यासाठी २२ दरवाजे आहेत परंतु एमटीडीसीचे अजूनही केवळ एकच रिसॉर्ट आहे. त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे व ताडोबाच्या सर्व बाजूंनी वेगवेगळी रिसॉर्ट उघडली पाहिजेत म्हणजे एमटीडीसीचा महसूल वाढेल त्याचसोबत त्यामुळे जास्त स्थानिकांना रोजगार मिळेल, तसेच पर्यटकांना त्यांच्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळेल असे पर्याय मिळतील ज्यांना सध्या खाजगी व्यावसायिकांना निवासासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत, जे केवळ नफ्यासाठीच काम करतात.

६. वन्य पर्यटन, पायाभूत सुविधा व एमटीडीसीची भूमिका

वन्य पर्यटनातील सर्वात महत्त्वाचा (किंवा कमकुवत) घटक म्हणजे यापैकी बहुतेक भाग हे दुर्गम आहेत व शहरी सुखसोयींपासून लांब आहेत. त्यामुळेच पायाभूत सुविधा जो पर्यटनाचा महत्त्वाचा भाग असतो तो एकतर इथे अस्तित्वातच नाही किंवा अतिशय निकृष्ट आहे. याच कारणामुळे अनेक पर्यटक वन्यजीवन केंद्रांना पुन्हा भेटी देणे टाळतात. पर्यटन हे सेवा उद्योग क्षेत्र आहे परंतु कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे ही एक मोठी डोकेदुखी असते व त्यांना इथे घेऊन येणे व राहायला लावणे हे खरे आव्हान असते ज्यामध्ये एमटीडीसी बदल घडवू शकते कारण त्यांच्या पाठीशी सरकारी यंत्रणा आहे. एमटीडीसी पुढाकार घेऊ शकते व संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक किंवा केंद्रीय व्यावसायिक संस्थांच्या मदतीने जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण संस्था सुरू करू शकते, जेणेकरून स्वयंपाकी, नोकर, रखवालदार यासारखे कर्मचारी उपलब्ध होतील व त्यामुळे केवळ स्थानिक तरुणांचा कौशल्य विकास होऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होतील असे नाही तर त्यामुळे रिसॉर्टवरील अतिरिक्त खर्चाचे ओझेही कमी होईल त्यामुळे आपण आणखी पर्यटकांना कमी दर देऊ शकतो. त्याचवेळी ताडोबा, पेंच, नागझिरा, उमरेड कऱ्हांडला यांचे उदाहरण घ्या जी नागपूरपासून ९० ते १०० किलोमीटर अंतरावर आहेत जे वन्यपर्यटकांसाठी सर्व अभयारण्यांना जोडणारे केंद्र म्हणून कार्य करते. परंतु या सर्व जागी जाण्यासाठीची सोय ही एक समस्या आहे व तिथे जाण्यासाठी सर्वात सोयीचे साधन म्हणजे टॅक्सी जी अतिशय महाग पडते ज्यामुळे चौघांच्या कुटुंबाचे बजेट कोलमडते. इथेही एमटीडीसी पुढाकार घेऊ शकते व राज्य मंडळाच्या सहकार्याने या सर्व ठिकाणांहून नागपूरपर्यंत एसी बस शटल सेवा दिवसातून किमान तीन वेळा सुरू करू शकते. यामुळे निश्चितपणे पर्यटकांचे पेसे वाचतील तसेच त्यांना आरामात प्रवासही करता येईल जो पर्यटनाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आज वन्य पर्यटनातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे व सफारीची तिकीटे व त्याचे शुल्क, इथेही एमटीडीसी सरकारी संस्था असल्यामुळे त्यांनी वन विभागाशी सहकार्य करार करावा व सफारीसाठी १५ ते २० व्यक्तींसाठी मध्यम आकाराच्या वाहनासाठी स्वतःचा हिस्सा मिळवावा. हे निश्चतपणे मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या खिशासाठी निश्चितपणे वरदान ठरेल. दुर्दैवाने वन्यपर्यटन, विशेषतः ताडोबा व रणथंबोरसारख्या लोकप्रिय ठिकाणचे पर्यटन केवळ काही श्रीमंत लोकांपुरतेच उरले आहे, ही वस्तुस्थिती आहे कारण त्याच्याशी संबंधित सर्वच गोष्टींचे दर वाढले आहेत, यामुळे खरेतर सामान्य जनता पर्यटनाच्या अतिशय महत्त्वाच्या घटकाला मुकत आहे. यामुळे सामान्य माणूसाने वन्यपर्यटन स्थळी भेट देण्यावर मर्यादा येतात. यामुळे या भागांच्या भोवतालच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवरच केवळ परिणाम होत नाही तर समाजाचा एक मोठा भाग वन्यजीवनाच्या महत्त्वाविषयीच अनभिज्ञ राहतो व हे जंगलासाठी अतिशय धोकादायक आहे कारण ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत, हेच तुम्हाला माहिती नसते त्याची तुम्ही काळजी करत नाही. म्हणूनच वन्यपर्यटन व त्यातील एमटीडीसीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.


* तुम्ही हे शेअरिंग यूट्यूबच्या खालील दुव्यावर पाहू शकता व ते शेअरही करा...

   https://www.youtube.com/watch?v=-aN76v7nV54&t=299s


संजय देशपांडे 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!